कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने संपूर्ण जगाला कोरोना लशींचा पुरवठा केला. तशाच प्रकारे, भारताने जगाला टीबीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले असून लवकरच 'भारत बायोटेक'ने मेड इन इंडिया (स्वदेशी) टीबीवरील लशींचे उत्पादन करणार आहे. दरम्यान, कोविड काळात स्वदेशी लसनिर्मितीमध्ये अग्रणी राहिलेली कंपनी भारत बायोटेक देशांतर्गत ४ हजार कोटींची गुंतवणूक करण्याच्या प्रयत्नात आहे.
Read More
‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’बद्दल छापलेल्या खोट्यारड्या लेखांवरून ‘द वायर’च्या ‘लायर’पणावर शिक्कामोर्तब केलेय ते तेलंगणातील जिल्हा न्यायालयाने! निर्लज्जपणाचा आणि खोटारडेपणाचा कळस गाठणार्या पत्रकारितेबद्दल ‘द वायर’ला तेलंगणमधील जिल्हा न्यायालयाने केवळ लाथाडलेच नाही, तर तिची औकात दाखवून देत खोटारडे लेख हटवण्याचे निर्देशही दिले.
भारत बायोटेकतर्फे ‘द वायर’ १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.
भारत बायोटेकने प्रसारमाध्यमांचा खोटेपणा उघडकीस आणला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळवणारी 'कोवॅक्सिन' पहिली भारतीय लस ठरली आहे. या लसीची शेल्फ लाईफ आता १२ महिन्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 'सेंट्रल ड्रग्स स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने कोवॅक्सिन च्या शेल्फ लाईफ ला ६ वरून १२ महिन्यांपर्यंत वाढवली आहे.'- अशी माहिती कोवॅक्सिनचे उत्पादक भारत बायोटेक यांनी दिली.
देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केंद्र सरकारने आता १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. देशातील १२ ते १८ वयोगटातील १ कोटी, ३० लाख मुलांपैकी सुरुवातीला ८० टक्के लसीकरण वेगामध्ये करण्याचे उद्दिष्ट केंद्राने निर्धारित केले आहे. यासाठी लसींच्या २.१० कोटी मात्रांची आवश्यकता पडणार आहे.
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
कोरोनाव्हायरस विरोधात लढ्यात भारताने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. भारतीय बनावटीची आणखी एक स्वदेशी लस तयार झाली आहे आणि परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. आधी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून इंजेक्शन आणि आता नाकावाटे दिली जाणारी लससुद्धा तयार करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरम या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. येत्या १६ जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात १३ ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला आहे.
‘सीरम इन्स्टिट्यूट’ आणि ‘भारत बायोटेक’ या दोन भारतीय कंपन्यांच्या कोरोनारोधी लसींना केंद्र सरकारने मंजुरी दिली आणि एकच गहजब माजवला गेला. भारताच्या यशोगाथेला विरोध करण्यालाच आपले यश मानणार्या तथाकथित उदारमतवाद्यांनी ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चा वापर करण्यावर आक्षेप घेतला. समाजवादी पक्ष, काँग्रेस यांसारख्या राजकीय पक्षांनीदेखील स्वदेशात विकसित केलेल्या भारतीय लसीचा विरोध करता करता अकलेचे तारे तोडले. मात्र, भारतीय कोरोनारोधी लस आणि जगातील अन्य देशांची नेमकी भूमिका काय, हे समजल्यास इथे ‘सीरम इन्स्टिट्यूट’ व