वाराणसीमध्ये सलग तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेने निवडून दिले. याऊलट महाराष्ट्रातील जनतेने तुम्हालाच हादरे दिले आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांना दिले.
Read More
पत्राचाळ घोटाळ्यातून मराठी माणसाला बेघर करणाऱ्यांना 'एसआरए'वर बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केली. मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमचा लंगोट सुटला तरी आमची इज्जत शाबूत आहे, असा केविलवाणा प्रयत्न संजय राऊत यांचा असल्याची टीका भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार, १० सप्टेंबर रोजी केली.
नवनाथ बन ; राहुल गांधींना सावध राहण्याचा सल्ला द्या संजय राऊत यांना लालबागच्या राजाला जावेसे वाटणार नाही, कारण त्यांना अफजलखानाच्या कबरीवर जाण्यात धन्यता वाटते, अशा शब्दात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी खरपूस समाचार घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. तर उद्धव ठाकरे यांनी ते आरक्षण घालवण्याचे काम केले, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे. गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बेस्टच्या निवडणूकीमुळे महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडला नाही तर हिंदुत्वाच्या स्टँडला स्थान आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी बुधवार, २० ऑगस्ट रोजी केली. बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत झालेल्या ठाकरे बंधूंच्या पराभवावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांची वैचारिक सुंता झाल्यामुळे काँग्रेससोबत जाऊन हलाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा घणाघात भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केला आहे. शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला नाही. या हिंसाचाराची सर्वाधिक झळ सध्या भाजपला बसत असली, तरी अन्य पक्ष हे सुपात आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे. बंगालमध्ये सत्तांतर हाच त्यावरील उपाय!
(Mahua Moitra vs Kalyan Banerjee) तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यांच्यातील हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खासदार मोइत्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार बॅनर्जी यांचा ‘डुक्कर’ (Pig) असा उल्लेख केल्यामुळे बॅनर्जी मोइत्रा यांच्यावर संतापले आहेत. बॅनर्जी यांनी मोइत्रा यांचे शब्द अमानवीय असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. व्हर्च्युअल बैठकीत कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा देण
जनतेची दिशाभूल करून मते मिळविण्याची आपली शक्ती घटत चालली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत कदाचित पराभवाला सामोरे जावे लागेल, याची जाणीव ममता बॅनर्जी यांना झालेली दिसते. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी आता मतांच्या बेगमीसाठी बंगाली भाषेच्या अस्मितेचा अखेरचा डाव टाकला आहे. पण, आजच्या समाजमाध्यमांच्या काळात असत्य फार काळ लपून राहू शकत नाही, हे ममतादीदींनी लक्षात घ्यावे.
पाकिस्ताननेही हिंदी चित्रपटसृष्टीतील नामांकित कपूर घराण्याची पेशावरमधील पिढीजात हवेली बरीच वर्षे सुरक्षितरित्या सांभाळली होती. पण, स्वत:ला सुशिक्षित भद्रलोक म्हणविणारे आणि ‘नोबेल’ पुरस्काराने नावाजलेली व्यक्ती प्रमुखपदी असताना बांगलादेशी सरकारने जागतिक कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांचे घर उद्ध्वस्त करून आपल्या तालिबानी आणि असंस्कृत मानसिकतेचे दर्शन घडविले आहे.
कोलकाता लॉ कॉलेजच्या कॅम्पसमध्ये २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची दखल म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सत्यम सिंह राजपूत यांनी भारताचे सरन्यायाधीश बी.आर. गवई यांना खुले पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो घ्यावा आणि कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय मुक्त आणि निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली.
नुकताच कोलकाता येथे विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर बलात्कार झाला. भाजप, हिंदू आणि प्रभू श्री रामचंद्रांविरोधात गरळ ओकणार्या प. बंगालच्या मुख्यमंत्री या भयंकर घटनेबाबत मूग गिळून बसल्या आहेत. कारण, सामूहिक बलात्कार करणारे तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत.‘मा,माटी आणि मानूष’चा नारा देत, प्रत्यक्षात त्याविरोधात राज्य चालवणार्या ममता बॅनर्जींच्या सत्तेचे जंगलराज जगासमोर उघडे पडले आहे. या घटनेचा घेतलेला हा आढावा...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिघा येथे नव्याने उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचा प्रसाद संपूर्ण राज्यभर वाटण्याचा निर्णय घेतला आहे. ‘जय श्रीराम’ या घोषणेला विरोध करणार्या ममतांनी आता ‘जय जगन्नाथ’चा नारा दिला आहे. ममता यांना एकाएकी हिंदू धर्माबद्दल उमाळा का दाटून आला आहे, हे नव्याने सांगायला नको.
वजाहत खान यांने सोशल मीडियावर हिंदू धर्म आणि त्याच्या देवतांबद्दल अपमानजनक केलेल्या पोस्टवर सर्वोच्च न्यायालयांनी सोमवार,दि.२३ जून रोजी दखल घेतली आहे. अनेक राज्यामध्ये वजाहत खान विरूद्ध एफआयआर नोंदविल्या गेल्या होत्या. या सर्व एफआयआर एकत्र करण्याची विनंती खानच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केली असता खान यांच्या अटकेला तुर्तास स्थगिती दिली आणि सर्व एफआयआर एकत्र करण्याच्या संबधात केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून उत्तर मागितले.
“2026 मध्ये पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी सरकार कायमचे उखडून टाकू. जेव्हाही शुभेंद्रु विधानसभेला उभे राहतात, तेव्हा दीदी घाबरते. निवडणुकीत हिंसाचाराचा आधार घेतात. लोकशाहीत हिंसाचाराला जागा नाही. हिंसेविना मतदान घ्या; मग तुम्हाला वास्तव काय ते कळेल,” अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रविवार, दि. 1 जून रोजी कोलकाताच्या नेताजी स्टेडियममध्ये भाजप कार्यकर्त्यांना शाह यांनी संबोधित केले.
वक्फ कायद्यातील दुरुस्तीच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंदूंचा भीषण नरसंहार करण्यात आला. हा नरसंहार करणाऱ्या जात्यंध समाजकंटकांना पश्चिम बंगाल सरकारने संरक्षण दिले आहे. पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्या बंगाली प्रकोष्ठतर्फे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आले.
Mamata Banerjee पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ सुधारित कायद्याच्या विरोधाचे कारण पुढे करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींमुळे हिंसाचार बळावला गेला आहे. ममता बॅनर्जी आपल्या व्होट बँकचा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून वापर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये मु्स्लिमांनी हिंसाचाराच्या कारणाने ४०० हून अधिक हिंदूंचे पलायन करण्यास भाग पाडले गेले आहे.
Mamata Banerjee पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारित कायद्यावरून रान पेटलं आहे. वक्फ सुधारित कायदा मंजूर झाल्यानंचर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंदूंसाठी धोक्याची घंटा ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि अभिनेते मिथून चक्रवर्तींनी केले आहे. बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होऊ देणार नसल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. यामुळे आपली व्होट बँक दुरावली जाऊ नये, हे लक्षात घेत कायद्या सुव्यवस्था न ठेवता बांग्लादेशप्रमाणे पश्चिम बांगलादेशची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच मिथून चक्रवर्तींनी बारताच्या संविधानाचा
Mamata Banerjee प. बंगाल हा तर धर्मांधांचा बालेकिल्लाच! त्यातही मुर्शिदाबाद जिल्ह्यात 66 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची आणि 34 टक्क्यांसह हिंदू तिथे अल्पसंख्याक. मग काय, मुर्शिदाबादमध्ये धर्मांधांनी रस्त्यावर उतरून अक्षरशः थैमान घातले. नासधूस केली. जाळपोळ करून अख्खा जिल्हाच वेठीस धरला. काल त्यांनी कोलकात्यात इमामांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. म्हणजे, ज्यांच्यावर अन्याय-अत्याचार झाले, त्या पीडितांपेक्षा, त्या अन्यायासाठी उकसवणार्यांसमोर ममतादीदींनी नांगी टाकली. हिंदूंचे कितीही रक्त सांडले, त
Mamata Banerjee "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आधुनिक जिना म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालतील मुस्लिम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात", अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी १३ एप्रिल रोजी रविवारी प्रसारमाध्यमाशी बोलताना केली आहे. वक्फ सुधारित विधेयकावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी ममता सरकार सपशेल अयशस्वी ठरले आहे.
( Threat from Mamata Banerjee Muslim minister ) वक्फ सुधारण कायदा मागे न घेतल्यास कोलकात्यात ५० ठिकाणी १० हजारांचा जमाव रस्त्यावर उतरविण्यात येईल, अशी धमकी ममता बॅनर्जी सरकारमधील मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी यांनी शुक्रवारी दिली आहे.
(Mamata Banerjee on Waqf Bill) गेल्याच आठवड्यात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी वक्फ सुधारणा विधेयक बहुमताने पारित केल्यानंतर शनिवार दि. ५ एप्रिल रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीदेखील विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे त्याचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. अशात या कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये विशिष्ट समुदायातील धर्मांधाकडून हिंसक निदर्शने सुरु आहेत. राज्यात सुरू असलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविरुद्ध आंदोलन क
Mamata Banerjee यांनी पश्चिम बंगालच्या स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्यासंबंधित नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेशाचा अवमान केला आहे. यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जींना अवमाननासंदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहेय ही नोटीस वकील सिद्धार्थ दत्ताकडून स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.
‘Waqf Amendment Bill’विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी विरोधी पक्षांची होड लागली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तरी या राजकीय स्पर्धेत कशा मागे राहतील म्हणा! “वक्फ सुधारणा कायदा’ प. बंगालमध्ये लागू होणार नाही, त्यामुळे चिंता करू नका. मी तुमच्यासोबत आहे,” असे सांगून दीदींनीही ‘वक्फ’ची वफादारी केली.
Ram Navami प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये रामनवमी (Ram Navami) शोभायात्रेत काही जिहाद्यांनी रविवार ६ एप्रिल २०२५ रोजी दगडफेक केल्याचा दावा भाजपने केला. भाजपने दावा केला की, ते शोभायात्रेतून परतत असताना दगडफेक करण्यात आल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. संबंधित परिस्थिती लक्षात घेऊनही पोलिसांनी दावा फेटाळला आहे.
Ram Navami प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ रोजी कोलकातामधील उच्च न्यायालयाने अंजनी पुत्र सेना, या हिंदू संघनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची काही दिवसांपासून परवनगी देण्यास पोलिसांनी नकार दिला होता. त्यानंतर हावडा पोलिसांच्या एका अहवालानुसार, हावडा पोलिसांनी सुरूवातीला प्रस्तावित मार्गावर परवानगी नाकरलेली आहे. अंजनी पुत्र सेना या हिंदू संघटनेला हावड्यातील राम नवमी मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली.
Mamata Banerjee प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हिंदूद्वेषाच्या कहाण्या वर्णाव्या त्या किती! कारण, मुख्यमंत्री म्हणून आता तिसरा कार्यकाळ सुरू असलेल्या ममतादीदींनी हिंदूंना प्रारंभीपासूनच गृहीत धरले. आपण हिंदूंशी कसेही वागलो, तरी बंगाली अस्मितेच्या नावाखाली बंगाली हिंदू आपल्या पाठीशीच सदैव उभा राहील, हा दीदींचा भ्रम. म्हणूनच हिंदूंना खिसगणतीतही न मोजणार्या दीदींनी आपले सगळे लक्ष मुख्यत्वे मुस्लीम मतदारांकडे वळवले. बंगालमध्ये मुस्लीम मतपेढीची वाढलेली ताकद हेच त्यामागचे कारण. आज बंगालमध्ये तब्बल
Nitish Kumar and Mamata Banerjee वारंवार पक्षबदलाच्या भूमिका घेऊन मुख्यमंत्रिपदाची खुर्ची टिकवून ठेवणार्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना अखेरीस अशा दलबदलू राजकारणाने नुकसान आपलेच असल्याची उशिरा का होईना उपरती झाली, तर दुसरीकडे ब्रिटनच्या दौर्यावर असलेल्या ममता बॅनर्जींना तिथेही हिंसाचार, भ्रष्टाचार यांसारख्या मुद्द्यांवरुन बंगाली हिंदू समाजाच्या रोषाला सामोेरे जावे लागले. तेव्हा, दोन नेत्यांच्या या दोन वेगळ्या तर्हांचे वर्तमानातील प्रतिबिंब टिपणारा हा लेख...
Mamata Banerjee यांच्या पक्षातील काही लोकांचाही यामध्ये समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भारत-बांगलादेश सीमेवर आता प.बंगालच्याा धरतीवर तार कंपाऊंड करण्यास विरोध केला जात आहे.
Hindus पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला. हे मंदिर मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम ब्लॉक २ मधील कमलापूर गावातील आहे, या हल्ल्याची माहिती भाजप नेते अमित मालवीय यांनी शुक्रवारील १४ मार्च होळीच्या दिवशी सोशल मीडियावर दिली. त्याने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात हिंदू देवी-देवतांच्या मूर्तीची विटंबना केल्याचे दिसून आले आहे.
सांगण्यासारखे काही नसेल, तेव्हा माणूस आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्त्वाच्या कथा सांगतो. राजकारणातही मतदारांच्या रोषापासून सुरक्षित राखण्यासाठी सत्ताधारी नेते प्रादेशिक अस्मिता आणि भाषेचा सोपा मुद्दा उपस्थित करतात. तामिळनाडूच नव्हे, तर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाषेचा मुद्दा राजकारणात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. पण, ‘दक्षिण विरुद्ध उत्तर’ वगैरे तणाव हे भारतविरोधी ‘सोरोस टूलकिट’चा भाग आहेत, हे आता जनतेला कळून चुकले आहे.
Himanta Biswa Sarma हिंदू धर्माला नष्ट करण्यासाठी औरंगजेब आला होता. मात्र नंतर तोच नष्ट झाला. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प.बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदूंना संपवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र ते शक्य नाही, शेवटी त्यांचाच नाश होईल, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे. ते कोलकातामधील एका कार्यक्रमात बोलत होते.
West Bengal Education Minister Bratya Basu प.बंगाल राज्यातील कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठात एसएफआय आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित असलेल्यांनी शिक्षणमंत्री ब्रात्य बसूंवर हल्ला केला. विद्यार्थी संघटनांच्या अनेक दिवसांपासून निवडणुका घेण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होती. याबाबत आता शनिवारी १ मार्च २०२५ रोजी निदर्शने सुरू करण्यात आली होती आता त्याला हिंसक वळण प्राप्त झाले आहे.
ज्यांचे हात निरनिराळ्या हत्यांच्या रक्तांनी माखलेले आहेत, त्यांनी महाकुभांतील मृत्यूंवर बोलणे हा राजकीय व्यभिचार आहे. ही असली माणसे मृत्यूचे निमित्त बाळगून महाकुंभासारख्या पवित्र परंपरेवर टीका करतात, तेव्हा मस्तकात चीड उठल्याशिवाय राहात नाही. ‘धर्मांध मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान’ नावाच्या पोपटातच या असुरांचा जीव दडलेला आहे.
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यातून विस्तवही जात नाही, हे तसे सर्वश्रूत. यापूर्वीही काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये संघर्ष उफाळून आला होताच. पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष प. बंगालमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचा घाट घालणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी या संघर्षाची ठिणगी पडून, प. बंगालमध्ये राजकीय खेला रंगलेला दिसेल.
महाकुंभमेळ्यामुळे संघटित होत असलेले हिंदू मन लक्षात घेऊन पूर्वश्रमीचे पापक्षालन करण्याच्या हेतूने, गंगासागर मेळाव्याच्या जाहिराती देत हिंदूंसाठी पश्चिम बंगाल सरकार किती कष्ट घेते हे दाखवण्याचा उद्योग ममता बॅनर्जी ( Mamata Government ) यांनी चालवला आहे. मात्र, देशातील समस्त हिंदू संत ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबांची शिकवण मनात दृढ धरून आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकारणासाठी आता धार्मीक उत्सवाला लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की कुंभमेळ्यापेक्षा मोठा उत्सव हा गंगासागर मेळ्याचा असतो. या मेळाव्याला राष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून आम्ही गेली अनेक वर्ष काम करत आहोत. कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकार कोट्यावधी रूपये खर्च करतं, मात्र गंगासागर मेळ्यासाठी सगळा खर्च पश्चिम बंगाल सरकार करत असतं असं सुद्धा ममता बॅनर्जी म्हणाल्या.
आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा धक्कादायक विधान करत वादाला तोंड फोडला आहे. या वेळेस भारतीय सैन्यदलाला लक्ष्य करत ममता दिदी म्हणाल्या की भारतात येणारे बांगलादेशी घुसखोर हे सुरक्षा दलातील सैनिकांमुळे भारतात प्रवेश करतात असे वादग्रस्त विधान ममता बॅनर्जी यांनी केले आहे. त्याच बरोबर, इस्लामपुर, सिताई, चोपरा या गावांतून गुंड पाठवून केंद्र सरकारचा पश्चिम बंगाल अस्थिर करण्याचा डाव असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.
Bhajan नेते सुवेंदु अधिकारी यांनी आपल्या X ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. प. बंगाल राज्यातील मोदिनीपूर जिल्ह्यातील कांठी शहरामध्ये कट्टरपंथी जमावाने भजन करणाऱ्या वाहनावर हल्ला केला आहे. वक्फ दुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या बैठकीदरम्यान ही घटना घडली आहे. सुवेंदू अधिकारी म्हणाले की, कांठी सेंट्रल बसस्थानक परिसरातून एक वाहन जात असताना त्या गाडीत भजन सुरू होते.
‘इंडी’ आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. ममता बॅनर्जी या अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत, हे माहिती असूनही ‘इंडी’ आघाडी टिकवून ठेवायची असेल, तर विरोधकांना अन्य कोणता पर्याय सध्या दिसत नाही. राहुल गांधी यांच्यापेक्षा ममतादीदी आघाडीस बांधून ठेवतील, असे काहींना वाटत आहे.
मुंबई : पश्चिम बंगालचे नगर विकास मंत्री आणि कोलकत्त्याचे महापौर फिरहाद हकीम यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात फिरहाद हकीम यांनी म्हटले की, "अल्लाहची इच्छा असेल तर, एक दिवस मुस्लीम बहुसंख्य असतील." यावरुन ममता बॅनर्जी ( Mamta Banerjee ) सरकारने आपल्या मंत्र्यांना दिलेली सूट दिसून येते. तृणमूल कॉंग्रेस भारताची परिस्थिती बांगलादेशसारखी करु पाहत असल्याचे भाजपने सांगितले. यावर भाजपने आपला विरोध व्यक्त केला आहे.
संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून रोज कामकाज बंद पाडण्याचे काम सुरू आहे. अशातच आता बुधवार दिनांक ११ नोव्हेंबर रोजी टीएमसीचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टिका करत, संसदेच्या मान मर्यादेचा भंग केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदारांनी बॅनर्जी यांच्या विरोधात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याच बरोबर अशा घटनांची पुनरुक्ती होऊ नये म्हणून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा घेराव सुरू केला आहे. सपा, डावे पक्ष आणि राष्ट्रवादीनंतर आता राजदने इंडी ( INDI ) आघाडीच्या नेतृत्वासाठी बैठक घेऊन एकमताने नेता निवडण्याची मागणी केली आहे.
(Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवार, दि. ६ डिसेंबर रोजी बांगलादेशातील अशांततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. "माफियां"च्या वाढीमुळे आणि "कमकुवत" प्रशासनामुळे बांगलादेश "नेतृत्वहीन" असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेशातील तुरुंगात अटकेत असलेल्या ६९ बंगाली मच्छिमारांच्या दुरावस्थेवर बोलताना त्यांनी भारताच्या केंद्र सरकारला हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल सरकारने ( Mamta Govt. ) ‘मनरेगा’ योजनेचा लाभ अपात्रांना दिल्याचा घणाघात केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.
नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता ‘इंडी’ आघाडीचे ( INDI Allience ) नेतृत्व करण्यासाठी सक्षम नेत्याची गरज आहे, असे सांगून तृणमूल काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली आहे.
: पश्चिम बंगाल मध्ये सध्या एका वेगळ्याच घोटाळ्याने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. विद्यार्थांना, उच्च शिक्षणासाठी देण्यात आलेल्या टॅबलेटच्या पैशांमध्ये फेरफार होत असून विद्यार्थांच्या बँक खात्याऐवजी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या संदर्भात कोलकाता पोलीस आणि विशेष तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला असून वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचे पुढचे मोठे लक्ष्य म्हणून प. बंगालची निवड केली आहे. आगामी 2026 सालच्या विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमत मिळवण्याचे शाह यांचे लक्ष्य आहे. महिला सुरक्षा, घुसखोरी, भ्रष्टाचार आणि अल्पसंख्याक तुष्टीकरण या मुद्द्यांवर ममता बॅनर्जी यांच्या सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती ते बनवत आहेत.
क्फ सुधारणा विधेयकाविषयीच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी राडा झाला. जेपीसीचे सदस्य आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी अश्लील शब्दांचा वापर करून अध्यक्षांच्या दिशेने काचेची बाटली फोडून फेकल्याचे गंभीर कृत्य केले आहे.