योगशैली - लेखांक १
योग ही एक जीवनशैली आहे. जीवन म्हणजे जन्म व मृत्यू या दोन घटनांतील प्रवास आणि शैली म्हणजे पद्धती. सध्या योगशिक्षण हे फक्त शरीरापुरतेच मर्यादित झाले आहे, असे बहुतांशपणे दिसते. पण, नश्वर शरीर हाच फक्त योगशास्त्राचा उद्देश नाही, तर वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व वैश्विक जीवन स्वस्थ, समृद्ध, सुरक्षित व संपन्न करून जीवनाचे परमोच्च ध्येय साध्य करणे, हा योगशास्त्राचा उद्देश आहे. केवळ योगासनात्मक व्यायाम करणे, प्राणायाम करणे म्हणजे योग करणे (?) की, स्वास्थ्य म्हणजे काय, हे समजून घेऊन त्यानुसार आचरण करणे म्हणजे योग कर
Read More