‘पार्किंग’ ही मुंबईतील मोठी समस्या आहे. त्यामुळेच वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. त्यावर ‘पार्किंग सेंटर’चा उपाय शोधला तरी वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे तो कमीच पडत आहे. मात्र, समस्येची तीव्रता कमी होत आहे हे नक्की. बोरिवलीचे पार्किंग सेंटर रेल्वेस्थानकापासून थोडे लांब आहे, पण पर्यटक आणि स्थानिकांना फारच उपयोगी आहे.
Read More
सततच्या मानसिक ताणतणावाला सामोरे जाताना 'पार्टी कल्चर'चा आधार घेणाऱ्या मुंबईकरांमध्ये हृदयविकार वाढत असल्याचे निरीक्षण बोरिवलीतील 'अपेक्स हॉस्पिटल' समूहाने नोंदविले आहे. आपला मृत्यू हृदयविकारांमुळे होईल, अशी भीती मुंबईकरांना सतावत असल्याची नोंद गेल्या सहा महिन्यामध्ये पाचशेहुन अधिक मुंबईकरांशी संपर्क साधल्यावर अपेक्स हॉस्पिटल समूहाकडे आहे.
मातोंडकर यांची बोरिवली परिसरात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. ही प्रचार फेरी बोरिवली स्थानक परिसरात गेली असता काही तरुणांनी मोदी मोदीच्या घोषणांचा जयजयकार केला. यावेळी दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.
हिंदू अध्यात्म आणि सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून दि. ११ जानेवारी ते १३ जानेवारी पर्यंत कोरा केंद्र, बोरीवली पश्चिम येथे हिंदू आध्यात्मिक एवम सेवा प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक संस्थांच्या माध्यमातून केल्या जाणार्या कार्याची माहिती जनतेला व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर, इमारतीच्या बाहेर संडासाच्या पाइपांवर, झोपडपट्टीच्या कपारीत, रस्त्याच्या कडेला अशा ठिकठिकाणी पावसाळ्यात वड - पिंपळाचे माडे रुजून आलेले दिसतात. याचं कारण मुंबईत कावळे -कबुतरांची संख्या खूप आहे.