यपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या चेंगराचेंगरी प्रकरणाच्या दोषीना ६ जून रोजी अटक केली होती, त्यात मुख्यत: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) चे मार्केटिंग प्रमुख निखिल सोसाळे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनएशी संबंधित तीन जण होते. या प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवार, दि. १२ जून रोजी या सर्वाना अंतरिम जामीन मंजूर केला.
Read More
आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी) चा विजय झाल्यामुळे बंगळुरूस्थित एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ५ जूनला विजयोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू(आरसीबी)आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांना थेट जबाबदार धरले, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला. कर्नाटक सरकारने बुधवारी, दि. ११ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आण
(G Madhavi Latha) जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ६ जून रोजी करण्यात आले. या पूलाच्या बांधकामाने भारतीय अभियांत्रिकी क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूच्या एका प्राध्यापिकेने या पूलाच्या बांधकाम प्रकल्पासाठी गेली १७ वर्षे स्वतःला वाहून घेतले. आयआयएससी सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील रॉक इंजिनिअरिंग तज्ज्ञ जी. माधवी लता यांनी चिनाब पूलाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावली.
बंगळुरूमध्ये एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार केलेल्या आरोपाखाली एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. पीडित महिलेसोबत ही घटना घडली असून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबललाही अटक करण्यात आली आहे.
IPL 2025 हा भारतीय क्रिकेट रसिकांसाठी एक मोठा सोहळा आहे. आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या १८ व्या हंगामाची सुरुवात २२ मार्च पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या दिवशी गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल्स चॅलेजर्स बंगळुरूदरम्यान पहिला सामना होणार आहे. तर २५ मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना होणार असल्याची माहिती समोर आली.
Bangalore कर्नाटकातील रायचूर शहरामध्ये मुबिन नावाच्या एका कट्टरपंथी युवकाने एका युवतीला निकाह करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र त्या प्रस्तावास नकार दिल्याने कट्टरपंथी मुबिनने युवतीची हत्या केली आहे. ही घटना ३० जानेवारी २०२५ रोजी घडली असल्याचे वृत्त आहे.
raped कर्नाटकातील मंड्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नावाला काळीमा लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहीत शिक्षकाने दोन महिन्यांआधी त्याच्या अल्पवयीन विद्यार्थींनीसोबत पळून गेल्याने संबंधित शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्यांची मुलगी वर्गातून न परतली नसल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी अभिषेक गौंडा नावाच्या शिक्षकाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
(HMPV) चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसप्रमाणे ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसने थैमान घातले आहे. चीनमधील एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे अन्य देशांसह भारतातही चिंता वाढली आहे. अशातच या विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आता भारतामध्येही आढळून आला आहे. या माहितीनंतर देशपातळीसह राज्यपातळीवरील आरोग्य विभाग सतर्क झाले आहेत.
ठाणे : वाहतुक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने रस्ते वाहतुकीसोबतच आता हवेतील बस वाहतुकीला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. यासाठी बेंगलोरच्या धर्तीवर एमएमआर क्षेत्रात रोप वे द्वारे बस वाहतुकीची संकल्पना राज्याचे नूतन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ) यांनी व्यक्त केली आहे. सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
Atul Subhash case एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या बंगळुरू येथील आत्महत्येच्या प्रकरणाच्या तापासातून एक बाब उघड झाली आहे. अतुल सुभाष यांची पत्नी निकीता सिंघानियाला त्यांच्याशी विवाह करायचा नव्हता. वडिलांची प्रकृती अस्थिर असल्याने घरच्यांच्या दबावाखाली निकिताने अतुलशी विवाह केला आणि नंतर प्रत्येक गोष्टींची किंवा घटनेची माहिती तिची आई निशाला देत असायची.
Sarfaraj Khan टीम इंडिया विरूद्ध न्यूझीलंडच्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दि: २० ऑक्टोबर रोजी बंगळूरु येथे दारूण पराभव झाला. मात्र या कसोटी सामन्यांमध्ये काही खेळाडूंनी केलेल्या खेळीमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यात टीम इंडियाचा नवखा खेळाडू उत्कृष्ठ फलंदाज सर्फराज खानने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याने अनेक क्रिकेट रसिकांची मने जिंकूण घेतली आहेत. एम चिन्नास्वामी स्टेडियम खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी सरफराज खानने आंतरराष्ट्रीय शतक झळकवत तिसऱ्या दिवशी ७० धावांहून अधिक धावसंख्य
कर्नाटकची राजधानी बंगळुरू ही भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाते. पण, काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यापासून बंगळुरूच्या आयटी क्षेत्राला धक्के दिले जात आहेत. आता कर्नाटक सरकार एक नवीन कायदा आणत आहे, ज्या अंतर्गत आयटी कर्मचाऱ्यांना दिवसाचे १४ तास काम करावे लागणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने हा कायदा केल्यास आयटी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना अधिक वेळ कार्यालयात घालवावा लागेल.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने रामनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याचा घाट घातला आहे. कर्नाटक सरकारमध्ये उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सादर केला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मंगळवार, दि. ९ जुलै कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून बेंगळुरू दक्षिण जिल्ह्या असे करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे सादर केला.
रात्री उशिरापर्यंत पब चालू ठेवल्यामुळे कर्नाटकच्या बेंगळुरू पोलिसांनी रविवार, दि. ७ जुलै २०२४ कारवाई केली. पोलिसांनी कारवाई करत शहरातील अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर नोंदवला. यापैकी एक पब क्रिकेटर विराट कोहलीच्या मालकीचाही आहे, ज्याचे नाव वन8 कम्युन पब आहे.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे वारंवार होणाऱ्या बलात्कारामुळे १३ वर्षांची मुलगी गरोदर राहिली. या अल्पवयीन मुलीच्या अंतर्गत दुखापतींमुळे आरोग्याची गुंतागुंत आणि अनेक अवयव निकामी झाले. यानंतर तिचा मृत्यू झाला. ३० वर्षीय मिर्झा सरफराज याने अनेक महिने मुलीवर बलात्कार केला.
बेंगळुरू येथील एका न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ७ जून २०२४ रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधींना कोणत्याही परिस्थितीत हजर राहावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपच्या एका नेत्याने दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. हे प्रकरण २०२३ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपविरोधात दिशाभूल करणाऱ्या जाहिराती चालवण्याशी संबंधित आहे.
स्पीकरवर हनुमान चालीसा लावल्यामुळे दि. १७ मार्च २०२४ रोजी मुकेश यांना कर्नाटकातील बेंगळुरू येथे त्यांच्या दुकानात घुसून मारहाण करण्यात आली होती. 'नमाज'च्या वेळी ते त्याच्या दुकानात हनुमान चालिसा ऐकत होते. त्यामुळे कट्टरपंथींयाकडून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यातच आता मेहजबीन नावाच्या महिलेने पीडित मुकेशविरोधात एफआयआर दाखल केला आहे.
शुक्रवार, दि. १ मार्च रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील (Bomb Blast) आरोपींबाबत अधिक माहिती समोर येत आहे. या स्फोटाचा तपास आता एनआयएच्या हाती आहे. एनआयएने स्फोटातील संशयिताचा फोटो जारी करून बक्षीस जाहीर केले आहे. स्फोटातील संशयिताचे बस आणि कॅफेमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत.
भारतीय संस्कृतीत मातेला फार मोठे महत्त्व आहे. मातेची प्रतिमा कोमल हृदय, मृदू, दयाळू दाखविण्यात आली आहे, तर दुसरीकडे मातेच्या क्रूर कृत्याचाही उल्लेख वेळोवेळी आढळतो. त्यातूनच ‘माता न तूं, वैरिणी’ असेही म्हटले जाते. मातेची ही विविध रुपे आजच्या युगात दिसून येतात. बुद्धिजीवी व्यवसायात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे, नावलौकिक प्राप्त केलेली सूचना सेठ या महिलेने गोव्यात आपल्याच मुलाची हत्या केली. सूचना सेठ हे नाव कार्पोरेट जगतात सुपरिचत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाच्या स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानातून दि. २५ नोव्हेंबर २०२३, शनिवारी उड्डाण भरले. त्यांनी बंगलोर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या सुविधेला भेट दिली होती. या प्रवासाचा अनुभव शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
२३ जून २०२३ ला बिहारच्या राजधानीमध्ये देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या स्वागताचे पोस्टर्स लागले होते. कारण होत, पाटनामध्ये होणारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक. बैठक झाली केजरीवाल रुसले. पण पुढच्या बैठकीची तारीख ठरली. यानंतर एका महिन्याच्या आत विरोधी आघाडीची दुसरी बैठक बंगलोरमध्ये पार पडली, या बैठकीत या विरोधी आघाडीचे नावं पण ठरले, इंडी आघाडी. यानंतर अवघ्या दीड महिन्यात इंडी आघाडीची तिसरी बैठक पार पडली, मुंबईत. या बैठकीत विशेष काही घडलं नाही. पण एक समन्वय समिती जाहीर झाली.
आयकर विभागाने करचुकवेगिरीच्या संशयावरून बंगलोरमधील काँग्रेसच्या माजी नगरसेवीकेच्या घरी छापे टाकले होते. बेंगळुरूमध्ये गुरुवारी मध्यरात्री आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एका फ्लॅटमधून ४२ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना बेंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये पलंगाखाली करोडो रुपयांची रोकड सापडली, अशी माहिती शुक्रवारी सूत्रांनी दिली.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बुधवारी पहिले दोन सीटर लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस विमान भारतीय हवाईदलाला सुपूर्द केले आहे. हे विमान भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याकडे बेंगळुरू येथे सुपूर्द करण्यात आले आहे.
मराठी भाषेची, माणसाची आणि सरतेशेवटी महाराष्ट्राची गळचेपी होत असल्याची ओरड म्हणा अनेक दशकांपासूनची. अलीकडेच मुलुंडमध्ये एका मराठी महिला व्यावसायिकाला सोसायटीत गुजराती माणसाने घर नाकारल्याचे प्रकरण समोर आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरवणीवर आला.
र्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यापासून कट्टरपंथीयांच्या उपद्रवामध्ये वाढ झाली आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२३ रोजी ईद मिलाद मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली आहे अनेक वाहने आणि घरांनाही लक्ष्य करण्यात आले. या मिरवणुकीची व्हायरल झालेली छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये अखंड भारताचा नकाशा हिरव्या रंगाने रंगवण्यात आला असून त्यावर मुघल शासक औरंगजेबाचे चित्र छापण्यात आले आहे. इस्लामिक शासक टिपू सुलतान आणि त्याच्या तलवारीचे कटआउट देखील प्रदर्शनात होते.
अपेक्षेप्रमाणे ‘शिवशक्ती’ नामकरणावर २६ तुतार्या वाजणार, हे नक्की होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील त्याची पूर्ण कल्पना असणार. परंतु, यावेळी त्यांनी २६ तुतार्या वाजाव्यात. म्हणून हे नामकरण केलेले नाही. ते उत्स्फूर्तपणे बोलले. जे अंतर्मनात असतं, ते उत्स्फूर्तपणे येतं. ‘शिवशक्ती’ म्हणजे ‘विश्व कल्याण करणारी शक्ती.’ आपली वैज्ञानिक प्रगती ही विश्वकल्याणासाठीच आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आहे. हे मोदी यांनी पुन्हा स्पष्ट केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसच्या दौऱ्यावरून परतताना थेट बंगळुरू आणि तेथून इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि इस्रोचे कमांड सेंटर पाहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला शास्त्रज्ञांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान २ च्या क्रॅश लँडिंगचीही आठवण केली. त्यांनी चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ च्या लँडिंग पॉइंट्सनाही नाव दिले. तसेच तरुणांना प्रेरणा देत राहण्यासाठी आणखी एक निर्णय पंतप्रधानांनी घेतला. त
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसच्या दौऱ्यावरून परतताना थेट बंगळुरू आणि तेथून इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे पंतप्रधान मोदींनी चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करणाऱ्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि इस्रोचे कमांड सेंटर पाहिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला शास्त्रज्ञांना अभिवादन केले. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान २ च्या क्रॅश लँडिंगचीही आठवण केली. त्यांनी चांद्रयान २ आणि चांद्रयान ३ च्या लँडिंग पॉइंट्सनाही नाव दिले.
प्रशासनामध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि ते अधिक कार्यक्षम, समावेशक, वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी देशात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी सायंकाळी दिल्ली लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एकमताने दिल्लीच्या सातही जागा लढविण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे दिल्लीमध्येच काय; पण केजरीवाल यांच्यासोबत देशभरात कोठेही सहकार्य करू नये, असा आग्रहही अनेक नेत्यांनी राहुल गांधी आणि खर्गे यांच्याकडे धरल्याचे समजते.
देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी बंगळुरू येथील वासवी कन्व्हेन्शन हॉलमध्ये राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे उपस्थित होते.
कर्नाटकातील उडुपी येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाथरूममध्ये हिंदू विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ बनवल्या प्रकरणी पोलिसांनी तीन मुस्लिम विद्यार्थिनींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दुसरीकडे, काँग्रेसशासित कर्नाटक सरकारमधील गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा म्हणाले की, उडुपीची घटना अतिशय छोटी आहे आणि त्याला राजकीय रंग देण्याची गरज नाही.
केंद्र सरकारविरोधातील अविश्वास ठराव नामंजूर होणारच आहे. मात्र, अविश्वास ठरावावरील चर्चा केवळ मणिपूरपुरतीच मर्यादित ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. कारण, मणिपूरवर पंतप्रधानांना उत्तर देण्यास भाग पाडण्यासाठीच अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. मात्र, ही चर्चा केवळ मणिपूर पुरतीच मर्यादित राहणार नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदन दास देवी यांचे सोमवार, दि. २४ जुलै रोजी सकाळी बंगलोर येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. अजित दादांच्या बंडानंतर ही पहिलीच भेट होती. यानंतर ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. अजितदादांकडे तिजोरीच्या चाव्या म्हणून त्यांना भेटलो, असं ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच, आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बंगळुरू शहरामध्ये दहशतवादी कृत्य करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या सोहेल, उमर, मुदासिर, जाहिद आणि फैसल या पाच संशयित दहशतवाद्यांना बंगळुरू पोलिसांनी अटक करून त्यांचा कट उधळला आहे. याप्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात यावी, अशी मागणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे.
कर्नाटक पोलिसांनी ३७ वर्षीय सय्यद मोहम्मद अन्वर याला अटक केली आहे. बेंगळुरूमधील मशिदीवर झालेल्या दहशतवादी हल्ला होणार असल्याची खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यांने मशिदीत बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगितले होते. पोलिसांनी संपूर्ण मशिदीची झडती घेतली मात्र कुठेही बॉम्ब सापडला नाही. अखेर ही माहिती देणाऱ्या अन्वरचा शोध घेण्यात आला. आणि १० जुलै रोजी त्याला अटक करण्यात आले. चौकशीत त्याने मशिदीत राहण्याची सोय नसल्यामुळे खोटी माहिती पसरवल्याचे सांगितले.
अमेरिका लवकरच बंगलोर आणि अहमदाबाद येथे नवीन वाणिज्य दूतावास चालू करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. अमेरिकेच्या एच-१बी व्हिसाचा भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात लाभ घेतात.
बंगळुरु : जगभरात मंदीचे सावट असताना भारतात मात्र उद्योगधंद्यांना पोषक वातावरण तयार होत आहे. त्यातच SAP लॅब्स इंडियाने ग्राउंडब्रेकिंग समारंभाद्वारे बेंगळुरूमध्ये त्याच्या दुसऱ्या कॅम्पसच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या केंद्रामुळे १५ हजार नोकऱ्या निर्माण होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. भारतातील आयटी हब म्हणून गणले जाणारे बंगळुरु हे शहर जागतिक स्तरावर SAP चे सर्वात मोठे R&D हब आहे आणि SAP च्या जागतिक R&D मध्ये ४० टक्के योगदान देते. SAP च्या सध्या १७ देशांमध्ये २० प्रयोगशाळा आहेत. तसेच, कंपनीच्या मनु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात मंदिरावर होणाऱ्या हल्ल्यांबाबत भाष्य केले आहे. ऑस्ट्रेलियात मंदिरावर हल्ले झाले.हल्ले करणाऱ्या लोकांना भारत आणि ऑस्ट्रेलियात असणारे संबध बिघडवायचे आहेत.पण त्यांना तसे करण्याचा कुठलाच अधिकार नाही. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे चांगले काम करत आहेत.त्यामुळे मंदिरावर हल्ले करणाऱ्या लोकांवर ते कारवाई करतील , असे मोदी म्हणाले.
बंगळुरुहून 4,200 EVM मशीन पुण्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. बंगळुरु येथून 4,200 EVM मशीन्स तसेच मतदानासाठी लागणारे इतर साहित्य पुण्यात दाखल झाले आहे.
एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकादा धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रवाशांने दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबरसह प्रवाशांना मारहाण केली आहे. या मारामारीत २ जण जखमी झाले. ही घटना दि.१० एप्रिल रोजी सकाळी ६.३५ वाजता एअर इंडियाचे फ्लाइट क्रमांक AI-111 ने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उड्डाण घेत असताना घडली.
“काँग्रेस नेते माझी कबर खोदण्याची स्वप्ने पाहण्यात व्यस्त आहेत. मात्र, मी ‘एक्स्प्रेस-वे’चं उद्घाटन करण्यात आणि देशातील गरीब लोकांसाठी काम करण्यात मस्त आहे,” असा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे.पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या दौर्यावर असून त्यांनी रविवारी मंड्यात पोहोचल्यावर जोरदार रोड शो केला. त्यानंतर मोदींनी बंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेस-वेचे लोकार्पण केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह
‘जी २०’ गटाच्या अर्थ आणि परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीला मिळालेल्या संमिश्र यशाने खचून जाण्यासारखे काही नाही. जेव्हा ‘जी २०’ गटाची निर्मिती करण्यात आली तेव्हाच्या आणि आताच्या जगामध्ये बराच मोठा फरक पडला आहे.
मायक्रोब्लॉगिंग साईट् ट्विटरने खरेदी केल्यावर एलन मस्कने अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता एलन मस्कने भारतातील दोन ट्विटरचे कार्यालय बंद केले आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरचे भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू अशा ठिकाणी कार्यालय होते. मात्र आता दिल्ली आणि मुंबईची कार्यालय बंद करण्यात आले आहेत.
पूर्वीसारखे क्रीडा क्षेत्राकडे निव्वळ आवड किंवा फावल्या वेळातील उद्योग, या दृष्टिकोनातून न पाहता या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधीचे महत्त्व विद्यार्थ्यांसह पालकांनाही हल्ली पटलेले दिसते. खासकरुन आयपीएल आणि तत्सम क्रीडा स्पर्धांना प्राप्त झालेले प्रसिद्धीचे वलय आणि उत्पन्न यामुळे क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून अधिक गांभीर्याने बघितले जाते. त्यानिमित्ताने क्रीडा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी आणि संस्थात्मक प्रशिक्षण यांचा आढावा घेणारा हा लेख...
“दहशतवाद, बेकायदेशीर शस्त्रास्त्र व्यापार, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी आदींमुळे जगाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होत आहे. त्यास सामोरे जाण्यासाठी नवीन रणनीती आखण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेंगळूरू येथे भारत उर्जा सप्ताह (आयईडब्ल्यू)२०२३ चे उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधानांनी भारतीय तेल महामंडळाच्या ‘अनबॉटल्ड’उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या गणवेशांचे अनावरण केले. हे गणवेश पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार करण्यात आले आहेत. भारतीय तेल महामंडळाद्वारे निर्मित अंतर्गत सौर कुकिंग प्रणालीच्या ट्वीन कुकटॉप मॉडेलचे देखील पंतप्रधानांनी लोकार्पण केले आणि या मॉडेलच्या व्यावसायिक पातळीवरील विक्रीचा प्रारंभ केला.
"आपली संस्कृती ही अतिथी देवो भव, अशीच आहे. मात्र, अतिथी येऊन आपलं घर बळकावण्याच्या तयारीत आला तर त्यालाही उत्तर देणं आम्हाला येतं. त्यांच्याकडे जिहादची परंपरा आहे. काही नाही मिळालं तर लव्ह जिहाद करतात. आमच्याकडेही प्रेम करण्याची परंपरा आहे पण आमच्यात सन्यासी देवाकडे आपलं प्रेम व्यक्त करतो. पण देवाने बनविलेल्या या विश्वातही काही समाजकंटक फिरत असतात. त्यांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. आपल्या मुलींवर तसे संस्कार करा, लव्ह जिहाद्यांना त्यांच्याच प्रमाणे उत्तरे द्या. आपल्या घरातील चाकूला धार थोडी जास्त ठेवा
भारतीय रिझर्व बँकेतर्फे आजपासून रिटेल ग्राहकांसाठी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडिसी) अर्थात डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरु होणार आहे. सध्या हे डिजिटल चलन दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि भुवनेश्वरमध्ये वापरता येणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यात देशातील ९ शहरांमध्ये त्याचा वापर करता येणार आहे. यापूर्वी १ नोव्हेबर २०२२ रोजी होलसेल प्रकारामध्ये डिजिटल रुपयाचा पायलट प्रोजेक्ट सुरु केला होता.