छांगुरबाबा धर्मांतर प्रकरणात पाचवा आरोपी रशीद यालाही उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. बलरामपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सिंडिकेट पसरवण्यात रशीदने मोठी भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
Read More
योगी सरकार मदरसा शिक्षणाच्या मुद्द्यावर करत असलेल्या कामांबाबत अनेक संघटनांकडून सकारात्मक वक्तव्ये येऊ लागली आहेत. प्रत्यक्षात मदरशांमध्ये पैसा कुठून येतो आणि कोणत्या कामासाठी पैसा पाठवला जात आहे, याची कोणतीही माहिती सरकारला मिळू शकलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी सखोल तपास करण्यात येत आहे.
छत्तीसगडमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सद्दाम खान आणि इम्तियाज अली फरार आहेत. दोघेही काँग्रेसची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) शी संबंधित असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या निषेधार्थ ABVP कार्यकर्त्यांनी दि.१० सप्टेंबर रोजी निदर्शने केली.
उत्तर प्रदेशातील ४००० मदरशांना परदेशी निधी मिळत असल्याची बाब समोर आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मदरशांचे सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये ८४४१ मदरसे बेकायदेशीर असल्याचे आढळले होते. आता परीक्षा संपत आल्याने राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने कारवाई सुरू केली आहे. बहुतेक मदरसा चालकांनी जकात, म्हणजेच मुस्लिमांनी दिलेली धर्मादाय हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याचे नमूद केले होते.
देशातील प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रकल्पांचे ‘रिअल टाईम मॉनिटरिंग’ केले जाणार आहे. यामध्ये सरकार प्रमुख १७०० प्रकल्पांच्या कामांवर बारकाईने देखरेख ठेवली जाणार आहे, त्यात येणार्या अडचणींचे तत्काळ निवारण केले जाणार आहे.
रविवारी दिवसभर व्हायरल होत असलेल्या एका व्हीडिओमुळे चांगलीच खळबळ माजली आहे. कोरोना मृतदेहाला नदीत फेकले जात असल्याच्या व्हीडिओमुळे एकच भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्हीडिओ कुठला आहे. PPE किटसह कोरोना मृतदेह फेकणाऱ्यांवर काय कारवाई होणार, हा मृतदेह फेकणारे कोण आहेत, जाणून घ्या सविस्तर माहिती... कोरोनाची दुसरी लाट आवाक्या बाहेर गेली होती.
अटलजींच्या परराष्ट्र धोरणाबाबत अभ्यासाची चुणूक त्यांच्या तरुण वयापासून दिसून येते.