भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे अनावरण भारताचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते शनिवार दि. ५ जुलै रोजी सरकारी विधी महाविद्यालय (GLC) मुंबई येथे करण्यात येणार आहे. याकरिता सरकारी विधी महाविद्यालयाच्या आवारात स्मारकाचा अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
Read More
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी मंगळवारी मंत्रालयात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.
राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक येत्या दि. ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आर्थिक प्रगतीमुळे २०३० पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ३.३ लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा राज्याचा ऊर्जा परिवर्तन आराखडा तयार करण्यात आला असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे, असे प्रतिपादन अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी गुरुवार, दि.२० रोजी मुंबईत केले.
मुंबई : राज्यात ‘ई-कॅबिनेट’ ( E-Cabinet ) मध्ये होणारे निर्णय पोर्टलच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कारभार गतिमान आणि पारदर्शी करण्यावर भर दिला असून मंत्रिमंडळातील निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहोचणे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. याबाबतचे सादरीकरण मंगळवार, दि. ७ जानेवारी रोजी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) १४ आणि १५ डिसेंबर २०२४ रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारांमधील भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल.
Waqf Board) राज्य सरकारने वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जाहीर केला. मात्र, राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वक्फ बोर्डाला जाहीर केलेला दहा कोटी रुपये निधी देण्याचा जीआर सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सल्लागार तसेच राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची महारेराच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला आहे. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. महारेराचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज दि, २० सप्टेंबर २०२४ रोजी संपला आहे.
रेल्वे जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाबाबत नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात येईल, त्यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
''राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी स्वाक्षरी केली असावी,'' असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
राज्यावरील ‘कोरोना’ संकटाचा सामना करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता प्रशासकीय अधिकारी संजय कुमार यांची साथ मिळणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेले संजय कुमार यांच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...
श्रीराम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा असणार. भव्य श्रीराम मंदिर नृपेंद्र मिश्रांच्या देखरेखीत उभारले जाणार
राज्यातल्या सुमारे २७ महापालिकांमध्ये पुढच्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काल जाहीर झाली. काल मुंबईत प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदांच्या आरक्षणाची ही सोडत काढण्यात आली.
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन ६ नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत.
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त प्रविण परदेशी यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. महानगरपालिकेचे मावळते आयुक्त अजोय मेहता यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून शासनाने नियुक्ती केली असून त्यांच्या जागी परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. मेहता यांच्याकडून परदेशी यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांची शुक्रवारी अपर मुख्य सचिव पदावर पदोन्नती
मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
बोंगीरवार यांनी सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये सेवा बजावली होती.
मुख्य सचिवाला मारहाण करण्याचा प्रकार देशात पहिल्यांदाच घडला आहे