‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये बजावली आहे प्रमुख भूमिका केंद्र सरकारने शनिवारी भारतीय पोलीस सेवेतील (भापोसे) वरिष्ठ अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या (रॉ) प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. पंजाब केडरचे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी पराग जैन हे १ जुलै रोजी दोन वर्षांसाठी पदभार सांभाळतील.
Read More
‘डेटा सेंटर्स’ ही डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची पायाभूत सुविधा. या खेळात मुंबईने लंडन आणि डब्लिन सारख्या आघाडीच्या जागतिक शहरांना मात देत, सहावा क्रमांक पटकावला आहे. डेटा सेंटर्सच्या उपयुक्ततेचे हे आकलन...
देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करताना शिक्षणाच्या जागतिक मानकांचा विचार करण्यात आला आहे. त्याद्वारे तरुणांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या कौशल्यांनी सक्षम करून भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून स्थापित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी केले आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'वाघाटी संवर्धन प्रजनन केंद्र' पांढरा हत्ती ठरला आहे (rusty spotted cat breeding centre). कारण, 'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'ने (सीझेडए) सूचित केलेल्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नेमणूकच लाखो रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या या केंद्रात न झाल्यामुळे याठिकाणी वाघाटींचे प्रजनन गेल्या १३ वर्षात झालेले नाही (rusty spotted cat breeding centre). दै. 'मुंबई तरुण भारत'ने मंगळवार दि. १ एप्रिल रोजी केंद्रातील वाघाटीच्या पिल्लांचे मृत्यूचे वृत्त प्रकाशित केले होते (rusty
( Ashtavinayak temples in Maharashtra should be included in the Centrel goverment Prasad scheme rahul shewale ) केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांचा समावेश केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन योजना म्हणजेच ‘प्रसाद’ योजनेत करावा, अशी मागणी माजी खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली. याविषयीचे लेखी निवेदन शेवाळे यांनी केंद्रीय संस्कृतिक मंत्री गंजेंद्रसिंह शेखावत यांना सादर केले आहे.
दि. १२ सप्टेंबर २००४ रोजी ‘माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर’ आणि ‘सीपीआय’ (एमएल, पिपल्स वॉर) या दोन संघटनांचे विलीनीकरण झाले आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ (माओवादी)चा जन्म झाला. ‘अर्बन नक्षल’ संकल्पनेविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पण, हा गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम माओवादी साहित्याचा अभ्यास गरजेचा आहे, जेणेकरून याबद्दलचे सर्व गैरसमज आणि मनातील शंका सहज दूर होतील आणि जनसुरक्षा कायद्याचे महत्त्वही अधोरेखित होईल. यात विरोधी विचारांचा आवाज दडपण्याचा हेतू नाही, तर राष्ट्रविरोधी शक्तींच्या देशविघातक कृतींपासून देशाला
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी जेएनपीएने निर्यात-आयात सह देशांतर्गत कृषी वस्तू-आधारित प्रक्रिया आणि साठवणूक सुविधा विकासासाठी दोन प्रमुख भागधारकांसह सवलत करारांवर स्वाक्षरी केली आहे. अंदाजे २८५ कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) मोड अंतर्गत डिझाइन-बिल्ड-फायनान्स-ऑपरेट-ट्रान्सफर (डीबीएफओटी) मॉडेलवर विकसित केला जाईल.
‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाकार्य करणार्या नवी मुंबईच्या डॉ. दिपाली बापूराव गोडघाटे यांच्या सम्यक विचारकार्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
वन्यजीवांच्या संवर्धन, उपचार आणि देखभालीसाठी उद्योजक अनंत अंबानी यांच्या संक्लपनेमधून साकार झालेल्या जामनगर येथील 'वनतारा'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली (vantara wildlife rescue and rehabilitation center). यावेळी त्यांनी 'वनतारा'मध्ये सुरू असलेल्या वन्यजीव संवर्धन, उपचार आणि देखभालीच्या कामांची पाहणी केली (vantara wildlife rescue and rehabilitation center). तसेच पंतप्रधान काही वन्यजीवांसोबत रमलेले देखील दिसले. (vantara wildlife rescue and rehabilitation center)
राज्यातील सागरी जैवविविधतेच्या संवर्धनासाठी वन विभागाच्या कांदळवन कक्षाअंतर्गत 'मरिन सेंटर ऑफ एक्सलन्स'ची निर्मिती करण्यात येणार आहे (maharashtra marine centre of excellence). या केंद्राच्या निर्मितीसाठीची पहिली बैठक मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी मुंबईत पार पडली (maharashtra marine centre of excellence). ज्यामध्ये देशाभरात सागरी जैवविविधतेवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी या केंद्राच्या निर्मितीबाबतच्या सूचना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवासा राव यांच्या समोर मांडल्या. (maharashtra m
(Ulhasnagar) उल्हासनगर येथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या आणि कुटुंबियांच्या सांगण्यावरुन आपल्या एक महिन्याच्या बाळाला कळव्यातील एका कुटुंबाला कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय केवळ १० हजार रुपयात दत्तक दिले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहत असलेल्या प्रियकराच्या सांगण्यावरून बालिकेला दत्तक दिले असल्याची माहिती संबंधित तरुणीने दिली आहे. यावेळी तिने संपूर्ण प्रकार सांगत बालिकेला पुन्हा देण्याची मागणी केली आहे.
Mangal Prabhat Lodha “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” या योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील विविध शासकीय विद्यापीठांसमवेत सामंजस्य करार करून संयुक्तपणे अंमलबजावणी कार्यवाही करण्यात येत आहे. यानंतर याच धर्तीवर राज्यातील इतर शासकीय विद्यापीठांसमवेत करार करण्यात येतील. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP) स्किल क्रेडिट पॉईंट करता येतील, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा
अलिबाग तालुक्यातील किहीम येथे उभारण्यात येणार डाॅ. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्राचे काम रखडलेल्या अवस्थेतच आहे (salim ali education center. विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहितेनंतरही या केंद्राचे बांधकाम सुरू झालेले नाही (salim ali education center). गेल्या तीन वर्षांपासून या केंद्राचे बांधकाम सुरू आहे. (salim ali education center)
भारतीय सक्षम आणि समर्थ स्त्री हाच भारताचा खरा दागिना आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बँकिंग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी केले. जीजेईपीसी आयोजित १७ व्या आयआयजेएस एक्झीबिशनचे उद्घाटन मुंबईतील बॉम्बे एक्झीबिशन सेंटर येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अमृता फडणवीस यांनी भूषवले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र उद्योग विकास आयुक्त देवेंद्रसिंह खुशवाह, भारतीय उद्योग आणि व्यापार खात्याचे संचालक आर. अरुलानंदन, सेन्को गोल्ड अँड डायमंडचे व्यवस्थापकीय संचालक सुवंकर सेन उपस्थित हो
केंद्र आणि राज्य शासन हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते.
मुंबई महानगर क्षेत्राच्या (एमएमआर) विकासासाठी भविष्यातील आव्हाने आणि विस्ताराच्या संधी ओळखत, अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी ‘नीती आयोगा’ने सात प्रमुख घटकांच्या विकासावर भर दिला आहे. आजच्या पहिल्या भागात मुंबई महानगर क्षेत्राचा ‘जागतिक विकास केंद्र’ म्हणून विकास, परवडणार्या घरांची निर्मिती आणि जागतिक पर्यटन केंद्र म्हणून मुंबई महानगर प्रदेशासमोरील संधींचा सविस्तर आढावा घेऊया.
(Thane) महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील 58 महाविद्यालयांमध्ये ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन शुक्रवार, दि. 20 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
(Thane Civil Hospital) ठाणे सिव्हील रुग्णालय मूत्रपिंड (किडनी) रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. सिव्हील रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे एक हजार सेशन्स पूर्ण झाली आहेत. तरी सध्या दोन सत्रात सुरू झालेल्या या डायलिसिस सेंटरचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशाच्या ७८व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत २०४७' या संकल्पपूर्तीसाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएलआय योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकीला प्रोत्साहन सरकारकडून देण्यात येत आहे. दरम्यान, भारत जागतिक उत्पादनाचे केंद्र बनेल, याकरिता सरकार पावले उचलत आहे, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हणाले.
Delhi IAS Coaching Centre दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरातील दुर्घटनेचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पूरस्थिती दरम्यान राजेंद्र नगरच्या के. राव या कोचिंग सेंटरच्या तळमजल्यात पावसाचे पाणी शिरले होते. बायोमॅट्रीक दरवाजा आतून बंद झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही, यात युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या श्रेया यादव, तान्या सोनी आणि नेविन डेल्विन यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसांसह दिल्ली महापालिकेलाही फटकारले आहे.
कांदिवली पूर्व विधानसभेत हनुमाननगरमधील राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवन येथे मोफत संगणक प्रशिक्षण केंद्राचे आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे अकाउंट असिस्टंट, टॅली ऑपरेटर, ऑफिस असिस्टंट, कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग असे कोर्स शिकवले जाणार आहेत. त्यामुळे या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम तरुण तयार होतील, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
कोकणात वन्यजीवांबद्दलची जनजागृती व्हावी आणि लोकशिक्षणामधून वन्यजीवांबद्दल गैरसमज दूर व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या कोकणातील पहिल्या निसर्ग निर्वाचन केंद्राबद्दल.... (aranyavat)
भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर असताना देशातील डेटा सेंटर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळेच रियल इस्टेट क्षेत्रातील जागांची मागणी डेटा सेंटर्ससाठी वाढत असल्याचा दावा एका अहवालात केला गेला आहे.
'मी पंतप्रधान होणार नाही पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील कृपया असे विचारून अडचणीत आणू नका असे हलक्याफुलक्या अंदाजात प्रश्नाचे उत्तर देत गडकरींनी यांनी हे स्पष्ट केले आहे. उपस्थिताने तुम्हाला पंतप्रधान पदी पहायचे आहे या प्रश्नाला उत्तर देताना हे विधान गडकरींनी केले आहे.आज बीडीबी (भारत डायमंड बोर्स) मुंबई येथे 'भारत तिसरी अर्थव्यवस्था के दहलीज पर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताची अर्थव्यवस्था व डायमंड व्यापारी यांचे चर्चासत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमा
वीज उप केंद्रातील बिघाडाचा फटका बसलेल्या पवई निम्नस्तर सेवा जलाशयाच्या कामगार, कर्मचाऱयांनी अहोरात्र प्रयत्न करत या निम्नस्तर सेवा जलाशयाच्या आवारातील विद्युत उपकेंद्राची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला. ही कामगिरी बजावलेल्या जल अभियंता खात्यातील कामगार, कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवार, दि. १६ मे रोजी कौतुक केले. महानगरपालिका आयुक्तांच्या आस्थेवाईक संवादामुळे कामगार, कर्मचारी भारावून गेले.
डॉ. सुरेखा पाटील यांनी २००४ मध्ये रायगड जिल्ह्यात पेण येथे सुहित जीवन ट्रस्टची स्थापना केली. पेण तालुक्यात विशेष मुलांसाठी काम करणारी ही पहिली संस्था आहे. विशेष मुलांच्या माणूसपणाच्या जीवनासाठी काम करणार्या या संस्थेच्या कार्याचा इथे मागोवा घेण्यात आला आहे.
राजस्थानमधील जैसलमेर येथील माळढोक (GIB) प्रजनन केंद्रामध्ये तिसऱ्या पिल्लाचा जन्म झाला आहे. या केंद्रात २०२४ सालात जन्मलेले हे तिसरे पिल्लू असून दोन आठवड्यापूर्वी दोन पिल्लांचा जन्म झाला होता (GIB). देशात अंदाजे १५० च्या संख्येत शिल्लक राहिलेल्या या नष्टप्राय पक्ष्याच्या संवर्धनाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब आहे. (GIB)
वयाच्या ३६व्या वर्षी चांगल्या पगाराची नोकरी सोडून, कुठलाही अनुभव गाठीशी नसताना, केवळ आवडीखातर गुलाबशेतीकडे वळलेल्या यशस्वी उद्योजिका हर्षदा सोनार यांची ही यशोगाथा...
नाशकातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरचा लवकरच शुभारंभ. वन्यप्राण्यांवर उपचार करणारे अत्याधुनिक केंद्राचे काम पुर्ण...
सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, राज्यातील १००० महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे.
भीमाशंकर अभयारण्यातील (bhimashankar sanctuary) 'महादेव वन निसर्ग परिचय केंद्र' पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवार दि.८ मार्च रोजी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या निसर्ग परिचय केंद्राचे 'व्हिडीओ काॅन्फरन्स'व्दारे उद्घाटन केले (bhimashankar sanctuary). औषधी वनस्पतींसह बारा ज्योर्तिलिंगांच्या प्रतिकृतीने सजलेले हे 'निसर्ग परिचय केंद्र' भीमाशंकरला भेट देणारे भाविक आणि पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. (bhimashankar sanctuary)
सोनी म्हणजेच क्लव्हर मॅक्स एंटरटेनमेंटने झी बरोबरच विलीनीकरण फिसकटल्यानंतर सोनीने मात्र भारतातील व्यवसायाबाबत सकारात्मक विधान केले आहे. झी बरोबर करार मोडला असला तरी कंपनी भारतातील गुंतवणूकीबाबत सकारात्मक असल्याचे सोनीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. भारतातील नैसर्गिक व आगामी शक्य त्या मौल्यवान संधीचा सोनी सकारात्मक दृष्टिकोनात विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
७१व्या मिस वर्ल्ड सोहळ्याच्या ग्रॅण्ड फिनालेचे आयोजन ९ मार्च रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे भव्य सोहळ्यासह करण्यात येणार असल्याची घोषणा आज मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने अधिकृतरित्या केली. या सोहळ्याचे जगभरात स्ट्रिमिंग व प्रसारण करण्यात येईल. १८ फेब्रवारी ते ९ मार्च २०२४ दरम्यान या सोहळ्याचे आयोजन देशभरातील विविध ठिकाणी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या ’विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाअंतर्गत ओडिशाच्या अभ्यासदौर्यात कटक येथील ’केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था’, ‘राष्ट्रीय भात संशोधन केंद्र’ (एनआरआरआय)ला भेट दिली. भारतातील तांदूळ उत्पादन वाढविण्यासोबतच तांदळाचे नवीन आणि दर्जेदार वाणनिर्मितीसाठी या संस्थेत विविध पातळीवर संशोधन सुरू आहे. त्यानिमित्ताने या संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्रातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देऊन ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मिशन लक्ष्यवेध' योजनेची घोषणा गेल्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची आता पूर्तता झाली असून, महायुती सरकारने 'मिशन लक्ष्यवेध' योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १६० कोटी ४६ लाखांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील आपलं महायुतीचं सरकार किती संवेदनशील आणि मायबाप जनतेच्या आनंदाचा-गरजेचा विचार करणारं आहे, हे आपल्या निर्णयांमधून आणि कामांमधून सरकार वेळोवेळी दाखवत आलं आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांमधून पुन्हा एकदा आपल्या महायुती सरकारचा सर्वसामान्यांप्रतीचा हा भाव दिसून आलाय. अस मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केल आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तरुणांना नववर्षाची अनोखी भेट देऊ केली आहे. राज्यात १०० नवी कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्याची घोषणा त्यांनी सोमवार, १ जानेवारी रोजी केली. त्यामुळे कौशल्याधारित नवी पिढी घडण्यास मदत होणार आहे.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी माध्यमांना राममंदीराबाबत माहीती दिली आहे. तीर्थक्षेत्रावरील सुविधा कशा असतील याबद्दल त्यांनी नकाशाद्वारे माहीती दिली. त्यांनी सांगितले की एकुण ७० एकर जागेपैकी ३० टक्के जागेवरच बांधकाम होणार आहे बाकी सर्व जागा मोकळी आहे. हिरवळ, गवत आणि शेकडो वर्ष जुनी झाडे आहेत.
मुंबईतील आग्रीपाड्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी (आयटीआय) राखीव असलेल्या जागेचे आरक्षण बदलून तेथे उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचा घाट तत्कालीन ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र, या जागेवर उर्दू लर्निंग सेंटरऐवजी ‘आयटीआय’ भवन उभारण्याची घोषणा कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १९ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडिया, सीएसटी, वरळी सी लिंक याकडे पाहिले जात असले तरीही जीवंत माणसं हे खरे वैभव असते. डबेवाला हे मुंबईचे खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी त्यांचे एक्सपिरीयंस सेंटर तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे उभारू, यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कागद हा झाडापासून तयार होतो व पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर व्हावयास हवा. ‘पेपरलेस सोसायटी’ हवी व संगणकीकरणाच्या सध्याच्या काळात हे अशक्यही नाही. पण, आपल्या देशात कागद वापरात सहा ते सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आर्थिक वर्षे २०२६-२७ पर्यंत या क्षेत्रातील वृद्धी दर ३० दशलक्ष टनांपर्यंत अपेक्षित आहे. त्यानिमित्ताने...
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधतील. या योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहोचतील हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात 'विकसित भारत संकल्प यात्रा' आयोजित केली आहे.
महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘बाया कर्वे पुरस्कार’ यंदा पश्चिम बंगाल दार्जिलिंग हिल्समधील पाणिघट्टा येथील रहिवासी आणि कांचनजंगा उद्धार केंद्र, सिलीगुडीच्या संस्थापक असलेल्या प्रिन्स उर्फ रंगूजी सौरिया- यांना जाहीर झाला आहे. महिला, अल्पवयीन मुली व मुले यांना लैंगिक शोषणातून मुक्त करण्याच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्यांच्या या सामाजिक कार्याकरिता राष्ट्रीय स्तरावरील २८व्या ‘बाया कर्वे पुरस्कारा’ने माजी खासदार, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता डॉ. नितीश भारद्वाज यांच्या हस्ते आज
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (NAREDCO) महाराष्ट्रद्वारे भारतातील सर्वात मोठा रिअल इस्टेट प्रॉपर्टी एक्सपो, 'होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो २०२३' च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिओवर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे हे आयोजन करण्यात येणार आहे.
आकाशगंगेचा प्रवास, ग्रह ताऱ्यांचे अद्भूत विश्व, विज्ञानातील गमती जमती, सिद्धांत, नियम यांचे प्रत्यक्षातील सादरीकरण अशा संपूर्णपणे विज्ञानमय वातावरणात ठाणे महापालिकेच्या शाळांतील ५०० विद्यार्थ्यांनी एक दिवस खगोल विश्वाची सैर केली.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथिल जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे तिसऱ्या इंडियन कॅन्सर काँग्रेस कार्यक्रमाचे उद्धघाटन ग्रामविकास व पंचायत राज तसेच पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी काल ३ नोव्हेंबर रोजी केले. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, " बदलत्या जीवनशैलीचे कारण देत वाढत चाललेली व्यसनाधीनता हा केवळ महाराष्ट्रातील महानगरांमध्येच नव्हे तर इतर शहरे व ग्रामीण भागातही चिंतेचा विषय ठरत आहे. सिगारेट, दारूसारख्या व्यसनांसह अफू, गांजा, ड्रग्ज, खर्रा, ताडी-माडी, तंबाखू, तपकीर, गुटखा अशा विविध प्रकारच्या व्यसनांमध
राज्यातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाले. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात एकाचवेळी ५४ ठिकाणी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. राज्यांतील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. तसेच, ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याचा उद्देश ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा आहे. त्याविषयी...
केरळमधील कोची येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दि. २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात दोन जण ठार तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. घटनेच्या काही तासांनंतर, डॉमिनिक मार्टिन नावाच्या व्यक्तीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि थ्रिसूर ग्रामीणमधील कोकादरा पोलिस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले.
वाशीतील कॉल सेंटरमधून कोणतीही परवानगी न घेता अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने या केंद्रावर छापा टाकला असून वियाग्रा सीएलएस, लेविट्रा आणि इतर औषधे विनापरवाना विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच ही अवैध औषधे विक्री करण्यासाठी सुरू करण्यात आलेले कॉल सेंटर सील करण्यात आले आहे.