( Construction in CRZ area by erasing map entries in Madh Malvani maps ) पालिका आणि भूमी-अभिलेख अधिकार्यांना हाताशी धरून मढ आणि मालवणी परिसरातील ‘सीआरझेड’ क्षेत्रात अवैध बांधकामे करण्यात आली आहेत. मूळ नकाशांमध्ये खाडाखोड करून हे प्रकार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत उघडकीस आणली.
Read More
मुंबई महापालिकेचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात दिलेला आदेश रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
मुंबईमध्येच काय, कुठेही घर घेणार्या कष्टकरी जनतेला विचारा. त्याच्यासाठी एक घर आयुष्यभर हाडं मोडून, रक्ताचं पाणी करून पै पै जमवलेल्या पैशाचं स्वप्न. खुराड्यासारखं का असेना, स्वतःचं हक्काचं घर असलं की, मुंबईकरांना स्वर्ग गवसल्याचा आनंद होतो.
‘ना-बांधकाम’ क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा महत्त्वाचा निर्णय सोमवारी घेतला.