केवळ हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख. चित्रपटांतून एकत्र काम करण्यापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास जिनिलीया आणि रितेश यांनी केला आहे. दरम्यान, आज १७ डिसेंबर रोजी रितेश देशमुखचा वाढदिवस असून त्याच्या बायकोने जिनिलीयाने नवऱ्यासाठी विशेष पोस्ट केली आहे. सोशल मिडियावर सध्या जिनिलीयाची पोस्ट व्हायरल झाली असून रितेशचे चाहते त्याच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Read More
ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशाला आकार देणारे, लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या या महान व्यक्तीला बॉलिवूडकरही श्रद्धांजली वाहात आहेत.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन ६ ऑक्टोबर २०२४ रोजी अवघ्या ७० दिवसांत संपला. सूरज चव्हाणचा गुलीगलत पॅटर्न यंदाच्या सीझनमध्ये गाजला आणि अखेर ट्रॉफी सूरजने बारामतीला नेलीच. तसेच, हे पर्व गाजण्याचं आणखी एक कारण म्हणजे रितेश देशमुख याचं होस्टिंग. पहिल्यांदाच त्याने बिग बॉसचं होस्टिंग केलं होतं. आणि रितेशने 'भाऊचा धक्का' त्याच्या स्टाईलमध्ये नक्कीच उत्तम केला. त्यामुळे आता बिग बॉस मराठीच्या पुढच्या पर्वाचंही सूत्रसंचालन करणार का? याचं उत्तर रितेशने दिलं आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन संपला. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी या शोचा महाअंतिम सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांनी अखेरपर्यंत बिग बॉसच्या घरात आपलं स्थान टिकवून ठेवलं. आणि शेवटी या शर्यतीत सूरज चव्हाण विजय ठरला. सूरज चव्हाणने महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांचं मन जिंकत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. सूरज घरात नेहमी ‘आपला पॅटर्न वेगळाय, ही ट्रॉफी मी जिंकणार, मला माझ्या चाहत्यांवर पूर्ण विश्वास आहे’ असं म्हणायच
कलर्स मराठी आणि कलर्स हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस एकाच दिवशी समोर येणार आहे.
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन ६ ऑक्टोबर रोजी संपणार असून आता अधिक कठिण बिग बॉसचा खेळ होत चालला आहे. परंतु, काही दिवसांपूर्वी घरात निक्की तंबोळी आणि आर्या जाधवमध्ये जे गंभीर प्रकरण घडलं त्यामुळे आर्याला घराबाहेर जावं लागलं होतं. आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावल्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड केतन माणगावकर यांनी मोठा खुलासा केला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो असलेला मराठी बिग बॉस सध्या चांगलाच चर्चेत आहे. पहिल्याच दिवसापासून घरातील सर्व सदस्यांनी घातलेले राडे प्रेक्षकांनी पाहात त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. यंदाच्या सीझनमध्ये एकामागोमाग एक ट्विस्ट येतच गेले. आता सर्वात मोठा ट्विस्ट आणि मोठा निर्णय बिग बॉसच्या टीमकडून घेण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व यंदा १०० नाही तर ७० दिवसांमध्येच संपणार आहे. परंतु, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात टीआरपी असताना अचानक असा निर्णय घेण्यात आल्याने सगळ्यांनाच धक्क
रितेश देशमुख होस्ट करत असलेला ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. १०० दिवस सुरु राहणारा बिग बॉसचा खेळ यंदा मात्र ७० दिवसांमध्येच संपणार असल्याची घोषणा नुकतीच बिग बॉसने केली. त्यांचा हा निर्णय ऐकताच सदस्यांची चांगलील भांबेरी उडालेली दिसली.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील आणखी एक सदस्य २२ सप्टेंबर २०२४ च्या आठवड्यात घराबाहेर गेला. तो सदस्य म्हणजे अरबाज पटेल. घरात सर्वाधिक ज्या दोन सदस्यांची चर्चा झाली ते म्हणजे निक्की तंबोळी आणि अरबाज पटेल. पण गेल्या काही दिवसांमधील त्यांचं वागणं आणि बऱ्याच इतर गोष्टींमुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी अरबाज आणि परिणामी निक्कीला चांगलाच धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील जनतेची सर्वात कमी मतं मिळाल्याने त्याला ‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन जुलै महिन्यात सुरु झाला होता. या पर्वात अनेक नव्या गोष्टी घडल्या त्यातली पहिली महत्वाची बाब म्हणजे यंदा महेश मांजरेकर नाही तर रितेश देशमुख यांनी शोचं सुत्रसंचालन केलं. आणि आता आणखी एक आजवर कधीही न घडलेला निर्णय बिग बॉसच्या इतिहासात घेण्यात आला आहे. नुकतीच घरात पत्रकार परिषद झाली होती आणि त्यावरुन यंदा सीझन १०० नाही तर ७० दिवसांचा असणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सध्या सगळीकडे एकाच कार्यक्रमाची चर्चा आहे तो म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंतीही मिळत आहे आणि प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. घरात प्रत्येक सदस्यांची एकमेकांशी समीकरण फारच वेगळी आहेत. ती नेमकी खरी आहेत की खोटी? आणि अशा असंख्य प्रेक्षकांना पडलेल्या प्रश्नांची उत्तर मागण्याचाशी पत्रकार मंडळी पोहोचली आहेत बिग बॉसच्या घरात. आजच्या म्हणजे २१ सप्टेंबरच्या भागात स्पर्धकांना भाऊचा धक्का नाही, तर महाराष्ट्राच्या धक्क्याला सामोरं जा
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन चांगलाच गाजत आहे. या पर्वातील सर्वच सदस्यांनी पहिल्या दिवसापासून घरात तुफान राडा केला आहे. आणि या सगळ्यांच्या वागण्याबद्दल, मतांबदद्ल, एकमेकांसोबतच्या नात्यांबद्दल प्रश्न विचारायला घरात पोहोचले आहेत डॉ. निलेश साबळे. परंतु, निलेश यांची घरात एन्ट्री झाली असून शनिवारच्या भाऊच्या धक्काच्या दिवशीच ते आल्यामुळे रितेश देशमुख यांनी कार्यक्रमातून एक्झिट घेतली का? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. पण, या शनिवारच्या एपिसोडमध्ये आपल्या अनोख्या स्टाईलने
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. रितेश देशमुख या सीझनचे होस्ट असून अनेक नव्या गोष्टी या पर्वात घडताना पाहिल्या. पण आता बऱ्याच लवकर घरात पत्रकारांची परिषद झाल्यामुळे अवघ्या ७० दिवसांमध्येच हा सीझन बंद होणार का? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. १०० दिवसांऐवजी मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन लवकर गाशा गुंडाळणार असे नेटकरी म्हणत आहेत.
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहेत. पण या पाचव्या सीझनचं कौतुक होण्यापेक्षा प्रेक्षक या सीझनलला ट्रोल अधिक करत आहेत. बिग बॉस मराठीच्या या पाचव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राईज मिळाले. अगदी नव्या होस्टपासून ते घरातील सदस्यांच्या अनपेक्षित स्वभावापर्यंत. या पर्वाने टीआरपीचेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वांनाही प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं. त्यामुळेच पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण, कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार
सध्या चर्चेत असणारा कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझनबदद्ल प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांपेक्षा नकारात्मक प्रतिक्रियाच अधिक ऐकू येत आहेत. या सीझनमधील सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या चाहत्यांना अक्षरश: वीट आणला आहे. यातील अग्रेसर नाव म्हणजे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल. या दोघांचे घरातील एकूण वागणे आणि वावर पाहता भाऊच्या धक्क्यावर कार्यक्रमाचे नवे होस्ट रितेश देशमुख त्यांच्या चांगलाच खरपूस समाचार घेतील अशा तमाम मराठी प्रेक्षकांना अपेक्षा होत्या पण त्या रितेश पुर्ण करु न शकल्यामुळे कमालीच
मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन जोरातच गाजत आहे. पंरतु, या सीझनमध्ये आलेल्या काही सदस्यांनी मर्यादा ओलांडून आपल्यापेक्षा वयाने आणि करिअरमध्येही सिनियर असलेल्या कलाकारांना मना न ठेवता त्यांना नको नको ते बोल लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या अभिनयावरुन आणि त्यांना दिलेल्या राज्य पुरस्कारांबद्दल बोलली होती. आणि आता पंढरीनाथ कांबळे यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची पुन्हा एकदा जीभ घसरली. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना 'जोकर' म्हट
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्य एकमेकांवर आगपाखड करत आहेत. परंतू, घरातील काही सदस्य मर्यादा ओलांडून घरातील वयाने आणि अभिनय क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतही ज्येष्ठ कलाकारांवर टीका करत आहेत. नुकताच घरात 'सत्याचा पंचनामा' हा टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर चांगलीच भडकलेली दिसली. तिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरुन टीका केली असून
मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. नुकतंच या घरात एविक्शन प्रक्रिया पार पडली. सुरुवातीपासून म्हटल्याप्रमाणे बिग बॉस यांनी यावेळी आपलं रुप बदललं असून त्यांनी यावेळी एकाचवेळी दोन सदस्यांना घराबाहेर केलं. योगिता चव्हाण आणि निखिल दामले यंदाच्या आठवड्यात बेघर झाले असून जाता जाता त्यांनी दिन सदस्यांना त्यांच्या म्युचूअल फंडचे नॉमिनी केले आहे.
सध्या मालिकाविश्वात एकाच शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे आणि तो म्हणजे मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन. पहिल्या एपिसोपासूनच निक्की तंबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यात ठिणग्या पडताना दिसल्या. बऱ्याचदा अतिशय चुकीच्या भाषेत निक्की वर्षा यांच्यासोबत बोलताना दिसली. पण आता तिने नुकत्याच बेबी टास्कमध्ये सर्व सीमा ओलांडल्या आहेत. वयानं मोठ्या असलेल्या सदस्यांचा अपमान करणं, त्यांना नको ते बोलणं यामुळं तिच्यावर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत. यावेळी निक्कीने कहर करत वर्षा उसगांवकर यांना त्यांच्या मातृत्वावरू
कलर्स मराठी वाहिनीवरील मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या विशेष गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होताना दिसत आहेत. पण या सगळ्या सदस्यांपैकी निक्की तंबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांची तर सगळ्याच सीमा ओलांडल्या आहेत. अगदी क्षुल्लक कारणांवरुन निक्की आणि तिची टीम घरात वाद घालताना दिसतात. बऱ्याचदा निक्की घरातील बरेच नियमही मोडताना दिसते. यावरुन सोशल मीडियावरही तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तर आता एका मराठी अभिनेत्रीने निक्कीच्या कानाखाली लगावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या घर
मराठी बिग बॉसची मनोरंजनविश्वात तुफान क्रेझ आहे. नुकताच मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन सुरु झाला असून या नव्या सीझनचा नवा होस्ट रितेश देशमुख असून तो काय कल्ला करणार हे पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. पण तरीही बिग बॉस फॅन होस्ट महेश मांजरेकर यांना मिस करत आहेत. आधीचे चार सीझन महेश मांजरेकर यांनी गाजवले. वीकेंडचा वार, बिग बॉसची चावडी यात ते त्यांच्या खास शैलीने स्पर्धकांची शाळा घ्यायचे. पण, यंदाच्या सीझनमध्ये ते नसल्यामुळे 'बिग बॉस मराठी ५' तुम्ही का होस्ट करत नाही आहात, याबाबत महेश मांजरेकरांना एका मुलाखतीत प्रश्न
बहुचर्चित मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. अखेर ही प्रतिक्षा संपली असून २८ जुलै २०२४ पासून कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरु झाला आहे. आता १०० दिवस मराठी मनोरंजनसृष्टीतील १६ सदस्य कल्ला करणार आहेत. दरम्यान, नवा सीझन असल्यामुळे यावेळी नवा होस्ट अर्थात रितेश देशमुख सदस्यांची शाळा घेणार आहे तर बिग बॉस देखील एका वेगळ्या आणि नव्या रुपात दिसणार आहेत. जाणून घ्या कोण आहेत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील १६ सदस्य...
लोकप्रिय शो मराठी बिग बॉस दोन वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार असून या पर्वाचे सुत्रसंचलन अभिनेता रितेश देशमुख करणार आहे. आजवरच्या चारही सीझनची धुरा अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सांभाळली होती. त्यामुळे आता तोच दरारा रितेश देशमुख कायम ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्याचं उत्तर नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत रितेश देशमुख यांनी दिले आहे. शिवाय, तुमच्या घरातील बिग बॉस कोण असे रितेश यांना विचारले असता
मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा 'मुंज्या' हा चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटी पार करत नवा इतिहास देखील रचला. यानंतर त्यांचा 'काकुडा' हा चित्रपट आहा जिओ सिनेमा या ओटीटी वाहिनीवर प्रदर्शित झाला असून या हॉरर-कॉमेडी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि रितेश देशमुख प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, सोनाक्षीने पहिल्यांदाच आदित्य यांच्यासोबत काम केले असून मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याचं महत्वाचं कारण तिने सांगितलं आहे.
लोकप्रिय रिअॅलिटी कार्यक्रम मराठी बिग बॉसचा नवा सीझन कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात असतात. आणि आता बिग बॉसचा पाचवा सीझन अभिनेता रितेश देशमुख होस्ट करणार असल्यामुळे उत्सुकता अधिकच वाढली आहे. अखेर बिग बॉसच्या पाचव्या सीझनची तारीख जाहीर झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात रितेश देशमुखचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
मराठी बिग बॉस सीझन दोनचा विजेता शिव ठाकरे झाला होता. पण त्याच्या सोबतीने अभिनेत्री-लेखिका नेहा शितोळे देखील त्याच्यासोबत बिग बॉसच्या घरातून शेवटी बाहेर पडली होती. आताही मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन २८ जुलैपासून कलर्स मराठीवर सुरु होणार असून अभिनेता रितेश देशमुख या सीझनचं सुत्रसंचलन करताना दिसणार आहे. यावरच आपले मत मांडत अभिनेत्री नेहा शितोळे हिने मांडले आहे. ‘महाएमटीबी’च्या Unfiltered गप्पा या भागात तिने बिग बॉसच्या घरातील आठवणींना उजाळा देखील दिला होता.
प्रेक्षक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत तो बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता लवकरच भेटीला येणार आहे. यावेळी एक मोठा बदल असून महेश मांजरेकर नाही तर अभिनेता रितेश देशमुख सीझन होस्ट करताना दिसणार आहे. गेले अनेक दिवस बिग बॉस ५ चे प्रोमो प्रदर्शित केले जात आहेत. पण प्रेक्षक नेमका हा कार्यक्रम कधीपासून सुरु होणार याची वाट पाहात आहेत. आज त्यांची ही प्रतिक्षा संपणार असून सायंकाळी ५ वाजता ढोल ताशांच्या गजरात बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची तारीख जाहिर केली जाणार आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधली आहे. आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या भव्य लग्न सोहळा सुरु आहे. नव दाम्पत्यांना आर्शिवाद आणि अनेक शुभेच्छा देण्यासाठी परदेशातूनही पाहूणे आले आहेत. दरम्यान, या सोहळ्याला महाराष्ट्राची लाडकी वहिणी आणि भाऊ अर्थात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी मराठमोळ्या पेहरावात हजेरी लावली.
हिंदी बिग बॉस ओटीटीचे तिसरे पर्व लवकरच सुरु होत असून यावेळी सलमान खान नव्हे तर बॉलिवूडचे झक्कास अभिनेते अनिल कपूर या सीझनचे होस्ट असणार आहेत. नुकतीच या कार्यक्रमाची पत्रकार परिषद झाली यावेळी अनिल कपूर यांनी जय महाराष्ट्र म्हणत मराठी बिग बॉस बद्दलही भाष्य केले आहे.
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम म्हणजे मराठी ‘बिग बॉस’ (Marathi Big Boss). या कार्यक्रमाचे यापुर्वीचे चारही पर्व प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. त्यामुळे पुढचा पाचवा पर्व कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात होते. पण त्यांची ही आतुरता आता (Ritesh Deshmukh) संपली असून लवकरच मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व येणार असून यात होस्ट म्हणून महेश मांजरेकर नव्हे तर अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम म्हणजे मराठी ‘बिग बॉस’ (Marathi Big Boss). या कार्यक्रमाचे यापुर्वीचे चारही पर्व प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. त्यामुळे पुढचा पाचवा पर्व कधी येणार याची प्रेक्षक वाट पाहात होते. पण त्यांची ही आतुरता आता (Ritesh Deshmukh) संपली असून लवकरच मराठी बिग बॉसचे पाचवे पर्व येणार असून यात एक मोठा बदल दिसून येणार आहे.
हिंदीं चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन (Sangeeth Sivan) यांचे बुधवार दिनांक ८ मे रोजी रात्री निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. संगीत सिवन यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सिवन (Sangeeth Sivan) यांनी त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीत क्या कुल है हम, अपना सपना मनी मनी असे अनेक विनोदी चित्रपट दिग्दर्शित केले होते.
लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. पाच टप्प्यात मतदान होणार असून आज ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान महाराष्ट्रात पुर्ण झाले. यावेळी सामान्य माणसांसोबतच कलाकारांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.
आज हिंदु नवं वर्ष अर्थात गुढी पाडवा. घरोघरी गुढ्या उभारुन लोकं नवीन वर्षाचं स्वागत करतात. अभिनेता रितेश देशमुख आणि वहिनी जिनिलिया देशमुख यांनी कुटुंबांसह सगळ्यांना गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) आणि नवं वर्षांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशमुख कुटुंब गुढीला (Gudhi Padwa) सजवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
वन्यप्राण्यांच्या संवर्धनासाठी अनंत मुकेश अंबानी यांनी एत महत्वाचे पाऊल उचलत गुजरातमधील जामनगरमध्ये वनतारा रेस्क्यु सेंटर (Vantara Jamnagar) उभारले आहे. अनंत हे स्वत: प्राणी प्रेमी असल्यामुळे ३००० एकर जागेत हे जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय उभे करण्यात आले आहे. एककीडे वनताराची चर्चा (Vantara Jamnagar) सुरु आहे तर दुसरीकडे अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या भव्य प्री वेडिंग सोहळ्याची वाहवा सुरु आहे. अशात अभिनेता रितेश देशमुख याने अनंत अंबानी यांच्यासाठी एक विशेष पोस्ट लिहित वनतारा या त्यांच्या प्रोजेक्टचा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी केली. महत्वाची बाब म्हणजे हा ऐतहासिक पट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
सोशल मिडियाच्या काळात व्यक्त होणं फार सोप्पं झालं आहे. आपल्याला न पटलेली किंवा पटलेली कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सोशल मिडियाच्या माध्यमातून नक्कीच केले जाते. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सर्वच जण आपली मते ठामपणे मांडत असतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ठाण्यात मुक्या प्राण्यांचं ग्रूमिंग सेशन करणाऱ्या एका नामांकित सेंटरमधील हा व्हिडिओ आहे, ज्यात एक माणूस एका श्वानाला मारहाण करत आहे. स्पा सेंटरमध्ये तो श्वान गेला असता तिथे त्याच्यासोबत मारहाण झाल्याचे यात दिसत आहे. य
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक, बायोपिक किंवा मग सिक्वेल चित्रपटांचीच रांग दिसून येते. काही दिवसांपूर्वी अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रेड’ चित्रपटाचा सिक्वेल ‘रेड २’ येणार असे घोषित करण्यात आले होते. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाली असून अजय देवगण समोर यावेळी पुन्हा एकदा खलनायकाच्या भूमिकेत अभिनेता रितेश देशमुख दिसणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अजय आय.आर.एस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत झळकणार आहे.
गेल्या तीन दशक परवडणारी घरे या संकल्पनेचे जनक व मानक म्हणून डॉ सुरेश हावरे यांच्या हावरे प्रॉपर्टीजकडे पाहिले जाते. मुंबई महानगर प्राधिकरणाच्या क्षेत्रात सगळ्या वर्गातील परवडणारी पण ३६० डिग्री लक्झरीअस घरे बांधण्यासाठी हावरे प्रॉपर्टीजने एक पाऊल पुढे टाकत नवीन ब्रँड लाँच करत आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केली गेली. यावेळी बोलताना ' सगळ्यांच्या आमच्यावरचा विश्वास हाच आमचा श्वास असल्याचा विश्वास पत्रकारांशी बोलताना केला.
महाराष्ट्राची सुन अशी ओळख असणाऱ्या जिनीलिया देशमुखने सासरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भावूक पोस्ट केली आहे. जिनिलिया आणि विलासराव यांच्यात खूप चांगलं नातं होतं. ती देशमुख कुटुंबाची मुलगीच झाली. असं असताना अचानक वडिलांसारखी माया करणारे विलासराव गेले आणि आपलं मायेचं छत्र हरवल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या.
रितेश देशमुख करणार चित्रपटाची निर्मिती
मुन्ना भाई एमबीबीएस मधील आपल्या सगळ्यांना सर्किट म्हणून माहित असलेल्या अर्शद वारसीचा आज जन्मदिवस आहे. बॉलिवूड मधल्या अनेक कलाकारांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
रवी जाधव यांचा ‘छत्रपती शिवाजी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता रितेश देशमुख या सिनेमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
बहुचर्चित ‘झिरो’ चित्रपट हा ‘सुपरफ्लॉप’ ठरत आहे. पण यामुळे ‘माउली’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई ३’कडे प्रेक्षकांचा कल जास्त आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा ‘माऊली’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. ‘माऊली’ या सिनेमाचे एक नवे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
अभिनेता रितेश देशमुख याच्या ‘माऊली’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
आज कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर ‘माझी पंढरीची माय’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.