ऑक्टोबर २०२३ साली सुरू झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता अखेर पूर्णविराम मिळाला. अमेरिका, इजिप्त आणि कतारच्या सहयोगाने युद्धविराम यशस्वी झाला. मागच्या दीड वर्षाच्या कालावधीत लाखो निष्पाप नागरिकांचा यामुळे बळी गेला. अशातच आता युद्ध थांबणार असल्याची चिन्हं दिसायला लागली आणि आखाती देशांनी सुटकेचा श्वास घेतला. इस्रायालचे पंतप्रपधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अशातच एक महत्वाची सूचना केली आहे. प्रसारमाध्यमांशी दूरस्थ प्रणालीतून संवाद साधताना नेतान्याहू म्हणाले की युद्धविरामाची बोलणी जर का अपयशी झा
Read More
(Israel) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि माजी संरक्षण मंत्री योव्ह गॅलंट तसेच हमासच्या लष्करी कमांड यांच्याविरोधात युद्ध आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी हेग स्थित इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट (ICC) अर्थात आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने गुरुवार दि. २१ नोव्हेंबर रोजी अटक वॉरंट जारी केले आहे.
हमास आणि इस्रायल मध्ये सुरु असलेल्या युद्धात आता हमासला इस्रायलने मोठा झटका दिला आहे. हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा इस्रायलच्या सैन्याने खात्मा केला आहे.
इस्त्रायल आणि हमासच्या नव्या प्रमुखाचीही हत्या केली. हमासच्या प्रमुखाचे नाव हे याह्या सिनवार (Yahya Sinwar Death) होते. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्याचा तो एका मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच हल्ल्यात १२०० निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला तर २ हजारहून अधिक जण या हल्ल्यात जखमी झाले होते.
इस्त्रायल आणि हमासमध्ये गेल्या एक ते दीड महिन्यापासून युद्ध सुरु आहे. हे युद्ध चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय इस्त्रायल आणि हमासकडून घेण्यात आला होता. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गाझा पट्टीला भेट देत युद्धबंदी झाली असली तरी दहशतवाद संपेपर्यंत हे युद्ध सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
गेल्या अनेक दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असून आता याबाबत काँग्रेस खासदाराने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळमधील काँग्रेस खासदार राजमोहन उन्नीथन यांनी हमास ही दहशतवादी संघटना नसून नेतन्याहूंना गोळ्या घातल्या पाहिजे, असे वक्तव्य केले आहे.
मुंबईस्थित इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता ‘हमास’च्या दहशतवाद्यांकडून गोळा करण्यात आलेल्या दृक्श्राव्य पुराव्यांचे एक विशेष प्रदर्शन पत्रकारांसाठी आयोजित केले होते. इस्रायलचे महावाणिज्य दूत कोबी शोशानी यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांना या प्रदर्शनासाठी विशेषत्वाने आमंत्रित केले. ‘हमास’च्या या नरसंहाराची विषण्णता वाचकांपर्यंतही पोहोचावी म्हणून नेने यांनी या प्रदर्शनानिमित्त शब्दबद्ध केलेले त्यांचे अनुभव.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात आजही अनेक पॅलेस्टिनी अरबांना इस्रायलसोबत सहअस्तित्त्व मान्य नाही. शांतता प्रस्ताव धुडकावून जेव्हा तुम्ही युद्ध लढता तेव्हा तुम्ही तहातही हरता, हे त्यांना समजले नाही. राष्ट्र उभारणीसाठी स्वतःच्या लोकांची जबाबदारी घ्यायची असते. त्यांच्या हिताचा आणि कल्याणाचा विचार करायचा असतो. प्रसंगी कडू निर्णयही त्यांच्या गळी उतरवायचे असतात.
झारखंडमधील जमशेदपूरमध्ये कट्टरपंथी जमावाने इस्त्रायल विरोधी घोषणा दिल्या. दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर ही गर्दी ईदगाह मैदानावर जमली होती. या मेळाव्याचे नेतृत्व तंजीम अहले सुन्नत ओ जमात या संघटनेने केले. यावेळी मशिदीच्या मुफ्तींनी इतर लोकांसह धार्मिक घोषणा देत इस्रायलच्या विनाशासाठी प्रार्थना केली.
इस्रायल-हमास युद्धाचा आज १३वा दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत एकूण १,३०० निष्पाप इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. संकटाच्या काळात इस्रायलला अनेक देशांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. बुधवारीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन इस्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. आज ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आज इस्रायलला पोहोचले आहेत.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात ‘हमास’ या दहशतवादी संघटनेने डाव साधत इस्रायलवर नृशंस हल्ला चढवला. त्यात हजारांच्या वर निरपराध नागरिक मारले गेले, तर तब्बल २०० जणांना ‘हमास’ने ओलीस ठेवले. ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी निरपराधांवर केलेले अमानुष अत्याचार अवघ्या जगाने बघितले.
पाश्चिमात्य देशांमध्ये पश्चिम आशियाबद्दलचे अज्ञान आणि पॅलेस्टाईनच्या लोकांबाबत असलेल्या सहानुभूतीला खतपाणी घालणे, तसेच तेथे मोठ्या संख्येने स्थायिक झालेल्या मुस्लीम लोकांना रस्त्यावर उतरवून आंदोलन करायला उद्युक्त करणे, हा ‘हमास’च्या योजनेचा भाग आहे.
‘हमास’ पूर्णपणे संपेल असे वाटत नाही. दहशतवादी संघटना नवीन नावे धारण करत पुनःपुन्हा निर्माण होत जातात. ‘हमास’ची एक फळी कदाचित यात नष्ट होऊ शकली, तरी पूर्णपणे हा विचार संपवणे शक्य नाही. मात्र, गाझा पट्टीचा नकाशा बदलू शकतो.
इस्रायल-‘हमास’ संघर्षाची ठिणगी पडल्याच्या घटनेला आठवडा पूर्ण झाला. गेल्या आठवड्याभरात इस्रायल आणि गाझा पट्टीतील जीवितहानी आणि वित्तहानी ही तितकीच मन विषण्ण करणारी. त्यामुळे इस्रायल-‘हमास’मधील हा युद्धजन्य संघर्ष पुढे आणखीन किती भीषण रुप धारण करेल, ते पाहावे लागेलच. त्यानिमित्ताने इस्रायल, ज्यूंचा संक्षिप्त इतिहास, पॅॅलेस्टाईनचा प्रश्न, अरब देशांची भूमिका यांसारख्या या विषयाशी निगडित विविध कंगोर्यांचा सविस्तर उहापोह करणारा हा लेख...
‘हमास’च्या नृशंस हल्ल्यानंतर इस्रायलनेही युद्धाची घोषणा करत, पूर्ण ताकदीने गाझा पट्टीत दहशतवाद्यांच्या नायनाटाची मोहीम राबविली. यानिमित्ताने इस्रायलमध्ये काही वर्षांपूर्वी वास्तव्यास असलेल्या, तेथील सामाजिक-धार्मिक समीकरणे जवळून अनुभवलेल्या डॉ. अपर्णा लळिंगकर यांनी एकूणच तेथील सद्यस्थितीवर टाकलेला हा कटाक्ष...
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्त्रायलनेही बदला घेण्याचा निर्णय घेतला आहे. हमाससोबत आता शेवटचे युद्ध करण्याचा इस्त्रायलने निर्णय घेतला आहे. त्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीला लागून असलेल्या सर्व भागांचा ताबा घेतला आहे.
इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने हल्ला केल्यानंतर आता इस्त्रायलनेही हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टी पूर्णपणे सील केली आहे. यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करुन त्यांच्याशी इस्त्रायलमधील परिस्थितीबद्दल संवाद साधला आहे.
निरपराध इस्रायली नागरिकांची कत्तल करणार्या आणि त्यानंतर त्यांच्या मृतदेहांचीही विटंबना करणार्या ‘हमास’ या नरपशूंच्या संघटनेला पाठिंबा देऊन आपण मतपेढीच्या राजकारणापलीकडे विचारच करूच शकत नाही, हे काँग्रेसने सिद्ध केले आहे. सनातन धर्माविरोधात विधाने करणार्यांविरोधात मूग गिळून बसलेल्या काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नाहीच. मुस्लिमांच्या मतांची बेगमी करण्याचे काँग्रेसचे हे धोरण म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखेच!
इराणसारखी मुस्लीम राष्ट्रे या हल्ल्याचे समर्थन करीत आहेत. दहशतवादास पाठिंबा देणार्या आणि त्यांना सर्वप्रकारची मदत करणार्या देशांचाही बंदोबस्त करायला हवा. आपल्या शत्रूचे नाक कसे ठेचायचे, हे इस्रायलला पुरेपूर ठाऊक आहे.
पॅलेस्टिनी अतिरेकी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर केलेल्या रॉकेट हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. हा दहशतवादी हल्ला असून भारत निष्पाप पिडीतांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सरकार वाचवण्यासाठी आपले राजकीय भवितव्य पणाला लावण्याची तयारी नसल्यामुळे बेनेट यांनी आपल्याच पक्षातील सहकार्यांना न विचारता सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यायी पंतप्रधान याइर लापिड यांना विश्वासात घेऊन तो घोषितही केला. आजच्या परिस्थितीत इस्रायलमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या तरी त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे
बॉलीवुड कलाकार उर्वशी रौतेला हिने इस्त्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना दिलेल्या भेटवस्तूची चर्चा जगभरात होत आहे. पंतप्रधान मोदींचे मित्र नेत्यानाहू यांची रौताला हीने भेट घेतली. या भेटीत नेतन्याहू यांना तिने भगवद् गीता प्रदान केली आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे तिने ही माहिती दिली.
इस्रायलमधील नव्या नेफ्ताली बेनेट यांच्या आठ पक्षांच्या सरकारमध्ये पंतप्रधानांना फक्त आपल्या पक्षाचेच मंत्री मंत्रिमंडळातून काढता येणार आहेत आणि केवळ एकचे बहुमत असल्यामुळे आपल्या पक्षातील मंत्र्याला कितीही गंभीर कारण असले तरी काढणे अवघड ठरणार आहे. थोडक्यात, पायाखाली तलवारीची धार आणि डोक्यावर बेंजामिन नेतान्याहू यांची टांगती तलवार, अशी कसरत या सरकारला करावी लागणार आहे, ते ती किती काळ करते यावरच या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.
‘फ्रंटलाईन वर्कर्स’ आणि ‘कोरोना योद्ध्यां’ना. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वस्वी कौतुकास्पद असून, त्यांनी एक नवीन राजकीय पायंडा पाडल्याचे म्हणता येईल.
भारतासह जगभरातील देशांमध्ये कोरोना विषाणूची दहशत आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा हा हजारावर पोहोचला असून या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची आकडेवारी त्याहून अधिक आहे. अशातच इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी कोरोना व्हायरसच्या बचावासाठी एक आवाहन केले आहे. हस्तांदोलन करू नका भारतीय संस्कृतीत ज्या प्रमाणे नमस्ते केले जाते, तसे अभिवादन एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर करा, त्यामुळे या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. बेंजामिन यांच्या या वक्तव्याची माहिती भारतातील इस्त्रायली राजदूतांनी ट्विटरद्वारे केली आहे.
कित्येक इस्लामी देशांनी भारताशी सहकार्याचे धोरण स्वीकारले आणि आताची जागतिक परिस्थिती अशी आहे की, कोणताही इस्लामी देश सरळ सरळ भारताचा विरोध करू शकत नाही. म्हणजेच मोदींचे परराष्ट्र धोरण योग्यप्रकारे कार्यरत असल्याचे यातून स्पष्ट होते.
अमेरिका आणि चीनमधील व्यापारी युद्धं चालू असताना आणखी युद्ध कोणालाच नको आहे. अमेरिकेचे सैन्य आखातातून आणि अन्य युद्धभूमींतून माघारी आणण्याच्या आश्वासनावर अध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रम्प आपल्या वक्तव्यांनी अमेरिकेला युद्धखोरीकडे नेत आहेत. इराणचे आयातुल्ला खोमेनी आणि अन्य उग्रवादी नेते या आगीत तेल ओतत आहेत.
इस्रायल निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची स्थिती अवघड होती. अॅटर्नी जनरल आपल्याच पंतप्रधानास भ्रष्ट ठरविण्याच्या मागे लागलेले होते आणि समोर माजी लष्करप्रमुख जनरल बेनी गॅन्झ आव्हान देत होते. अशा कोंडीत सापडलेल्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यातील कमांडोने अॅटर्नी जनरल व जनरल दोघांवर मात करीत इस्रायलची निवडणूक जिंकली.
लोकसभा निवडणूकांसाठी भाजपकडून मै भी चौकीदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. सोशल मीडियावर ही मोहीम हीट ठरली आहे. इथल्या निवडणुकीत सध्या 'चौकीदार' हा शब्द सुपरहिट ठरला आहे. दुसरीकडे मित्रराष्ट्र असलेल्या इस्रायलमध्येही मंगळवारी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. तेथील निवडणुकीतही 'चौकीदार' मोहीम प्रचंड लोकप्रिय होत आहे.
नेतान्याहूंनी भारत-इस्रायल संबंधांना विशेष महत्त्व दिले. २०१५ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इस्रायलला गेले असता नेतान्याहूंनी राजशिष्टाचाराला बगल देऊन त्यांची भेट घेतली. जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेले असता, त्यांनी जवळपास तीन संपूर्ण दिवस मोदींसमवेत घालवले. जानेवारी २०१८ मध्ये इस्रायलचे आजवरचे सर्वात मोठे व्यापारी शिष्टमंडळ घेऊन नेतान्याहू भारतात आले होते.
इस्रायलमध्येही पंतप्रधानांच्या निवासस्थानी स्वादिष्ट जेवण बनविणार्या महाराजांची फौज तैनात असतेच. पण, इस्रायली पंतप्रधानांच्या पत्नीला कदाचित ते जेवण रुचकर वाटले नसावे.