बारामती लोकसभेचा कौल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या युगेंद्र पवार यांची बारामती कुस्तीगीर परिषदेवरून हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. युगेंद्र हे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे पूत्र आहेत.अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर बारामतीत लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पेटला. या संघर्षात दादांचे बंधू श्रीनिवास यांनी शरद पवार आणि सुप्रिया यांची साथ दिली. त्यांचे पूत्र युगेंद्र या सर्वात आघाडीवर होते. त्यांनी बारामती विधानसभेचा कोपरान् कोपरा पिंजून काढत सुप्रिया सुळें
Read More
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजतापासून सुरुवात झाली असून यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांचच लक्ष लागून आहे. बारामतीत यंदा सुप्रीया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला होता. दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार याठिकाणी सध्या सुप्रीया सुळे आघाडीवर दिसत आहेत.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या आहेत. मतदान केल्यानंतर त्या अजितदादांच्या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच त्यांच्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सोशल मीडियावर गैरसमज पसरवणं हे रोहित पवारांचं एकमेव काम आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. निवडणूकीमध्ये अजित पवार गटाने पैसे वाटले असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. यावर आता अजितदादांनी प्रत्युत्तर दिले आहे.
माझ्यासोबत माझी आई आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं आहे. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मतदानानंतर अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या आईची भेट घेतली होती. यावरून आता माझ्यासोबत माझी आई आहे असं म्हणत अजितदादांनी त्यांना सुनावलं आहे.
राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ११ मतदारसंघांमध्ये मंगळवारी मतदान पार पडलं. या मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले आहे. यापैकी बारामतीमध्ये सर्वात कमी तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले आहे.
बारामती लोकसभेत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार राजकारण तापलं आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची नक्कल केली आहे. तसेच बारामतीकर ही नौटंकी सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत.
लग्न झाल्यावर बहिणीने जास्त दिवस भावाच्या घरी राहू नये, असा खोटक टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते सध्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर आहेत.
बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला. इतकी वर्षे अनेकांनी प्रयत्न करून पाहिले, परंतु कोणालाच या बालेकिल्ल्याला सुरुंग लावता आला नाही. मात्र, यंदा राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे या लोकसभा मतदारसंघातील हवा पूर्णतः पालटलेली दिसते. पवारकन्या सुप्रिया सुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे चुलत बंधू अजित पवार आता पूर्ण ताकदीने त्यांच्या विरोधात उतरले आहेत.
माझी ही वैयक्तिक लढाई नसून विचारांची लढाई आहे, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेसाठी गुरुवारी अर्ज दाखल केला. त्याआधी सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.
बारामती लोकसभेच्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आज माझ्यासाठी मोठा दिवस आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रचारार्थ सभाही आयोजित करण्यात आली होती.
बारामती लोकसभेत यंदा नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. मात्र, आता या लढाईत एक नवीन ट्विस्ट आला आहे. बारामती लोकसभेतून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्ज भरला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी निवडणूकीसाठी डमी अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे.
बारामतीमध्ये परिवर्तन करण्याची वेळ आली असून आता अबकी बार सुनेत्राताई पवार. कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. गुरुवारी बारामतीतील महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुणे येथे आयोजित महायूतीच्या सभेत ते बोलत होते.
सुनेला पाठवा दिल्लीत आणि लेकीला राहूद्या गल्लीत, असा खोचक टोला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचें नाव न घेता लगावला आहे. गुरुवारी महायूतीच्या बारामतीतील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्या प्रचारार्थ पुण्यात महायूतीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.
विजय शिवतारेंनी निवडणूकीतून माघार घेऊ नये यासाठी त्यांना रात्री फोन आले असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच नुसती संसदेत भाषणं करुन बारामतीचा विकास होत नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता लगावला आहे. ते मंगळवारी बारामतीतील सभेत बोलत होते.
बारामतीतील १०० टक्के कामं मी केलेली आहेत. परंतू, काहींनी स्वत:च्या पुस्तकात हे आम्हीच केलं आहे, असं दिलं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. ते मंगळवारी बारामतीतील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित केले.
बारामती लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंना तर महायूतीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शनिवारी या दोन्ही नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. विजय शिवतारेंनी बारामतीत दोन्ही पवारांविरुद्ध दंड थोपटत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निश्चय केला होता. मात्र, आता त्यांनी या निवडणूकीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शनिवारी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
निव्वळ सेल्फी काढत फिरल्याने आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत, असा खोचक टोला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना लगावला आहे. त्यांनी सोमवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडेन, असे विधान शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी केले आहे. विजय शिवतारेंनी बारामतीतून पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. ते शनिवारी इंदापूर दौऱ्यावर असून त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
काही वृत्तवाहिन्या मी माघार घेतल्याची बातमी प्रसारित करीत असून ती बातमी खोटी असल्याचे शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी म्हटले आहे. विजय शिवतारेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबतच्या बातमीवर स्पष्टीकरण दिले आहे.
केवळ पवार पवार करण्याऐवजी आपला स्वाभिमान जागृत करुन आपण लढायला हवं, असे म्हणत शिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामतीतून लोकसभा निवडणुक लढवण्याचा निश्चय केला आहे. बुधवारी बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
पुणे: अजित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल शुक्रवारी कर्जत येथिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन सभेत अनेक गौप्यस्फोट केले होते त्याला शरद पवार यांनी प्रतिउत्तर दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्च 2024 च्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूका होतील असा अंदाज वर्तवला आहे. त्याचबरोबर लोकसभेला अजित पवार गट चार जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कर्जत येथे सुरू असलेल्या राष्ट्रवादी च्या राज्यव्यापी शिबिरात ते बोलत होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची बारामतीमध्ये सभा होणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले. येत्या १९ एप्रिल रोजी बारामतीमध्ये शाह यांची सभा होणार असून त्याच दिवशी खडकवासला येथे प्रचार सभा होणार