ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सस यांनी ब्रिटनच्या युरोपिय संघातून बाहेर पडण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम मुदत गाठण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री युरोपियन संघातून मुक्त होण्यासाठीचे विधेयक ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये पारित करण्यात आले. जर खासदारांनी याविरोधात मतदान करण्याचा प्रयत्न करत मुदत उलटवण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मध्यावधी निवडणूकांची घोषणा करू, असा इशाराही त्यांनी दिला.
Read More