"कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे ती आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. 'एआय'मुळे पत्रकारितेच्या देखील सीमा विस्तारल्या आहेत", असे प्रतिपादन माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान साचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी शनिवार, दि. ३१ मे रोजी केले.
Read More
मुंबई पाठोपाठ महानगरातील शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावी तसेच झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा या उद्देशातून आता वसई-विरारमधील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याअनुषंगाने वसई-विरार परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वसई-विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी जनजागृती करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
( Let's Imagine ) गेली सहा वर्षे आमची ‘लेट्स इमॅजिन’ संस्था कलेचा आस्वाद घेत वाडा व विक्रमगडमधील जिल्हा परिषद शाळेच्या मुलांबरोबर पणत्या रंगविणे, शुभेच्छा कार्ड व एन्व्हलप सुशोभित करणे, कंदील तयार करणे अशा कलाप्रकारांची दिवाळी कार्यशाळा घेत दिवाळी साजरी करत आहे. या कलाप्रकारातूनही आनंद मिळतो आणि नवनवीन कल्पना आकाराला येतात. शिकण्याची आणि अनुभवांची समृद्ध देवाणघेवाण होते. यावर्षी आम्ही विक्रमगडमधील मोह बुद्रुक या शाळेत दिवाळीची कार्यशाळा घेतली. मोह बुद्रुक शाळेतील या मोहवून टाकणार्या अनुभवाचे शब्दचित्रण...
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्यावतीने दि. ३ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संस्थेच्या प्रेक्षागारात दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेची गोडी असणाऱ्या आणि भाषेच्या क्षेत्रात व्यावसायिक संधी शोधणाऱ्या सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त अशा 'प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा' आणि 'आवाजाची कार्यशाळा' या दोन कार्यशाळा अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
कोकणातील जैवविविधतेशी संबंधित असणार्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी ‘कोकण कलेक्टिव्ह’ या संकल्पनेअंतर्गत ‘कोकण डायलॉग’ ही कार्यशाळा दि. 13 जुलै रोजी पुण्यात पार पडली. या कार्यशाळेत झालेल्या चर्चेचा हा विस्तृत आढावा....
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अर्थात सीकेटी कॉलेज (स्वायत्त) येथे समुपदेशन कक्ष विभागातर्फे युवा मानसरंग प्रकल्पाअंतर्गत मानसिक आरोग्य कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, मानसोपचारतज्ञ डॉ. हमीद दाभोलकर आणि त्यांची सहकारी टीम, तसेच स्किल मिल इंडिया प्रा. लिमिटेड चे फाऊंडर झहीर मिर्झा व त्यांची टिम, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य विद्याशाखा विकास अकादमी (एम.एस.एफ.डी.ए.)च्या
स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिनानिमित्त हर घर सावरकर समिती, विवेक व्यासपीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि.६ आणि ७ जानेवारी रोजी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कार्यशाळेची सुरुवात सर्व प्रशिक्षणार्थींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन केली.
कोकणातील कातळ सडे संवर्धनात स्थानिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचा ऊहापोह रत्नागिरीत पार पडलेल्या ‘सडा: शोध आणि बोध’ या कार्यशाळेतून करण्यात आला. ‘बॉम्बे एनव्हार्यनमेंटल ऍक्शन ग्रुप’ आणि ‘द हॅबिटॅट्स ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सडा: शोध आणि बोध’ कार्यशाळा दि. १९ आणि २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला कोकणातील स्थानिक मंडळीसह, संशोधक, पुणे-मुंबईतील विद्यार्थी आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्राने शेतकरी बांधवांची सध्याची अडचण दूर करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये बिगर हंगामी खरबूज या पिकाची लागवड करून चांगल्या प्रकारचे अर्थार्जन करण्यासाठी ‘हॅगींग’ खरबूज लागवड तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. भाजीपाला गुणवत्ता केंद्रात नेदरलँडच्या शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवडक पॉलिहाऊसधारक शेतकऱ्यांसाठी 'मूल्य साखळी विकास कार्यशाळा' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
निराशाजनक व नकारात्मक वातावरणात कलाकारांचे मनोधैर्य राखणे गरजेचे : योगेश सोमण
पोलीसदलासाठी चारदिवसीय विनामूल्य ध्यानधारणा व आरोग्य कार्यशाळेचे आयोजन
३३व्या पक्षीमित्र संमेलनाची किनारी पक्षी कार्यशाळेने नांदी
अफाट असा आपला ५० वर्षांचा प्रगतीचा टप्पा पार करीत असताना, भारताची अव्वल सांस्कृतिक संस्था म्हणून लोकमान्य नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्स (एनसीपीए) आपल्या तीन दिवसांच्या भव्य आणि विविधांगी महोत्सवाची म्हणजे ‘एनसीपीए अॅड आर्ट फेस्टिव्हल’ ची घोषणा केली आहे.
आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आणि सिद्ध (आयुष) यांच्यासह सर्व चिकित्सापद्धतींना एकत्र आणण्याचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ आणि आरोग्य’ या संमेलनाचा समारोपही रविवारी उत्साहात झाला.
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीचा एक महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये भारतभरातून योग विषयातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत. ही कार्यशाळा 'योग' या संकल्पनेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेले आणि या उपक्रमाबद्दल फारशी माहिती नसलेले देखील या कार्यशाळेचा भाग होऊ शकतात
अभिनेता ललित प्रभाकर हा लँडमार्क फिल्म्स, विधी कासलीवाल निर्मित ’मीडियम स्पाइसी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित टाकळकर यांनी केले आहे.
धृपद ही भारतीय संगीतातील सर्वात जुनी शैली आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध तसेच कलाप्रकारातील प्रख्यात, उमाकांत आणि रमाकांत गुंडेचा आणि त्यांच्या वरिष्ठ शिष्यांकडून शिकण्याची ही अविस्मरणीय संधी उपलब्ध आहे
विज्ञानाची भीती घालवून आत्मविश्वास निर्माण करण्यास आणि भविष्यातील संशोधनाच्या वाटा शोधण्यास कार्यशाळेचा भरपूर फायदा झाला आहे.
अनेक संगीत दिग्दर्शकांनी बॉलिवूड चित्रपटात अविस्मरणीय चाल देण्यासाठी वापरलेले, परंतु तरीही फारसे प्रसिद्ध किंवा प्रकाशात न आलेल्या ‘माऊथ ऑर्गन’ या वाद्यास प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ठाण्यात नुकतीच एक विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. गुरूकुल प्रतिष्ठान, ठाणे आणि सुरभि संगीत अकादमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत पुण्यातील ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि संगीत सम्राट फेमप्रसिद्ध माऊथ ऑर्गन वादक सुनील पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना माऊथ ऑर्गन वादनाचे धडे दिले.