(Joe Biden diagnosed with Prostate Cancer) अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी १८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.
Read More
जो बायडेन यांच्या सत्ताकाळात आम्हाला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या प्रशासनतील अधिकारी आम्हाला कॉल करून शिवीगाळ करायची, आमच्यावर आरडाओरड करायचे. कधी कधी असं वाटायचं की हुकूमशाहीचा काळ सुरू आहे की काय" असे मत व्यक्त केलं आहे फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी. जो रोगन यांच्यासोबत पॉडकास्टवर बोलताना झुकेरबर्ग यांनी या संदर्भातील माहिती उघडकीस आणली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नुकतेच ज्याच्या गळ्यात अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे बहुमानाचे पदक घातले, तो आर्थिक दहशतवादी जॉर्ज सोरोस एकेकाळी २०१५च्या आसपास अमेरिका आणि युरोपला उद्ध्वस्त करण्याची योजना आखत असल्याचा आरोप ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनी केला आहे. जॉर्ज सोरोसने त्याच्या चेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःच्यासंकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखाचा आधार घेत, मस्क यांनी ही टीका केली आहे. या लेखामध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांच्या लोंढ्यांना युरोप आणि अमेरिकेमध्
राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होण्यापूर्वी जो बायडन यांनी विशेष अधिकार वापरत, अमेरिकेतील ४० पैकी ३७ फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत केले आहे. यामुळे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे बायडन यांच्यावर संतप्त झाले. तेव्हा, जो बायडन ( Jo Biden ) यांच्या या कृत्याचा अर्थ काय असेल? या सगळ्या घटनांचा मागोवा घेतला, तर एकच जाणवते ते म्हणजे चर्च, पोप आणि धर्माआड सत्तेचे राजकारण!
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आता १००० दिवस पूर्ण झाले आहेत. महिन्याभरात जे युद्ध संपेल अशी आशा होती, त्याला आता २ वर्षांहून अधिकचा काळ उलटला आहे. या युद्धात कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून लाखो लोक यामुळे स्थलांतरीत झाले आहे.
" या वस्तू केवळ भारताच्या ऐतिहासिक भौतिक संस्कृतीचा भाग नाहीत, तर त्याच्या सभ्यतेचा आणि चेतनेचा आंतरिक गाभा आहे." असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
अमेरिकेतल्या निवडणुकांत ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील चुरस तीव्र असून, या लढतीत पराभूत उमेदवार आपला पराभव मान्य करणार का, हा प्रश्न आहे. अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तेथील भारतीय कोणाला मतदान करणार, त्यांच्या मतदानामुळे निकालात किती फरक पडणार आणि मुख्य म्हणजे नरेंद्र मोदी भारतीयांशी संवाद साधताना तटस्थ राहाणार का, याबद्दल उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात ढवळाढवळ करणार नसले तरी, तिथे बांगलादेशमधील हिंदूंचा मुद्दा उपस्थित करुन सूचक इशारा देऊ शकतात.
बायडेन प्रशासन आपल्यावर दबाव आणत होते. कोव्हिड काळातील माहिती दडपण्यासाठी मेटावर दबाव टाकण्यात आला, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पत्रात नमूद केले आहे.
जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीच्या माघारीमुळेे अमेरिकेतील राजकीय समीकरणांवर निश्चितच परिणाम होऊ शकतो. तसेच आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे आव्हान उभे ठाकल्यामुळे, अमेरिकन जनता कोणाच्या हाती देशाच्या चाव्या देते, हे पाहणे औत्सुक्याचे.
वाढत्या वयामुळे आणि खराब स्वास्थामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन आगामी अध्यक्षीय निवडणूक लढवणार का नाही? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या शर्यतीत पुढे असल्याने बायडन यांचा संभावित पराभव लक्षात घेता उमेदवार बदलण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षात हालचाली सुरू असल्याची माहिती अनेक माध्यमांनी दिली आहे.
ट्रम्प यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका माणसाचा माथेफिरूपणा होता की त्यामागे सखोल कट होता, हे यथावकाश कळेल. गेल्या तीन-चार वर्षांत ज्यांनी ज्यांनी आपल्या देशात राष्ट्रवाद जागविला, त्या सर्व नेत्यांवर हल्ले झाले आहेत. यामागे जगभरातील राष्ट्रवादी नेत्यांना लक्ष्य करण्याचा व्यापक कट शिजतो आहे का, असाच प्रश्न उपस्थित होतो.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे आयोजित रॅलीमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्लोखोराने त्यांच्यावर दूर अंतरावरून गोळीबार केला. या गोळीबारात ट्रम्प यांच्या कानाला गोळी घासून गेली असून त्यांच्या कानातून रक्तस्त्राव येण्यास सुरूवात झाली.
नचा तिबेटवर सुरू असलेला कब्जा लक्षात घेता आता अमेरिकेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 'Resolve Tiber Act' तिबेट समाधान अधिनियम कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाकडून जो बायडन हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही पक्षांकडून निवडणूक जिंकण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले जात असून, सत्ताधारी पक्षाकडून तर नवनवीन घोषणांचा पाऊस सुरुच आहे.
जी-७ नावाने प्रसिद्ध असणारी जगातील ७ प्रमुख देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे संमेलन इटलीमध्ये सुरू आहे. यासाठी या सात देशांव्यतिरिक्त इतरही अनेक देशांचे प्रमुख या संमेलनास हजर राहणार आहेत. या संमेलनात चर्चेला येणार्या विषयांकडे जगाचे लक्ष लागले असल्याने, हे संमेलन कायमच चर्चेचा विषय असते.
अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारे एक विधान केले होते. त्यांला भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही परदेशी स्थलांतरीतांचे स्वागत करतो त्यांमुळे अमेरीकेची अर्थव्यवस्था चांगली आहे. तर चीन, भारत आणि जपानसारखे देश तसे करत नाहीत म्हणुन त्यांची अवस्था बिकट आहे असे जो बायडन यांनी म्हटले होते. त्यावर एस. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
"अमेरिकेमधून धर्म आणि विश्वास संपत चालला आहे. आपण पुन्हा प्रार्थनेकडे वळायला हवे.” असे नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतील मुख्य दावेदार डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. पवित्र गुड फ्रायडे आणि इस्टर संडेनिमित्त त्यांनी ‘गॉड ब्लेस द युएसए बायबल’ विकत घेण्याचेही अमेरिकन नागरिकांना आवाहन केले. या ‘गॉड ब्लेस युएसए बायबल’मध्ये अमेरिकेचे संविधान, स्वातंत्र्याचा जाहीरनामा वगैरेही आहे. हे बायबल एका संकेतस्थळावरून विकत घेता येईल, ज्याची किंमत आहे ६० डॉलर. ट्रम्प यांनी बायबल विकत घ्या, असे आवाहन केल्यामुळे अमेर
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने सोमवार, दि. २५ मार्च रोजी एक ठराव संमत करून गाझा पट्टीत तातडीने युद्धविराम घडवून आणण्याची मागणी केली. अमेरिकेने या ठरावाला विरोध न करता, तटस्थता राखल्याने तो मान्य होऊ शकला. या ठरावात ‘हमास’च्या ताब्यात असलेल्या इस्रायली लोकांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अमेरिकेत लोकप्रिय अशा ’टिकटॉक’वर बंदीच्या चर्चा रंगल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा हे अॅप चर्चेत आले. खरं तर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात ‘टिकटॉक’वरील बंदीचे विधेयक संमतही करण्यात आले. पण, याचा अर्थ लगेचच ‘टिकटॉक’ अमेरिकेतून हद्दपार होईल, असे नाही. त्यानिमित्ताने जवळपास १७ कोटी अमेरिकेन नागरिकांना प्रभावित करणार्या, या निर्णयामागचे राजकारण समजून घेतले पाहिजे.
पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जगातील सर्वात लोकप्रिय नेते’ हा सन्मान प्राप्त केला. ७६ टक्के मतांसह त्यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले. म्हणजेच त्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण जगानेच उमटवलेली ही मान्यतेची मोहर आहे. ‘विश्वनेते’ ही त्यांची ओळख कायम राखली गेली आहेच; त्याशिवाय विकसित भारताची संकल्पना संपूर्ण जगाने मान्य केली, असेही निश्चितपणे म्हणता येते.
रशियातील विरोधी पक्षनेते आणि व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांचा तुरुंगातच संशयास्पद मृत्यू झाल्याने, रशियात खळबळ उडाली आहे. अलेक्सी यांना तुरुंगात विष देण्यात आल्याची माहिती असून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्नदेखील तुरूंग अधिकार्यांनी केला नसल्याचे बोलले जात आहे.
‘जो आवडतो सर्वांना, तोचि आवडे देवाला’ हे भावगीताचे सुपरिचित बोल. पण, आता अमेरिकेचा ‘जो’ म्हणजेच राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे एकाएकी रशियाचे राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतीन यांनाही आवडू लागले आहेत. आता हे वाचूनही विश्वास बसू नये, असे विधान असले तरी ते १०० टक्के सत्य!
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भडकलेले इस्रायल-हमास युद्ध अद्याप थांबलेले नाही. याउलट या युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यताच अधिक. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांचा इस्रायलला कायमच पाठिंबा राहिला. त्याचाच परिणाम आता त्यांना भोगावा लागत आहे. पाश्चिमात्य देशांना इच्छा नसतानासुद्धा या युद्धात उतरावे लागले. त्याला कारण ठरले, इराण समर्थित हुती बंडखोरांचे लाल समुद्रात सुरू असलेले हल्ले. हुती बंडखोरांच्या याचं हल्ल्यांमुळे ’जागतिक महासत्ता’ असे बिरुद मिरवणारी अमेरिका युद्धाच्या चक्रव्यूहात अडकली आहे.
मॅक्रॉन यांनी भारताच्या निमंत्रणाला मान देऊन प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, भारत-फ्रान्स यांच्यातील सामरिक भागीदारीला २५ वर्षं पूर्ण होत असताना, ही भेट पार पडली. या भेटीदरम्यान २०४७ सालापर्यंत भारत आणि फ्रान्स संबंध कुठे असावेत, याबाबत एक दृष्टिपत्र तयार करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्पना रॉन डिसॅन्स्टिस यांच्यापेक्षा तब्बल ३० टक्के जास्त मतं मिळाली. विवेक रामास्वामींनी माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्पना पाठिंबा दिल्यामुळे ट्रम्प यांच्या मतांमध्ये वाढ होणार आहे. सध्या ट्रम्प यांच्या बाजूने रिपब्लिकन पक्षाचे किमान ६५ टक्के मतदार आहेत. मार्च महिन्याच्या मध्याला अनेक मोठ्या राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. तेव्हाही हाच कल राहिल्यास डिसॅन्टिस आणि निकी हेली यांच्यासाठी स्पर्धेत टिकून राहाणे अवघड होईल.
अमेरिकी समाज हा डेमोक्रॅट्स तसेच रिपब्लिकन या दोघांच्यात विभागलेला. या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर मागील दोन्ही निवडणुकींमध्ये मतांची पळवापळवी केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच बाहेरील राष्ट्रे समाजमाध्यमांच्या माध्यमातून तेथील निवडणुकांची प्रचार धोरणे ठरवतात, असे दिसून आले. यंदाही असे प्रकार घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानिमित्ताने...
चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी नुकताच व्हिएतनामचा दौरा करत, दोन्ही देशांतील संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विस्तारवादाची रणनीती वापरत, हातपाय पसरणारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२४ च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, फ्रान्स सरकारने मोदी यांना १४ जुलै रोजी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. भारत सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रमुख पाहुणे म्हणुन आमंत्रित केले होते. पण त्यांनी जानेवारीत येण्यास अशक्यता दर्शवली. यामुळे प्रमुख पाहुणे म्हणुन फ्रान्सचे राष्ट
व्यवसायाने उद्योगपती तसेच दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेले, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे युग वादग्रस्तच राहिले. आपल्या कारकिर्दीतील प्रत्येक भूमिकेला न्याय देताना, ते घेत असलेला आक्रमक पवित्रा कधी-कधी त्यांना संकटात ओढून नेत असतो. २०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा दुर्दैवाने पराभव झाला. त्यानंतर दि. ६ जानेवारी २०२१ रोजी या निकालाविरोधात अमेरिकेतील ट्रम्पसमर्थकांनी तेथील कॅपिटॉल इमारतीत घुसून हिंसाचार केला आणि निवडणूक निकाल उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे कोलोरॅ
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक लढण्यासाठी अपात्र घोषित केले आहे. कोलोरॅडोच्या सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी केली आहे. ज्या न्यायाधीशांनी हा निकाल दिला त्यांची नियुक्ती अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन यांच्या पक्ष डेमोक्रॅट्सने केली होती. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिंसाचार झाला होता. या प्रकरणात ट्रम्प यांना हा दणका बसला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर अनेक समस्या आणि गोंधळ निर्माण झाले आहेत. एकीकडे प्रमुख देशांमध्ये निवडणुकीचे वारे तर दुसरीकडे गाझा पट्टीत पुनर्वसन या गोंधळात हे युध्द जास्तीत जास्त कसे लांबेल यासाठी इस्रायल प्रयत्नशील आहे. युद्धानंतर तिथेही निवडणुका होऊ शकतील, या सर्व घटनांचा केलेला ऊहापोह...
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या न्यायालयात अनेक खटले चालू असून, त्यांचा ट्रम्प यांच्या उमेदवारीवर परिणाम होऊ शकतो. तसे न झाल्यास या वादविवादांतून अमेरिकेच्या अध्यक्षपदापेक्षा उपाध्यक्षपदाचा उमेदवार मिळण्याची शक्यता मोठी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. अमेरिकास्थित कन्सल्टन्सी फर्म 'मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदींना ७६ टक्के मान्यता मिळाली आहे. पीएम मोदींनंतर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे. यानंतर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट यांना ५८ टक्के तर ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांना ४९ टक्के रेटिंग मिळाले आहे.
जगातील क्रमांक एक ची आर्थिक महासत्ता आणि त्यामागोमाग क्रमांक दोनवर असलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट आणि बैठक हा साहजिकच वैश्विक चर्चेचा विषय. त्यातच जेव्हा या दोन्ही देशांतून विस्तवही जात नाही, तेव्हा ही भेट जगाच्या केंद्रस्थानी येणे साहजिकच. असे हे दोन देश म्हणजे अमेरिका आणि चीन. जो बायडन आणि शि जिनपिंग यांची अमेरिकेतील सॅन फ्रान्सिसको येथे ‘एशिया-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन’ (एपीईसी)च्या निमित्ताने भेट झाली. या सुमारे चार तास चाललेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्येही चर्चा वगैरेही झाल
हमासने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत १४०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून इस्रायलला समर्थन मिळाले. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने इस्रायलला आर्थिक मदत दिली. पण अमेरिकन सरकारने इस्रायला मदत देणे बंद करावे, अशी मागणी करत काही पॅलेस्टिनी समर्थकांनी व्हाईट हाऊसला घेराव घातला आहे.
नुकताच रशियाच्या दागिस्तानमध्ये शेकडो लोकांनी विमानतळावर हल्ला केला. त्यांना वाटले की, इस्रायलच्या लोकांना घेऊन दागिस्तानमध्ये विमान येत आहे. इस्रायलमधून कोण-कोण आले; तसेच प्रवाशांमध्ये यहुदी कोण आहेत, असा प्रश्न विचारत दागिस्तान विमानतळात शेकडो लोकांनी हिंसा सुरू केली.
इतर युद्धांशी तुलना करता ‘हमास’ने घडवलेले हत्याकांड नजरेत येत नसले तरी जर इस्रायल आणि भारताची तुलना केली तर भारतात दीड लाख लोकांचे शिरकाण केल्यावर जी भावना उसळेल, ती भावना इस्रायलमध्ये उसळली आहे.
एकीकडे इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध सुरु असताना आता भारताने भारत-मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (IMEEC) चे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाकाला ३.५ लाख कोटी रुपये खर्च येणार असून हा प्रकल्प भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
सध्या इस्रायल-‘हमास’मध्ये युद्ध पेटले असून, युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच अमेरिका इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहू यांची भेट घेत इस्रायलला शक्य ती मदत करण्याचे आश्वासनही दिले.
इस्त्रायल आणि हमासमधील युद्धात अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेने आपली युद्धनौकादेखील पाठवली आहे. या युद्धात दररोज असंख्य लोक आपला जीव गमावत असताना आता एक दिलासादायक बातमी पुढे आली आहे.
इस्रायल-हमास युद्धाचा आज १३वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत एकूण १,३०० निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संकटाच्या काळात इस्रायलला अनेक देशांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला पोहोचले आहेत.
इस्रायलने अजून गाझा पट्टीवर जमिनीवरून हल्ला चढविलेला नाही. हा संयम ‘हमास’ने ओलिस धरलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे. तो फार काळ टिकणार नाही. पण, ‘हमास’समर्थक एकाही नेत्याने किंवा देशाने या ओलिसांची सुटका करावी, असे आवाहन ‘हमास’ला केलेले नाही, यावरून ‘हमास’ आणि तिच्या समर्थकांचा कुटिल कावा लक्षात येईल. पण, आपल्याच निरपराध लोकांची हत्या करून ‘हमास’ने आपला अंत सुनिश्चित केला आहे, हे नक्की!
रॉकेट हल्ल्यामुळे गाझामधील रुग्णालयात किमान ५०० लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इस्रायलने यासाठी गाझामध्ये सक्रिय इस्लामिक जिहादला जबाबदार धरले आहे. तर इस्लामिक दहशतवादी संघटना हमास यासाठी इस्रायलला जबाबदार धरत आहे.अल-अहली अल-अरबी बॅप्टिस्ट हॉस्पिटल, जे दि.१७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ल्याखाली आले, हे मध्य गाझा येथे आहे. इस्रायली सुरक्षा दलांनी X/Twitter वर पोस्ट केले आहे की या हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. आयडीएफने सांगितले की, इस्रायलला लक्ष्य करून अनेक रॉकेट डागण्यात आले. यापैकी
डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडन अध्यक्षपदी येताच, त्यांनी अमेरिकेच्या मेक्सिकोला भिडणार्या सीमेवरून अमेरिकेत येऊ इच्छिणार्या निर्वासितांसाठी सीमा सताड उघडल्या. त्यानंतर दिवसागणिक वाढत जाणारा आणि अमेरिकेत प्रवेश करणार्या निर्वासितांचा लोंढा अजूनही कायम आहे.
अमेरिकेतील रॉबिन्सव्हीलच्या अक्षरधाम या जगातील सर्वात मोठ्या आणि भव्य मंदिराचे आज, रविवार दि. ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. ‘स्वामी नारायण संस्थे’चे सध्याचे प्रमुख आणि भगवान स्वामी नारायण यांचे सहावे उत्तराधिकारी श्री महंत स्वामी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज विधिवत प्रतिष्ठापना होऊन, हे मंदिर जनतेसाठी खुले होईल. १८३ एकर परिसरात या भव्य मंदिराची दिमाखदार वास्तू उभारण्यात आली आहे. २0११च्या सुरुवातीस असे भव्यदिव्य मंदिर उभारण्याचा जो विचार ‘बीएपीएस’च्या नेतृत्वाने केला होता, तो २0२३ साली त्यांनी पूर्णत्व
अमेरिकी सरकारची १ तारखेची टाळेबंदी तूर्तास टळली आहे. दि. १७ नोव्हेंबरपर्यंतच्या खर्चाची सोय करणारे हंगामी निधीचे विधेयक मंजूर करण्यात आल्याने, लाखो शासकीय कर्मचार्यांना वेतन मिळण्याचा मार्ग खुला झाला. युक्रेनसाठीची मदत यातून वगळण्यात आल्याने झेलेन्स्की यांना मात्र धक्का बसला आहे. यानिमित्ताने अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेला वारंवार आर्थिक संकटाचा सामना का करावा लागतो, त्याचे आकलन...
भारताने यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी दिली आहे. जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना आमंत्रित केले होते.
‘जी २०’ परिषदेच्या यशस्वी आयोजनातून भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरील आपले स्थान आणखी पक्के केले. परस्परांमध्ये विसंवाद असलेल्या देशांमध्ये जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर मतैक्य घडवून आणण्यात भारताला यश मिळाले. या परिषदेत भारत विश्वातील गरीब आणि विकसनशील देशांचा आवाज बनला. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केल्यामुळे अरब आणि मुस्लीम जगतातही आपले स्थान निर्माण झाले.
भारताला थेट युरोपपर्यंत जोडणारा प्रकल्प म्हणून ‘आयएमईसी’कडे पाहावे लागेल. भारतीय मालाच्या निर्यातीला चालना देणारा, लाखो रोजगाराच्या संधी प्रदान करणारा; तसेच प्रदेशातील भारताचे महत्त्व वाढवणारा हा प्रकल्प आहे. विस्तारवादी चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला समर्थ पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. अमेरिका, ‘युरोपीय महासंघ’ यात भारताचे भागीदार असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ‘जी२०’ राष्ट्रप्रमुखांचे दिल्ली येथील राजघाटावर अनवाणी पायांनी गांधीवंदन केले. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, युकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पचक्र अर्पण केले.