(Salesforce CEO confirms 4,000 layoffs) हातातल्या मोबाईलपासून रस्त्यांवर धावणाऱ्या गाड्यांपर्यंत सगळ्याच क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाने शिरकाव केला आहे. एआयमुळे भविष्यात अनेक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ही भीती खरी ठरताना पाहायला मिळत आहे. एआयमुळे अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू झाली आहे. या यादीत आता अमेरिकन क्लाऊड सॉफ्टवेअरमधील दिग्गज कंपनी 'सेल्सफोर्स'चे नाव आले आहे. 'सेल्सफोर्स'ने ४ हजार नोकऱ्यांमध्ये कपात केली आहे.
Read More
‘एआय’ तुमचा डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, वकील किंवा डायरी नाही! ‘चॅट जीपीटी’चे सीईओ सॅम अल्टमन यांनी काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य वरवर पाहता सल्ला देणारे असले, तरीही ‘एआय’वर असणारे लोकांचे अति अवलंबित्व हा सर्वार्थाने पुढील काळात चिंतेचा विषय असणार आहे. त्याबद्दलचे हे आकलन.
(Elon Musk hints at new political party amid feud with Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामधून अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील एकेकाळचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध आता उघड शत्रुत्वात बदलल्याचे दिसत आहे. दोघांमधील मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे स
अलौकिक बुद्धिमत्तेचे वॉरेन बफे यांनी वयाच्या 93व्या वर्षी निवृत्तीची घोषणा करत, संपूर्ण जगाला चकित केले. आर्थिक युगातील त्यांनीच लिहिलेल्या एका भल्यामोठ्या समृद्ध अध्यायाला त्यांनी यशस्वीपणे पूर्णविराम दिला. आर्थिक शिस्तीचे धडे संपूर्ण जगाने ज्यांच्याकडून घेतले, त्या बफे यांच्या जीवनातील अर्थचिंतन...
अब्जाधीश गुंतवणूकदार आणि जगप्रसिद्ध उद्योगपती वॉरेन बफेट यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी बर्कशायर हॅथवे कंपनीच्या बैठकीत ही घोषणा केल्याचे समजते. या आर्थिक वर्षाखेरीस ते सीईओ पदाचा राजीनामा देतील आणि कंपनीचे नेतृत्व नवीन सीईओ ग्रेग एबेल यांच्याकडे सोपवतील.
( MHADA CEO Sanjeev Jaiswal ) “मुंबईत जमिनीची उपलब्धता कायमस्वरूपी आव्हान आहे. म्हाडाला रखडलेले प्रकल्प ताब्यात घेण्यास सक्षम बनवणार्या कलम ९१ अ मध्ये अलिकडेच सुधारणा करण्यात आली. सेस बिल्डिंग पुनर्विकासात दीर्घकाळ अडथळा असलेल्या जमीन मालकांना भरपाई देण्याचे काम आता कलम७९ अ अंतर्गत न्याय्य तरतुदींसह केले जात आहे. पुनर्विकास म्हणजे केवळ नवीन इमारती बांधण्याबद्दल नाही तर व्यवहार्यता, पारदर्शकता आणि वेळेवर वितरण करणे ही यात अध्याहृत आहे. यातील भाडेकरूंचे हक्क आणि प्रकल्प व्यवहार्यता दोन्ही सुरक्षित करण्यासाठी
'धारावी पुनर्विकास प्रकल्प हा एकमेव असा प्रकल्प आहे ज्यामध्ये सर्व पात्र आणि अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. प्रत्येक धारावीकराला घराच्या बदल्यात घरच देण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही या प्रकल्पात बेघर होणार नाही. इतकेच नाहीतर कोणालाही संक्रमण शिबिरात जाण्याची वेळ येऊ नये अशी खबरदारी घेण्यात येईल', अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली आहे.
मुंबई : टोरेस कंपनी घोटाळा ( Torres Company Fraud ) प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. दि. ६ जानेवारी रोजी झालेल्या टोरेस कंपनी घोटाळ्यात सामील असलेल्या काहींना अटक करण्यात आली. परंतु टोरेसची मूळ कंपनी असणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडचा सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या मोहम्मद तौसिफ रियाझला पोलिसांनी अटक केली आहे. रियाजला मुंबईत आणल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सध्या देशातील काही दिग्गज कंपन्यांचे सीईओ-अध्यक्ष कंपनीतील कर्मचार्यांनी साप्ताहिक ७० तास, ९० तास काम करावे, असे वायफळ सल्ले देत सुटलेले दिसतात. त्यामुळे पुन्हा एकदा अधिक काम की दर्जेदार काम,( More or Quality Work ) या चर्चेला तोंड फुटले आहे. त्यानिमित्ताने व्यवस्थापन आणि मानवी संसाधन क्षेत्राच्या दृष्टिकोनातून या विषयाचा उहापोह करणे क्रमप्राप्त ठरावे.
नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अमेरिकन कंपनी एनव्हिडीया यांच्यात करार करण्यात आला. एनव्हिडिया आणि रिलायन्स भारतात कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) क्षेत्रात क्रांती घडविण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे.
बहुराष्ट्रीय कंपनी केपीएमजीने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे की भारतातील ९० टक्के सीईओंनी वर्क फ्रोम ऑफीसला प्राधान्य दिले आहे. कर्मचाऱ्यांना मिळणारी बक्षिसे, पदोन्नती, वाढ, आदी गोष्टी सीईओ, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीशी जोडू इच्छितात असे सुद्धा यात नमूद करण्यात आले आहे.
( Ratan Tata ) प्रसिद्घ उद्योगपती रतन टाटा यांचे दोन दिवसांपूर्वी बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी देहावसान झाले. त्यांच्या निधनामुळे साऱ्या उद्योगविश्वाला धक्का बसला. रतन टाटा हे मोठे उद्योजक जरी असले तरी इतर उद्योजकांपेक्षा ते वेगळे आहेत हे त्यांनी पदोपदी दाखवून दिले. त्यामुळेच जगभरातील अनेक दिग्गजांकडून त्यांच्या कार्यकर्तृत्वास आदरांजली वाहण्यात आली. अशातच एका मोठ्या उद्योजकाने केलेली सोशल मीडिया पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. पेटीएम चे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करणारी एक पोस
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्वाड शिखर परिषदेकरिता अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी अमेरिकेतील आघाडीच्या तंत्रज्ञआन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत गोलमेजमध्ये सहभाग घेतला. अमेरिकेतील बड्या आयटी कंपन्यांच्या सीईओंसोबत आयोजित गोलमेजमध्य सहभाग घेत भारतातील तत्रज्ञान विकास वाढीच्या क्षमतेवर भर दिला आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई)मध्ये काही दशकांत लक्षणीय बदल घडून आले आहेत. भारतीय भांडवली बाजारातील प्रवेश आणि माहितीच्या सर्वसमावेक धोरणांमुळे गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदल दिसून लागले आहेत, असे बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुंदररामन रामामूर्ती यांनी सांगितले.
जागतिक इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी अमेरिकन कंपनी ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क याच महिन्यात भारताच्या दौर्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भेटीत मस्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, भारतात ‘टेस्ला’तर्फे गुंतवणुकीचीही घोषणा होऊ शकते. त्यानिमित्ताने एकूणच भारतीय वाहन निर्मिती उद्योगक्षेत्राचा घेतलेला हा आढावा...
ती आणि अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत सधन असणार्या, नाशिक जिल्ह्याच्या काही भागांत कुपोषित बालके व माता आढळाव्यात ही बाब खेदजनकच आहे. जिल्ह्यातील वनवासी दुर्गम भागांत विशेषतः गर्भवती माता व नवजात अर्भकांचे योग्य जागृती अभावी पोषण होत नसल्याचे, निरीक्षण आरोग्य यंत्रणेला आढळले.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्य:स्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.
गणरायांचे आगमन झाले आहे!तब्बल 10 दिवसांचा हा सण आनंद, उत्सव आणि सर्वांना एकत्र येण्याचे एक शुभपर्व आहे. लोकांच्या घरात, सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये हा सण मोठ्या प्रमाणात आणि अतिशय धुमधडाक्यात साजरा होतो.‘गणपती बाप्पा मोरया!’चा गजर आणि ‘मोदका ’चा गोड प्रसाद या उत्सवाचा आणि मंगलमय वातावरणाचा आणखी उत्साह वाढवतो.हिंदू परंपरेत गणरायांना विशेष स्थान आहे.त्याला ‘विघ्नहर्ता’ म्हणजेच भक्तांवरील संकट अथवा अडथळे दूर करणारे बाप्पा म्हणून ओळखले जातात.
एज्युकेशन टेक स्पेशालिस्ट BYJU's ने भारताचे सीईओ ( मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणून अर्जुन मोहन यांची नियुक्ती केली आहे.कंपनीच्या भारतातील व्यवसायिक ऑपरेशनचा पदभार आता अर्जुन मोहन सांभाळणार आहेत.याआधी संस्थापक सदस्य व माजी भारतीय बिझनेस हेड म्हणून मृणाल मोहित कार्यरत होते.
TRAI ( Telecom Regulatory Authority of India) देशातील दूरसंचार व टेलिकॉमचे नियामक मंडळाच्या नियमावलीत सुधारणा होणार असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेस ने दिले आहे. या वृत्तानुसार TRAI चे अध्यक्षपद खासगी क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येणार आहे. टेलिकॉम विश्वातील हा मोठा बदल मानला जात आहे.
भारतीय रेल्वेच्या १६६ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा एका महिलेकडे कामकाजाचा भार सोपावण्यात आला आहे. जया वर्मा सिन्हा या आजपासून भारतीय रेल्वेच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन पदभार स्विकारणार आहेत.
मेडटेक लाईक या भारतातील जुन्या व विश्वासू हेल्थकेअर कंपनीने नुकताच पोलीसांच्या शारीरिक मानसिक ताणतणावाच्या जनजागृतीसाठी शहरातील २१ पोलीस स्थानकात कार्यशाळा घेतली. याव्यतिरिक्त ताणतणाव, दबाव यावर मात करण्यासाठी कार्यशाळा घेतानाच 'स्ट्रेस मॅनेजमेंंट ' वर परिसंवाद घेतला. याप्रसंगी मुंबईतील २१ स्थानकात बीपी मॉनिटरिंग मशीन बसवण्यात आले आहे. याचा नियमित आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश राहणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज समुहातील जिओ कंपनीने आता पोस्टपेड बरोबर प्रीपेड ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन लाँच केल्याचे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे. गेल्या ४-५ वर्षात स्वस्त दरात ४ जी नेटा उपलब्ध करून जनसामान्यात धुमाकूळ घातला होता. त्याचाच पुढचा भाग म्हणून ही स्कीम ग्राहकांसाठी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेतील ‘लेटलतिफ’ कर्मचारी हे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. जिल्हा परिषदेची कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ मिनिटे ते सायंकाळी ६.१५ मिनिटे अशी असली तरी प्रत्यक्षात विलंबाने येणारे आणि काम संपण्यापूर्वीच घरी पळणार्या कर्मचार्यांची वाढती संख्या बघता, अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. लेटलतिफांना शिस्त लागावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या ’सीईओ’ आशिमा मित्तल यांनी काही कडक पावलेही उचलली. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाला कर्मचार्यांच्या वेळेची तपासणीचे आदेशही त्यांनी दिले.
पाळीव प्राण्यांचे संगोपन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून यासाठी ज्या कुटुंबाकडे पाळीव प्राणी असतात त्यांचा त्यासाठीचा वार्षिक खर्च सरासरी ६४ हजार रुपये इतके असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पाळीव प्राण्यांचा बाजार जगभरात २०१९ च्या तुलनेत १३% वाढला असल्याची आकडेवारी तज्ज्ञांनी दिली आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून रोशनी नाडर यांनी सलग दुसऱ्या वर्षीही आपले स्थान कायम राखले आहे. भारतातील पहिल्या तीन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील एक असलेल्या एचसीएल टेकनॉलॉजिजच्या रोशनी नाडर या अध्यक्ष आहेत
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील स्थानिक गावकऱ्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या जेएसडब्ल्यू ग्रुपच्या पुढाकाराचा भाग म्हणून जेएसडब्ल्यू फाउंडेशनने या भागातील नैसर्गिक स्रोतांची पुनःस्थापना व व्यवस्थापन करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत.
सरकारचे काम उद्योग-धंदा करणे नव्हे, तर उद्योगांसह स्टार्टअप्सना पोषक वातावरण तयार करणे हेच आहे. ती समज आपल्या पूर्वसुरी व विद्यमान विरोधी पक्ष, अपप्रचारक बुद्धिजीवी, विचारवंतांपेक्षा नरेंद्र मोदींना कैकपटींनी अधिक आहे. म्हणूनच त्यांनी, सीईओंबरोबरील बैठकीत जगातील पहिल्या पाचांत भारतीय कंपन्या येण्याची प्रेरणा देतानाच सरकारकडून सहकार्याचा विश्वास दिला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्टला बाईटडान्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर टिकटॉकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) केविन मेयर यांनी गुरुवारी राजीनामा दिला.
’गुगल’ने भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी याविषयीची अधिकृत घोषणा केली. ‘गुगल’ भारतात पुढील सात-आठ वर्षांत साधारणतः ७५ हजार कोटी इतके पैसे गुंतवेल. साधारणतः एक अब्ज डॉलर इतकी रक्कम पुढील काही वर्षांत ‘फॉक्सकॉन’ भारतात गुंतवण्याच्या बेतात आहे.
स्वतःचा वर्षभराचा पगार देणार चालकांना!
आणखी एका जागतिक कंपनीच्या सीईओ पदी ‘ही’ भारतीय महिला विराजमान!
अमेरिकेपेक्षा भारतात यूट्यूबचा जास्त वापर
२९ जानेवारी रोजीच्या बैठकीत अंतिम निर्णय
: खासगी क्षेत्रात देशातील तिसऱ्या क्रमांक असलेल्या अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ शिखा शर्मा या मंगळवारी पदावरुन निवृत्त झाल्या.
चंदा कोचर यांच्या राजीनाम्यानंतर आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा संदीप बक्षी यांनी स्वीकारली. तेव्हा एक यशस्वी बँकरबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या इतर पैलूंची ओळख करुन देणारा हा लेख...
जळगाव : जिल्हा परिषदेत शुक्रवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी विविध विभागातील कामांचा आढावा घेतला. त्या जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागातील ५ कोटींच्या वसुलीतील अफरातफरीबाबत अधिकार्यांना धारेवर धरले. ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठ्यासह इतर अफरातफरीची रक्कम त्वरित वसूल करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहे.
केंद्र सरकारच्या सकारात्मक धोरणांमुळे भारताबाहेरील उद्योजकांचा देशात गुंतवणूक करण्याकडे ओढा असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी देशातील सर्वात अस्वच्छ शहर म्हणुन भुसावळ शहराचा व्दितीय क्रमांक आला होता. पालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले.
राज्यामध्ये एकूण ५८ हजार मतदान केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कुमार यांनी यावेळी सांगितले.
इन्फोसिस या व्यवसाय समुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी आज सलील पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.