निसार हे नासा आणि इस्रोमधील एक संयुक्त अंतराळ मोहीम आहे. जे 2024 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-3 द्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. भारताच्या चांद्रयान-3 च्या जबरदस्त यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यूएस स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या सहकार्याने एक नवीन अंतराळ मोहीम निसार (NISAR) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे.
Read More
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर राज्यसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, चांद्रयान ३ सारख्या मोहिमांच्या माध्यमातून इस्रोने देशाचा गौरव केला आहे. त्यामुळे नारी शक्ती वंदन कायदा ही महिला शास्त्रज्ञांसाठी भेट आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यसभेत म्हणाले.
संसदेचे विशेष अधिवेशन दि. १८ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाले आहे. हे अधिवेशन २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचे सांगत मोठे संकेत दिले.
चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशस्वी मोहिमांनंतर आता भारताने समुद्रयान ही मोहिम हाती घेतलीय. भारतीय शास्त्रज्ञांनी सलग दोन अवकाश मोहिमा पार पाडल्यानंतर आता समुद्रातील रहस्ये उलगडण्याचा निश्चय केलाय. या मोहिमेद्वारे समुद्राच्या पोटात शिरुन धातू आणि खनिजांचा शोध घेतला जाईल.
दिल्ली येथे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जी-20 परिषद पार पडणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी दिल्लीत दाखल झाले आहेत. या परिषदेच्या निमित्ताने भारत संपूर्ण जगाला आपली संस्कृती. इतिहास आणि कलेची ओळख करुन देत आहे.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने नवी रणनीती आखल्याची माहिती मिळते आहे. संसदेचं १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याची चर्चा आता सुरु आहे. या अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय घटनेमधून इंडिया शब्द कायमचा हटवण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती आहे.
इस्रोचे शास्त्रज्ञ एन वलारमथी यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले. भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेच्या प्रत्येक रॉकेटच्या प्रक्षेपणावेळी काउंटडाउनसाठी जो आवाज आपण ऐकत होतो. तो आवाज एन वलारमथी यांचा होता. दि. ३ सप्टेंबर रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दि. १४ जुलै रोजी चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाच्या वेळीही संपूर्ण देशाने काउंटडाउन ऐकले होते, ते ही एन वलारमथी यांनीच केले होते. वलारमथी यांचा आवाज यापुढे श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांची काउंटडाउन करणार नाही. त्यामुळे सर्व शास्
चांद्रयान-३ नंतर आता भारताने सौर मोहिम हाती घेतली असून आदित्य एल-१ असे या मोहिमेचे नाव आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणासाठी इस्त्रो पुर्णपणे सज्ज असून बुधवारी आदित्य एल-१ ची पूर्व चाचणीही करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच चंद्राच्या दक्षिण धृवावर चांद्रयान-३ चे यशस्वी प्रक्षेपण पार पडले. त्यानंतर आता प्रथमच आदित्य एल-१ ही सौर मोहिम हाती घेण्यात आली आहे. येत्या २ सप्टेंबरला श्रीहरीकोटा येथून आदित्य एल-१ प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
अपेक्षेप्रमाणे ‘शिवशक्ती’ नामकरणावर २६ तुतार्या वाजणार, हे नक्की होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील त्याची पूर्ण कल्पना असणार. परंतु, यावेळी त्यांनी २६ तुतार्या वाजाव्यात. म्हणून हे नामकरण केलेले नाही. ते उत्स्फूर्तपणे बोलले. जे अंतर्मनात असतं, ते उत्स्फूर्तपणे येतं. ‘शिवशक्ती’ म्हणजे ‘विश्व कल्याण करणारी शक्ती.’ आपली वैज्ञानिक प्रगती ही विश्वकल्याणासाठीच आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. हे मोदी यांनी पुन्हा स्पष्ट केले.
चांद्रयान-३ च्या यशानंतर त्याच्या यशाच्या श्रेयाबाबत राजकीय वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत सर्वांनाच श्रेय देण्यात व्यस्त आहे.मात्र इस्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात इस्रोच्या स्थितीबद्दल सांगितले. यापूर्वीच्या सरकारांचा इस्रोवर विश्वास नव्हता, असा आरोप नंबी नारायणन यांनी केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटरवर पोस्ट करत त्यांनी लिहले की," मोदीजींनी चंद्राच्या भागांना तिरंगा आणि शिवशक्ती असे नाव देण्यात आले आहे. आता अदानी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश करेल आणि निविदा न काढता चंद्रावर सपाट पृथ्वीचे दर्शनी भाग बांधण्याचे अधिकार प्राप्त करेल. तिथे मुस्लिमांना परवानगी दिली जाणार नाही आणि फक्त शाकाहारीच राहतील"
पाटणा, बंगळुरूनंतर आता दि. ३१ ऑगस्टला ‘इंडिया’ आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आगामी लोकसभेच्या रणनीतीऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराजित करण्यावरच बैठकीत मंथन तथा कुंथन होईल, हे कुणी सांगण्याची गरज नाही. देशातील २६ विरोधी पक्ष या बैठकीला हजेरी लावण्याची शक्यता आहे. परंतु, बैठकीआधीच राहुल गांधींवर त्यांच्या नेतेमंडळींकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव सुरू झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानहुन मायदेशी परतताच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला. नाना पटोले यांनी म्हटले होते, राज्यात दुषष्काळग्रस्त परिस्थिती असताना नेते गावाला जातात, जपानला जात आहेत. यावर प्रत्त्युत्तर करताना फडणवीस म्हणाले, "नाना पटोलेंना मी कधीच गांभीर्याने घेतलेलं नाही. ते सकाळी वेगळं बोलतात आणि संध्याकाळी वेगळं. मी जपानला गेलो आणि भारताकरता काहीतरी घेऊन आलो. फिरायला गेलो नव्हतो."
'चांद्रयान-३' मोहिमेतील चांद्रयानाचे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग होऊन तीन दिवस झाले आहेत. या आश्चर्यकारक आनंदाच्या बातमीनंतर, तिथून आनंदाच्या बातम्या येणं सुरूच आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दि.२६ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान बद्दल नवीन माहिती दिली. इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितले की, दि. २६ ऑगस्ट रोजी रोव्हरने १२ मीटरचे अंतर कापले.
दि. २३ ऑगस्ट रोजी भारताची ‘चांद्रयान-३’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरली आणि जगभरातून कौतुकवर्षाव झाला. त्यानिमित्ताने या अंतराळ संशोधन मोहिमेचे फलित, आगामी दिशा आणि जागतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
चांद्रयान-३ च्या यशस्वी सॉफ्ट लँडिंगचा आनंद संपूर्ण भारत साजरा करत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही चांद्रयान-३ च्या यशानंतर इस्रोचे अभिनंदन केले, परंतु त्यांच्या एका चुकीमुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.
‘मिशन चांद्रयान-३’च्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आपला देश चंद्रावर जाऊन परत येईल, हे अभिमानस्पद आहे. मात्र, जातीय विषमता, गरिबी, बेरोजगारी वगैरे यांचे काय?” तसेच, प्रकाश यांची मुख्य खंत पाहू. ते म्हणाले की, ‘’मोदी, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतातील वंचित आणि बहुजन समाजाचे राक्षसीकरण करत आहेत.” खरेच वंचित आणि बहुजन समाज इतका मूर्ख आणि लेचापेचा आहे का? की एखादा राजकीय पक्ष त्यांचे राक्षसीकरण करू शकेल? बहुजन समाजाला मूर्ख ठरवून प्रकाश यांनी समाजाचा अपमान केला आहे.
'चांद्रयान-३ चे लँडिंग पाकिस्तानमध्ये दाखवण्यात यावे', अशी मागणी पाकिस्ताचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी केली आहे. फवाद चौधरी नेहमीच भारताविरोधात गरळ ओकत असतात. चांद्रयान-२ मोहिमेच्या अपयशानंतर फवाद चौधरी यांनी भारताची खिल्ली उडवली होती. पण आता ते सुधारले आहेत किंवा भारताचे सामर्थ्य ओळखले आहे असे दिसते.
“रॉकेट वुमन ऑफ इंडिया” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू करिधल श्रीवास्तव या सध्या भारताच्या चांद्रयान - ३ मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.
चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणारे रशियन अंतराळयान काहीवेळापूर्वीच कोसळले आहे. त्यातच आता इस्रोने सुद्धा चांद्रयान-३ ची लँडिंगची वेळ बदलली आहे. इस्रोने आज दुपारी २.१२ वाजता ट्विट केले की, चांद्रयान-३ २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६.४० वाजता चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल.
इस्रोने आज म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे प्रोपल्शन मॉड्यूल लँडर आणि रोव्हरपासून वेगळे केले. आता प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीवरून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल तर लँडर-रोव्हर २३ ऑगस्टला संध्याकाळी ५:४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
सध्या अवघ्या जगाचे लक्ष अवकाशातून येणार्या शुभ संकेतांकडे लागले आहे. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने पाठविलेले ‘चांद्रयान-३’ मजल दरमजल करत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचले. ‘चांद्रयाना’चा हा प्रवास जेवढा सुखद वाटतो, तेवढाच तो आव्हानात्मक होता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-३ चे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. चांद्रयान-३ आपल्या पूर्वनिर्धारित वेळेनुसार २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रावर जाण्याचा प्रवासाला निघाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांद्रयान-३ ची पहिली पायरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-3 या भारताच्या तिसऱ्या चे महत्त्व अधोरेखित केले आहे. एका ट्वीट थ्रेडमध्ये पंतप्रधान म्हणाले, भारताच्या अंतराळ क्षेत्राचा विचार केला तर 14 जुलै 2023 हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला जाईल. चांद्रयान-3 या आपल्या तिसऱ्या चांद्रमोहिमेचा प्रवास सुरू होईल. ही उल्लेखनीय मोहीम आपल्या देशाच्या आशा आणि स्वप्नांचे प्रतिक आहे. चांद्रयान-3 कक्षा उंचावण्याच्या प्रक्रियेनंतर चंद्राच्या कक्षेमध्ये सोडण्यात येईल. 300,000 किमी चे अंतर कापल्यानंतर हे यान येत्या काही आठवड्यात चंद्रावर पोहोचेल.
अमेरिकेच्या एका धनाढ्य उद्योगपतीला एका पत्रकाराने एकदा सहज विचारले की, “तुमच्या देशात स्वत:चे असे काय आहे,” तर त्याने अत्यंत मार्मिक उत्तर दिले, “आमच्याकडे देशहित आणि पैसा या दोन जमेच्या बाजू आहेत. त्याद्वारे आम्ही ‘व्हिस्की’पासून वाहनांपर्यंतच्या विविध वस्तू अनेक देशांकडून आयात करतो.” भारताकडून तुम्ही काय घेता, असा पुढचा प्रश्न त्या पत्रकाराने विचारला असता, त्या उद्योजकाने सांगितले की, “आम्ही भारताकडून बुद्धिजीवी लोकांची आयात करतो. ज्यामुळे आमच्या देशाचा कारभार अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे.” त्या धनाढ्य व्यक्