पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संपूर्ण ‘टीम इंडीया’ने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानला चकवा देत आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडे पाडत पाकिस्तानला त्यांच्या घरात घुसून ठोकले आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पर्यटकांना लक्ष्य करून केलेल्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले
Read More
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत मोदी सरकारने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेमध्ये आमूलाग्र परिवर्तनाची भक्कम पायाभरणी केली. आपण सध्या संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षेमधील सर्वांत दूरगामी सुधारणांच्या टप्प्यावर उभे आहोत. राष्ट्रीय सुरक्षा आव्हानांची प्रचंडता (चीन) आणि जटिलता (तंत्रज्ञान विषयक नवकल्पना, ज्या ज्ञात इतिहासातील युद्धाच्या स्वरूपात सर्वाधिक पायाभूत बदलाला चालना देत आहेत) लक्षात घेतल्या, तर बरेच काही साध्य केले गेले असले तरी अजूनही अनेक संक्रमणे होऊ घातलेली आहेत. त्यामुळे यासंदर्भातील थोडा वास्तववादी पर
पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पुन्हा एअरस्ट्राईक करण्यास वायुसेना सदैव तयार असल्याचा इशारा वायुसेनाप्रमुखांनी दिला आहे.
बालाकोट एअर स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण
बालाकोट हवाई हल्ल्याला एक वर्ष उलटून गेले. भारतीय हवाई दलाने 'एअर स्ट्राईक' करत हुतात्मा जवानांचा बदला घेतला खरा परंतु, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी 'जैश-ए-मोहम्मद' ही संघटना आणि पाकिस्तानातील बहावलपूर मदरशात 'आश्रित' म्हणून डेरा घालून बसणारा मसूद अझहर याच्यावर कारवाई करण्याची तसदी पाकिस्तान सरकारने अद्याप घेतलेली नाही. फेब्रुवारीमध्ये मसूद बेपत्ता असल्याची माहिती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दिली. मात्र, वारंवार खोटे बोलणार्या पाकचा बुरखा या ना त्या कारणाने टराटरा फाटणे, हे काही नवे नाही. खोट
या सर्वांच्याच हत्या झाल्या. राहुल गांधींनीच लावलेला तर्क जर या प्रत्येक ठिकाणी लावला तर त्या त्या घटनेनंतर फायदा कोणाला झाला? त्याचे उत्तर राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कोणाही नेत्याने द्यावे.
बालाकोट एअरस्ट्राईकला १ वर्ष पूर्ण होतील, तरीही बालाकोट पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती पुन्हा समोर
दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भन्साळी बालाकोट या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
अहमद पटेल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हि माहिती दिली.
खरंतर पाकिस्तानसाठी एका भारतीय वैमानिकाला त्यांनी जीवंत पकडले, हा कदाचित अभिमानाचा क्षण असेलही, पण अभिनंदनचा पुतळा अशाप्रकारे शोभेच्या संग्रहालयात ठेवून पाकिस्तानने आपलीच शोभा करून घेतलेली दिसते.
पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली असतानाही अजूनही काही काश्मिरी नेत्यांना भारताने जी पावले उचलली आहेत, ती मान्य असल्याचे दिसत नाही. सध्या बंदिवासात असलेले त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, काश्मिरी जनतेला हाती बंदुका घ्याव्यात, अशी चिथावणी देत आहेत. राज्याचे हे माजी मुख्यमंत्री काश्मिरी जनतेला हाती बंदुका घेण्याचे आणि बलिदान करण्याचे आवाहन करणारे संदेश पाठवित आहेत.
भारताकडे राफेल असते तर बालाकोट हवाई हल्ल्यावेळी पाकिस्तानात घुसून हल्ला करण्याची गरज भासली नसती. भारतातूनच 'जैश-ए-मोहम्मद'चे तळ उध्वस्त करणे शक्य झाले असते, असे मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. राफेल शस्त्रपूजनावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचाही त्यांनी जोरदार समाचार घेतला.
बालाकोट हवाई हल्ल्याची शौर्यगाथा सांगणारा पहिला व्हिडिओ प्रसिद्ध भारतीय हवाई दलाकडून प्रसिद्ध करण्यात आला.
पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाल्याची माहिती भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली
जम्मू काश्मीरच्या बालाकोट सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने आणखी एक पाकिस्तानी कट उधळला आहे. भारतीय सैन्याने पुंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागातील बालाकोट सेक्टरमधील बासोती आणि बालाकोट या गावात ९ जिवंत तोफगोळे निकामी केले.
वायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांनी पाकिस्तानला भारत युद्धसज्ज असल्याचा इशारा दिला आहे. भारतीय वायुसेनेचे सीमाभागात बारकाईने लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय सीमाभागात पाकिस्तानकडून कोणतीही घुसखोरी व कारवाई होऊ नये याकरिता वायुसेना सदैव अलर्ट असते.
मोदी सरकारने सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याची वाट न बघता प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि वेळ पडल्यास आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारत ते उद्ध्वस्त करेल, हे आपण प्रत्यक्ष करून दाखवले. बालाकोट येथील हवाई हल्ल्यापासून इमरान खान सातत्याने अण्वस्त्र युद्धाची आणि परस्परांच्या विध्वंसाची शक्यता वर्तवत आहेत. आपण एक जबाबदार अण्वस्त्रधारी देश असल्याचे भारताने गेली २० वर्षं जगाला दाखवून दिले आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे या वर्षीही शौर्य पुरस्काराची घोषणा केली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानने केलेल्या प्रतिहल्ल्याला उत्तर देताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे 'एफ १६' हे लढाऊ विमान पाडले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना या पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
सीमेपलीकडून भारतात होणार्या घुसखोरीबाबत केंद्र सरकारने राबवलेल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचे परिणाम आता जाणवू लागले असून भारत-पाकिस्तान सीमेवरून भारतात होणारी घुसखोरी ४३ टक्क्यांनी घटली आहे.
इंटेलिजन्स ब्युरोची 'आयबी' सूत्रे अरविंद कुमारांच्या हाती
लवकरच होणार पाकिस्तान आणि चीन सीमेवर तैनात
पाकिस्तानी एफ-१६ विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदनच्या संपूर्ण युनिटला 'फाल्कन स्लेयर्स' आणि 'एम्राम डॉजर्स' या शीर्षकांसहीत पट्टा बहाल केला
फ्रान्सेस्का मॅरिनो यांच्या अहवालातील माहिती
भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या सहा दहशतवादी तळांपैकी पाच ठिकाणे उध्वस्त केल्याची माहीती दिली आहे.
'एअरस्ट्राइक'मधील १२ वैमानिकांचीही शिफारस
पुलवामा हल्ल्यानंतर जैशच्या मुसक्या आवळण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल ४३ दिवसांनी पाक सरकार आंतरराष्ट्रीय माध्यमाचे सदस्य आणि परदेशी पत्रकारांना बालकोट भागात घेऊन गेले. मात्र पत्रकारांसोबत यावेळी पाकिस्तान लष्कराचे सैन्यही त्यांच्यासोबत होते. ज्या वेळेला यावेळी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींनीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न पाक सैन्याने केला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त करण्यासाठी योजना आखल्यावर नेमकं त्या रात्री काय घडलं, याची माहिती पंतप्रधानांनी अखेर उघड केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी ही मुलाखत दिली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार पाकच्या ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकार दर्शवला आहे. गेल्या दहा वर्षातील हा चौथा प्रस्ताव चीनने अमान्य केला आहे.
“मोदीला शिव्या द्या, माझी निंदा करा, पण भारतीय सेना व शौर्याला अपमानित करू नका,” हे मागील दोन-चार दिवसांतील आवाहन सामान्य भारतीयाच्या काळजाचा ठाव घेणारे आहे. त्यामुळे मोदींची शिकार करण्यास निघालेले विरोधी पक्षाचे शिकारी स्वत:च शिकार होऊन गेलेले आहेत.
राज ठाकरे यांचा अजब दावा
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाकेबंदी करण्यात भारताने पुरेपूर प्रयत्न केले होते.
भारत-पाकिस्तानचा प्रश्न हा कोणत्या अटीवर शांतता नांदेल, असा नसून पाकिस्तानचा दृष्टिकोन कसा बदलेल, यावर अवलंबून आहे. त्यासाठी आज जे डाव पाकिस्तान खेळतो आहे, त्यातून पाकिस्तानचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे, याची जाणीव करून दिली पाहिजे किंवा त्याने भागले नाही, तर अस्तित्वच धोक्यात आणले पाहिजे. त्यासाठी सर्व काही करू शकण्याच्या क्षमतेचे व मानसिकतेचे नेतृत्व भारतापाशी असणे गरजेचे आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर सारा देश एकजूट राष्ट्रभावनेने भारतीय सैन्यदलांच्या पाठीशी उभा राहिल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विरोधकांवर केंद्रीय मंत्री जनरल वि.के. सिंह यांनी खोचक सवाल विचारला आहे. जनरल सिंह यांनी ट्विट करत “रात्री ३.३० वाजता डास जास्त झाले होते. मी त्यांना ‘हिट’ने मारले. आता किती डास मारले ते मोजत बसू कि निवांत झोपू, असा सवाल त्यांनी विचारला आहे.”
एअर स्ट्राईक केल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे पुरावे मागण्यास सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांनी वृत्तांकन केल्यानंतर विरोधकांनी या प्रश्नी सरकारला लक्ष्य केले होते. मात्र, आता उघड झालेल्या माहितीत दहशतवाद्यांच्या इमारतीचे मोठे नुकसान केल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्ताकंन केल्यानुसार दहशतवाद्यांचा तळ पूर्णपणे उध्वस्त झालेला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नव्या फोटोजनुसार दहशतवाद्यांच्या इमारतीला जोरदार लक्ष्य केल्याचे दिसत आहे. हवाई हल्ल्यात झालेले नुकसान स्
बालाकोट येथे हवाई दलाने केलेल्या कारवाईमुळे सगळे भाजपविरोधक कमालीच्या गोंधळाच्या परिस्थितीत सापडले आहेत. बालाकोट हल्ल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची स्तुती करता येत नाही आणि जर टीका केली, तर ती नरेंद्र मोदींना लागत नाही आणि उलटा बाण होऊन आपल्यावरच येतो. 'सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही' असे जे म्हणतात, तशी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज पार्टी या सर्वांची अवस्था झालेली आहे.
समुद्री हल्लाच्या तयारीत पाक; नौसेना प्रमुखांनी साधला निशाणा
नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधी पक्षांवर मंगळवारी तोफ डागली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी वायुदलाने हवाई हल्ला करून ‘जैश ए मोहम्मद’चे तळ उध्वस्त केले
अभिनंदन यांच्या सुटकेनंतर परिस्थिती निवळली असली तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही. नुकतीच बिकानेर सेक्टरमध्ये भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडल्याची बातमी आली. त्यामुळे भविष्यातील कार्यवाहीबद्दल काही सूचना कराव्याशा वाटतात.
पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जैश-ए-मोहम्मदचे भारतीय वायुदलाने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यानंतर भारतीय वायू सेनेचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी पत्रकार परिषद घेऊन एअर स्ट्राईकसंदर्भात खुलासा केला. भारतीय वायू सेनेच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे किती दहशतवादी मारले गेले, याबाबत विरोधकांनी पुरावे मागत शंका उपस्थित केली होती.
पाकिस्तानी बालाकोट स्थित दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय वायुदलाने हल्ला केल्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्राकडे पुरावे मागण्यास सुरूवात केली असली तरीही एअर स्ट्राईकबद्दल मोठे सत्य उघडकीस आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे हा खुलासा झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानातील जनता तणावाखाली असल्याचे चित्र आहे. एफ-१६ या विमानाला लक्ष्य केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत. पाकिस्तानी सैन्याच्या नियंत्रण रेषेवर कुरापती सुरूच आहेत. मात्र, पाकिस्तानातील जनता वेगळ्याच तणावाखाली आहे.
भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाकिस्तानला तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे
जैश-ए-मोहम्मद आंतरराष्ट्रीय दबावानंतरही पाकिस्तानी सरकार आणि सैन्याकडून प्रदान केलेल्या संपूर्ण समर्थनामुळे आपल्या कारवायांना स्वतंत्र रूपाने संचालित करत आहे. १४ फेब्रुवारीची घटना भारताला दिलेला एक स्पष्ट संकेत आहे की, वर्तमान परिस्थितीमध्ये पाकिस्तानबरोबरील संबंधात कोणत्याही सुधारणा शक्य नाही. आता वेळ आली आहे की, केवळ दहशतवादी संघटनाच नव्हे, तर पाकिस्तान सरकारविरोधातही कठोर पाऊल उचलले पाहिजे.
पुलवामा हल्ला, त्यानंतर भारतभरात उसळलेली संतापाची लाट, मंगळवारी भारतीय वायुदलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात केलेले हवाई हल्ले, त्यानंतर जखमी आणि खजील झालेला पाकिस्तान यामुळे दक्षिण आशियातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भारताचं वाढतं सामरिक आणि आर्थिक सामर्थ्य लक्षात घेता, भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाचे पडसाद हे संपूर्ण आशिया खंडावर उमटताना दिसत असून जागतिक पातळीवरही या तणावांची दखल घेतली जात आहे. या सर्व परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाकडून गेल्या दहा-बारा दिवसांत घेण्यात आलेली समंज
येत्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने खेळतील, याची शक्यता आधाची धुसर असताना आयसीसीने मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पाठीशी घालण्याचे काम केले आहे.
या हल्ल्यामुळे त्रेताधारपीठ उडालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सेनेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी पाकिस्तानने भारताकडे दहशतवाद मिटवण्यासाठी आणखी एक संधी द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, भारताने चोख कारवाई केल्याने पाकिस्तानला घाम फुटला आहे.
पुलवामामधील हल्ल्याचा बदला घेणार, हे भारताने ठणकावून सांगितल्यानंतर प्रत्युत्तराची भाषा करणार्या पाकिस्तानला भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर स्ट्राईकने धडकी भरली असल्यास नवल नाही. पाकिस्तानच्या रडार यंत्रणा, विमानलक्ष्यी प्रणाली यांना जराही सुगावा न लागता अवघ्या २० मिनिटांत भारताच्या १२ विमानांनी जवळपास १००० किलो बॉम्बंचा वर्षाव करत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे काही तळ बेचिराख केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकस्थित दहशतवाद्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यास खुली सूट दिलेल्या भारतीय वायुसेनेने लोकभावनेचा आदर करत थेट पाकने बळकावलेल्या भूमीतच रक्ताची होळी खेळली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर्णन केलेल्या भारतमातेचे ‘अधम रक्तरंजिते’चे रूप यावेळी प्रत्येक भारतीयाला आणि पाकिस्तानलाही अनुभवायला मिळाले.