भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मंगळवार, ०१ ऑगस्ट रोजी ठाणे महापालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’, यावर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार असून व्याख्यान सर्वासाठी खुले आहे. विचारमंथन व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा
Read More
मोठमोठ्या प्रतिभावंतांनी लोकमान्यांवर काव्य रचले आहे. त्या लावलेली ही कवितेची छोटी पणती! या कवितेत अनेक संदर्भ आहेत. टिळक अभ्यासकांना ते चटकन लक्षात येतील. परंतु, इतर वाचकांनाही ते कळावेत म्हणून सविस्तर निरूपण लिहित आहे. यात प्रत्येक ओळीचा अर्थ देण्याचे प्रयोजन नाही, पण विवेचनाच्या प्रकाशात रसग्रहणाच्या आणि आकलनाच्या वाटा उजळतील याची मात्र खात्री आहे.
मंडालेहून सुटल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने ब्रिटिशांवर हल्लाबोल करायचा असेल तर काँग्रेसमध्ये जाऊनच प्रयत्न करावे लागतील, या हेतूने टिळकांनी मोर्चेबांधणी सुरु केली. लखनौच्या निमित्ताने मवाळ आणि मुसलमान दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चिन्हे त्यांना दिसत होती. त्यांच्यासोबत एकदा का जहालांची शक्ती जोडली गेली की पक्षांतर्गत भेदाभेद वरवरतरी संपला असेच चित्र दिसणार होते. साम्राज्याच्या सूर्यासमोर ही अशी एकजूट याआधी कधी झाली नव्हती. म्हणून टिळकांनी जोखीम पत्कारली, लखनौ कराराची!
लोकमान्य टिळकांनी बर्याच विषयांवर संशोधन करुन त्यावर प्रबंध व नंतर ग्रंथनिर्मितीचे काम केले. यावर थोडे अक्षरधैर्य करण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. यात प्रामुख्याने टिळकांच्या ‘ओरायन’, ‘आर्क्टिक होम इन वेदाज’, ‘गीतारहस्य’, ‘वेदांग ज्योतिष’, ‘पंचांग संशोधन’, ‘ब्रह्मसूत्रवृत्ती’, ‘सांख्यकारिका’ इ. विषयांवर त्यांनी संशोधन केलेल्या क्षेत्रात त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचे व पांडित्याचे भव्य दर्शन जगास घडविले. या सगळ्या ग्रंथांचा हा थोडक्यात परिचय.
लोकमान्य टिळक आणि डॉ. अॅनी बेझंट यांनी ‘होमरूल लीग’ची स्थापना केल्यानंतर अल्पावधीतच देशाच्या अनेक भागांत लीगच्या शाखा स्थापन झाल्या. प्रचार व प्रसारासाठी लोकमान्य टिळकांकडे मुंबई सोडून इतर महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वर्हाड हे भाग तर उर्वरित भारत अॅनी बेझंट यांच्याकडे सोपविण्यात आला. टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून ‘होमरूल चळवळी’चा प्रचार केला. मंडालेहून परतलेले टिळक संपलेले असतील, असे काहींना वाटत होते. पण, ‘पुनश्च हरिओम’ म्हणत या कर्मयोग्याने पुन्हा एकदा भरारी घेत आपल्या सिंहगर्जन
हिंदी मजुरांनीही आंतरराष्ट्रीय संघटनेत सामील व्हावे म्हणजे हिंदी कामगारांचे हक्क प्रस्थापित व्हायला मदत होईल म्हणून हिंदी मजूर संघाचे प्रतिनिधी लोकमान्य टिळक आणि डॉ. वेलकर यांना आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने भरवलेल्या परिषदेचे विशेष आमंत्रण होते. या सभेत केलेल्या भाषणात टिळक म्हणाले की हिंदुस्थानातील मजूर चळवळ अजून बाल्यावस्थेत आहे आणि ती जेव्हा देशभरात भव्य रूप धरण करेल तेव्हा ती जागतिक संघटनेशी सहकार्य करेल.यावरून वाटू शकेल की भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक विदेशात भरलेल्या मजूर परिषदेच्या मंचावर
भारतासारख्या देशात शेती ही थेट अन्नधान्याच्या उत्पादनाशी निगडित बाब असल्याने शेती केवळ अर्थव्यवस्थेचा नव्हे तर समाजाचा देखील पाया आहे. शेती व शेतकरी वाचवायचे तर नैसर्गिक आपत्तीत तो तग धरेल अशी सरकारी यंत्रणा गरजेची असते. कधी कधी अशी यंत्रणा केवळ कागदावर असते अथवा ज्यांच्यासाठी ही यंत्रणा असते त्यांना त्याचे पुरेसे ज्ञान नसते. ब्रिटिश काळातदेखील शेतकर्यांची अशीच काहीशी अवस्था झाली होती. त्यावेळी शेतकर्यांच्या बाजूने उच्चरवाने बोलणारा आवाज म्हणजे लोकमान्य टिळक !
आज १०० वर्षांनंतरदेखील लोकमान्य टिळकांचे अर्थविषयक विचार कालातीत वाटतात. आजही आपल्या शेतकर्यांची अवस्था फारशी चांगली नाही. जागतिकीकरणामुळे आजही आपले लहान उद्योगधंदे बंद पडले आहेत. सेवा क्षेत्रांमुळे काहीसा रोजगार शिल्लक आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी मोठी होताना दिसते. अशा वेळी लोकमान्य टिळकांचे अर्थकारण डोळ्यांसमोर ठेवून नियोजन करणे अत्यावश्यक आहे.
शिवजयंती उत्सवाचा दीर्घ इतिहास आपल्याला अनेकदा ठाऊक नसतो. ‘लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली’ यापलीकडे टिळकप्रेमींनाही फारशी माहिती नसते. सद्यस्थितीतील शिवजयंती उत्सवाचे बदलते रूप बघता टिळकांनी सुरू केलेल्या उत्सवामागील त्यांचे हेतू, त्याचे स्वरूप व त्याची फलश्रुती यांचे नव्याने चिंतन करणे महत्त्वाचे वाटते.
टिळकांच्या मंडालेच्या वास्तव्यानंतर तिकडचा मुस्लीम रखवालदार म्हणाला होता, “ये सब पेड आज मुरझाये हुये दिखते है। पर वे महात्मा जब यहाँ आये तब सब पेड ताजे हो गये और फलोंसे भर गये वे अवलिया यहांसे चले गये तबसे पेड नही फलते।” खरंच लोकमान्यानां चेतांसि कोऽहि विज्ञातुमर्हति? मंडालेमधल्या वास्तव्याचा विचार केला तरी या लोकपुरुषाच्या मनाची एक वेगळी बाजू समोर येते.
परकीय शत्रूंनी राष्ट्राविरोधात वापरलेली हिंसा जशी घातक असते, तशीच स्वकीयांनी स्वकीयांसाठीच वापरलेली आत्यंतिक अहिंसा घातक ठरु शकते, या विचारांचे लोकमान्य होते. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेतून राष्ट्रास बाहेर काढण्यासाठी क्रांतिकारकांनी जो क्रांतियज्ञ आरंभला होता, त्यामध्ये लोकमान्य टिळकांशी भूमिका ही ‘राजकारण बहुत करावे। परंतु कळोच नेदावे।’ या समर्थांच्या वचनास समांतर होती. कदाचित त्यामुळेच त्या काळात लोकमान्य टिळकांचे चरित्र फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सबंध राष्ट्रातील क्रांतिकारकांस प्रेरित करत होते.
लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्या संबंधात कडवटपणा आला त्यासाठी कारणीभूत झाले ते वेदोक्त प्रकरण! वेदोक्त प्रकरणाचे विवेचन करताना या घटनांचे साक्षीदार खुद्द बाळाचार्य खुपेरकर तसेच ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. या प्रकरणाची विस्तृत चर्चा ग. रं. भिडे यांनीही केली आहे. वेदोक्त प्रकरणाचा टिळकांशी संबंध कसा, बघूया.
ज्याप्रमाणे एक नेता आपल्या देशाला, समाजाला, संघटनेला संघटीत करून सतत कार्यरत राहतो त्याचप्रमाणे टिळकांनी काँग्रेसला कार्यप्रवण बनवले. त्यांनी काँग्रेसचे मवाळ राजकारण जहाल करून काँग्रेसला खर्या अर्थाने लोकमान्यता मिळवून दिली. आपल्या मागणीपाठोपाठ लोकसंघटनेची शक्ती पाहिजे व त्यासाठी नेत्यांनी,पुढार्यांनी स्वार्थाचा विचार न करता पुढे आले पाहिजे. ही विचारसरणी काँग्रेसच्या राजकारणात प्रविष्ट करण्याचे पहिले श्रेय लोकमान्यांचेच !
डोळ्यांसमोर काही भव्य-दिव्य-असामान्य दिसले की शब्दसाधकांच्या लेखणीची पहाट होते असा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांची महती कवी भूषणाने आजन्म गायली; जगभरातून त्या थोर चरणांवर काव्याची अगणित स्तुतिसुमने आजही वाहिली जातात. तेव्हा एकोणीस-विसाव्या शतकात उदयास आलेल्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या क्रांतिसूर्याला नमन करण्यासाठी, त्याच्या कीर्तीचे गोडवे गाण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी कवींनी आपली लेखणी ओली केली नसती तरच ते नवल होते. या कवींनी आपापल्या प्रतिभेचा आधार घेऊन लोकमान्य साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा
कोणत्याही महापुरुषाची विशिष्ट विषयावरील भूमिका लक्षात घेताना, त्या मागील संदर्भ पाहणे आवश्यक ठरते. लोकमान्यांनी त्याकाळात सामाजिक सुधारणांपेक्षा राजकीय सुधारणांना प्राधान्य दिले ही वस्तुस्थिती आहे. होणार्या सुधारणा लोकांना विश्वासात घेऊन झाल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होते. कारण, तसे न केल्यास समाज आपापसात विभागला जाईल आणि त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला अडथळा निर्माण होईल असे टिळकांना वाटे! टिळकांच्या समाजसुधारणेच्या भूमिका नेमक्या काय होत्या, जाणून घेऊया!
राजकीय चळवळ जनसामान्यांपर्यंत नेण्याचे नवनवीन मार्ग शोधणे गरजेचे होते. अशावेळी टिळकांचे लक्ष गेले गजाननाकडे! गणेशोत्सवाचे स्वरूप सार्वजनिक आणि व्यापक करून लोकजागृतीचे ते एक प्रभावी साधन करण्याचे श्रेय नि:संशय टिळकांचे आहे. म्हणूनच या उत्सवाच्या तेव्हाच्या स्वरूपावर टिळकांच्या व्यक्तिमत्वाची गडद छाया होती आणि मुख्य म्हणजे, इंग्रज सरकारही टिळकांकडे बघायच्या नजरेतूनच या उपक्रमाकडे पाहत होते. या दोन्ही गोष्टी कशा, ते या लेखातून पाहूया.
ज्यांनी टिळक चरित्राचे प्राथमिक का होईना, वाचन केले आहे, त्यांना हे माहितीच असेल की, विद्यार्थीदशेतून बाहेर पडल्यापडल्या लोकमान्यांनी आपले पाऊल कुठे टाकले, तर ते शिक्षणक्षेत्रात. महाविद्यालयात असताना टिळक-आगरकरांना राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा काढली पाहिजे, ही गरज जाणवली होती. लोकमान्य टिळकांच्या कार्यावरून आणि विचारांवरून त्यांचे शिक्षणव्यवस्थेबाबतचे विचार किती चौफेर आणि सर्वव्यापी होते, हे दिसून येते. सरकारी हमालखाने बंद करून खरी विद्यापीठे निर्माण करण्यासाठी लोकमान्यांनी शक्य होते तेवढे सतत आधी स्वतः केल
कोणाही थोर पुरुषाच्या मनांतील उदात्त विचार व अंतःकरणांतील सद्भावना यांचा विकास कसा होत गेला, हे सांगणे केव्हाही कठीणच असते. टिळक हे स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक, वक्ते होते हे आपण जाणतोच. सूर्याची उपासना करून पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला हा क्रांतिसूर्य पुढे आपल्या तेजाने संपूर्ण राष्ट्राला दीपवून टाकतो खरा! साहजिकच प्रश्न पडतो, ‘टिळक घडले कसे?’
अथांग पसरलेल्या किनार्याला टकरा देत उचंबळणार्या लाटा तुम्ही पाहिल्या असतील. अनेकदा बेभान होऊन त्या भिडतात किनार्यावर, कारण विराट समुद्र असतो त्या लाटांच्या पाठीशी! ब्रिटिशांच्या साम्राज्याशी टिळकसुद्धा एखाद्या लाटेप्रमाणे टकरा देऊ पाहात होते, पण त्यांच्या पाठीशी विराट सागर होता कुठे? टिळकांचे मोठेपण हे आहे की, त्यांनी एकीकडे ब्रिटिशांशी तर झुंजी दिल्याच ; पण दुसरीकडे आपल्या मागे खंबीरपणे चालणारी शेकडो माणसे निर्माण केली. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर विराट लोकसागर उभारला. ब्रिटिश साम्राज्यावर धडका देत देत ही