मुंबई : इंग्रजी नववर्षाचे स्वागत हे सर्व ठिकाणी जल्लोषात करण्यात आले. नववर्षाची चांगली सुरूवात करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ( Siddhivinayak Temple ) सकाळी गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. २०२५ हे इंग्रजी नववर्ष सुखाचे, समाधानाचे व समृध्दीचे जावो अशी प्रार्थना करत सर्व भाविकांनी आपल्या नववर्षाची सुरुवात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन केले.
Read More
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये 30 जणांनी इस्लाम धर्म सोडून सनातनमध्ये घरवापसी केली आहे. यासोबतच त्यांनी आपली इस्लामिक नावे सोडून हिंदू नावे धारण केली आहेत. हिंदू धर्मात घरवापसी करण्यासाठी विशेष विधी आयोजित करण्यात आला होता. या सर्वांनी धर्म सोडण्यासाठी कायदेशीर अर्जही केला आहे.
"निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी!" असे म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी सर्व भाविकांनी अगदी जड अंतःकरणाने निरोप दिला. मुंबईच्या समुद्रकिनारी झालेली भाविकांची गर्दी, बाप्पाला निरोप देताना पाणावलेले भाविकांचे डोळे आणि "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा जयघोषाने दुमदुमलेली मुंबापुरी म्हणजे मुंबईतील अनंत चतुर्दशीचे खरे वर्णन.
मालाड पश्चिम येथील श्री साई दर्शन मित्र मंडळ गेल्या ११ वर्षापासुन इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करत आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पनांयुक्त संदेशात्मक बाप्पाचे रूप ते आकारतात. यावर्षीसुद्धा त्यांनी बाप्पाच्या मुर्तीतून नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि... असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३६ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.
बदलापुरात योगासने करणारा गणपती असा देखावा असणारा लक्ष वेधून घेतो आहे. सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करणाऱ्या नरेकर कुटुंबीयांनी यंदा योगाचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला आहे. योगाचे महत्व सांगताना गणपती स्वतः पद्मासन घालून बसलेला आहे. तर गणेशाचे वाहन असलेले पाच उंदीर वेगवेगळे आसन करत आहेत.
मुंबईतील गणेशोत्सव म्हंटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन एकाच क्लिक वर आता होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं छोटसं पाऊल हे आहे. 'हॅशटॅग बाप्पा' या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
"गणपती बाप्पा मोरया..." म्हटल्यानंतर एक वेगळीच उर्जा अंगात संचारते. गणरायाच्या आगमनाने चैतन्याचे आणि उत्साहाचे वातावरण सगळीकडेच अनुभवण्यास मिळते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही गणरायाच्या आगमनाची आणि गणेशोत्सवाची अनेक गाणी खरं तर सुपरहिट आहेत आणि जी मिरवणूकीत वाजवली नाही तर हा उत्सव खरंच अपुर्ण वाटेल. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील गणपती बाप्पाची काही खास गाणी जाणून घेऊयात...
बोबडे बोल बोलायच्या वयात भिवंडी येथील साईराज या छोट्या मुलाने कोरस देणार्या आपल्या लहान गोंडस बहिणीसह गायलेले हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. रिक्षा स्टॅण्ड, एसटी बससह रेल्वेत बाहुगर्दीत हे गाणे मोबाईलवर वाजत आहे. हे गाणे आपल्या घरातील लहान मुले बोबड्या बोलीत सतत गुणगुणतात.
`फ्रेंड्स ऑफ बीजेपी'तर्फे ठाण्यात गणेशोत्सवात `सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व `फ्रेंड्स ऑफ बीजेपी'चे शहर संयोजक दत्ता घाडगे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून झालेली स्पर्धा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
मुंबईतील गणेशोत्सव म्हटला तर बाप्पाचा जयघोष आणि सार्वजनिक मंडळांची ऐट पहायला मिळते. मुंबईतील या गणेश मंडळाचे दर्शन आता एकाच क्लिकवर होऊ शकणार आहे. आपला उत्सव जागतिक दर्जावर पोहचवण्यासाठी आम्ही उचलेलं हे छोटसं पाऊल आहे. हॅशटॅग बाप्पा या संकेतस्थळाद्वारे ते शक्य होणार आहे.
मुस्लीमबहुल परिसरातील आपल्या घरात देश-विदेशातील हजारो गणपती बाप्पांना आसनस्थ करणार्या ठाण्यातील दिलीप वैती या अवलियाविषयी...
पुणे : गणेशोत्सवाची खरी धामधूम सुरू होते,गणेशमूर्तींच्या खरेदीने. गणेशमूर्तीची निवड करणे म्हणजे गणेशभक्तांची खरी कसोटी.गणेशाची अनेक सुंदर रूपं मोह घालतात. त्यांचे रंगीत पितांबर व उपरणे आणि सगळा साज जितका सुंदर तितके मन हरखून जाते आणि अशी सुंदर मूर्ती घरच्या गणेश स्थापनेसाठी निवडली जाते. सार्वजनिक गणेश मंडळांचा तर जास्तीत जास्त भव्य मूर्ती घेण्याकडे कल असतो. पण मूर्ती कितीही सुंदर असल्या तरी विसर्जनानंतर मात्र पर्यावरणाची मोठी समस्या निर्माण करतात. पाण्यात न विरघळणारे प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि विविध रसायनयुक्त प
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर अनेकदा अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषेत टीका केली. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन नार्वेकर कुटुंबियांची भेट घेतली व गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कशी सुरू आहे गणपत्ती बाप्पाच्या आगमनाची तयारी? : मूर्तिकार प्रदीप मादुस्कर उलगडतायत श्रीगणेशाचे वैभवसंपन्न रुप...
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात, आपल्या सर्वांनाच हे जाणवले असेलच की, बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा आपल्याला निसर्गाचा आशीर्वाद लाभणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना जणू निसर्गाने दिलेली धोक्याची सूचनाच होती. आरोग्यविषक चिंता वाढत असताना आणि ‘कोविड-19’ चा सर्रास होणारा प्रसार सरते शेवटी नियंत्रणात आणला जात असताना, आपला देश गणेश चतुर्थीचा, सगळ्यांच्या आवडीचा असा सण साजरा करण्यास सज्ज होत आहे. पण, महामारीच्या माध्यमातून आपण सगळे आपल्या या कठीण काळापासून काही शिकलो आहोत का? याचाच ऊहापोह करणारा हा लेख...
पावसाने उघडीप दिली असली तरी अधुनमधून पावसाची जोरदार सर कोसळत असल्याने ठाण्यातील रस्त्यांच्या डागडुजीचे पितळ उघडे पडले आहे. रस्त्यांची अवस्थाच बिकट बनल्याने गणपती बाप्पांचे स्वागतही खड्डेमय रस्त्यातुनच करावे लागणार असल्याचा आरोप मनसेच्या जनहित विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महींद्रकर यांनी केला आहे. रस्त्यांसाठी ठाणे महापालिकेत तीन महिन्यांपूर्वी १८३ कोटीं मंजूर होऊनही शहरातील १२७ रस्त्यांपैकी बहुतांश रस्त्यांच्या कामाला अद्याप सुरूवातदेखील झालेली नाही.तसेच, दोनच कॉन्ट्रॅक्टर नेमल्याने ही कामे सब कॉन्ट्र
दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला निरोप कोरोनामुळे यंदाही गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून दीड दिवसाच्या आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वत्र निरोप देण्यात आला. आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप देतांना “गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या" अशी प्रार्थना केली जाते.
या गणेश भावांगणी...गणेशस्तवन बुद्धिप्रदाता, सकलमतीप्रकाश, वाणी विद्यांचे सार, सुखाचे गव्हर असलेले गणाध्यक्ष महाराजाधिराज मंगलमूर्ती श्रीगणराज आपल्या सगळ्यांच्या भावांगणी यावे आणि सकळ दुष्कृत शमन करावे हीच गणेशोत्सवाच्या प्रारंभी मंगलमूर्ती विनायकाला मनोभावे प्रार्थना!
आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे प्रवासाची सोय करणारी मोदी एक्सप्रेस दादरहून कोकणात जाण्यासाठी रवाना झाली. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत चाकरमानी गणेशोत्सावासाठी निघाले. दादर रेल्वे स्थानकाहून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखविला.
देशात कुठेही घडलेल्या जातीय तणावावर, दंगलीवर वारंवार लिहिले जाते असा अनुभव आहे. लोकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने ते गरजेचे असते हे खरेच, पण अशा दुर्दैवी घटना विविध कारणाने आणि विविध माध्यमांवर वर्षानुवर्षे उगाळल्या जाताना दिसतात. दुसरीकडे स्थानिक पातळीवर विशेष प्रख्यात नसलेल्या माणसांनी परस्पर सामंजस्याच्या केलेल्या विविध लहान-मोठ्या प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि ते प्रयत्न स्मरणाआड होतात.आज अशा प्रयत्नांना एकत्रितपणे वाचकांसमोर आणणार आहे; जेणेकरून विद्वेषाच्या काळ्या बातम्यांच्या बरोबरीने य
विद्येची देवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणरायाची प्रतिष्ठापना केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरातील विविध ठिकाणी केली जाते. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनीही लाडक्या बाप्पाला घरी आणले आहे. तिथे शिकत असलेल्या आपल्या हॉस्टेलमध्ये त्यांनी गणेशोत्सव साजरा केला.
शेमारू स्पीकर्स तर्फे गणेशोत्सव साजरा करा
गणेशोत्सव कोकणातील असो किंवा मुंबईतील तो सगळीकडे धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा मात्र, लॉकडाऊन आणि कोरोनाच्या दहशतीमुळे गणेशभक्तांमंध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. परिस्थिती येत्या दोन महिन्यांत नियंत्रणात आली नाही तर गणेशोत्सवाचे काय, असा प्रश्न गणेश मंडळांपुढे उभा आहे. यासह मूर्तींकार, सजावट करणारे आणि अन्य व्यापाऱ्यांमध्येही संभ्रम आहे.
'सन ऑफ सरदार' आणि 'अतिथी तुम कब जाओगे' या चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्विनी धीर पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहेत.
येथील बांभोरी नाका परिसरातील पोदार स्कूलनजिकच्या संत जलाराम बाप्पा मंदिरात संत जलाराम बाप्पा यांची 219 वी जयंती आनंद व भक्तीमय वातावरणात बुधवारी पार पडली.
आज अनंत चतुर्दशी निमित्त 11 दिवसाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सगळीकडे सुरुवात झाली असून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जनसागर लोटला आहे. 'पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.
संपूर्ण देशात आंनदाचे, उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. सगळ्यांचाच लाडका पाहुणा गणपती बाप्पा वाजतगाजत घरोघरी आला आहे.