शिवसेना शाखा क्रमांक ११ चे शाखाप्रमुख सुभाष येरुणकर यांनी आज त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आ. दरेकर यांनी भाजपचा झेंडा हाती देत येरुणकर व त्यांच्या सहकाऱ्यांना पक्षात सामील करून घेतले आणि जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे निश्चितच सोबत असेन असा विश्वास दिला.
Read More
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर केले. या राष्ट्रीय सहकार धोरणाचे सर्व स्तरातून, विशेषतः सहकार क्षेत्राकडून, महिला आणि युवा पिढीकडून स्वागत केले जात आहे. भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनीही या धोरणाचे स्वागत केले असून राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात एक नवी क्रांती घडणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
स्वयं पुनर्विकास हे जन आंदोलन म्हणून पुढे आलेय. ठाणे, पनवेल, घणसोली येथे सभा, बैठका झाल्या. तुडुंब गर्दी होती. ही गर्दी माझ्यासाठी नाही तर लोकांचा प्रश्न, गरज आहे त्यासाठीची होती. शिवधनुष्य पेलवणे फार अवघड असते पण स्वयं पुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलवणार आहोत, असा विश्वास भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती भाजप गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यासाठी “मराठवाडा वॉटर ग्रीड” संकल्पना मांडली, त्यावर कामही सुरू आहे. वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे ६७ टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर बोगद्यातून वशिष्ठ नदीला सोडले जाते आणि हे पाणी अरबी समुद्राला जाऊन मिळते. हे ६७ टीएमसी पाणी जर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला मिळाले, पाईपलाईनद्वारे हे पाणी तिन्ही जिल्ह्यात फिरवले तर कोकणातील पाणीटंचाई कायमची दूर होईल. त्यामुळे मराठवाड्याप्रमाणे कोकणच्या समृद्धीसाठी कोकण वॉटर ग्रीड होणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणाच्या आर्थिक
रत्नदुर्ग किल्ल्यालगत असलेल्या भाटकरवाडा येथील समुद्रात टेहळणी पाणबुरूजाजवळ भराव टाकून अतिक्रमण केले गेले आहे. या अतिक्रमणांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासन कारवाई करणार का? असा सवाल भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.
पश्चिम दृतगती महामार्गांवर शौचालयांची सुविधा नाही. मुंबईहून दहिसर, विरारला जाण्यासाठी दीड-दोन तास लागतात. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. याचा आढावा घेऊन पश्चिम दृतगती महामार्गांवर ज्या जागा आहेत तिथे शौचालयांची सुविधा प्रवाशांसाठी करणार का? अशी विचारणा आज सभागृहात बोलताना आ. दरेकर यांनी शासनाला केली.
स्वयंपुनर्विकास ही ठाणेकरांचीही गरज आहे. लोकप्रतिनिधीनी एकत्र येऊन नागरिकांना ताकद कशी देता येईल त्याचबरोबर ठाणे जिल्हा बँकेने जास्तीत जास्त शिथिलता आणून जास्तीचे कर्ज उपलब्ध करावे. केवळ धोरण आणून चालणार नाही तर सोसायटीला ‘माझी सोसायटी’ या भावनेतून समजून घेत त्यांचे पालकत्व ठाणे जिल्हा बँकेने स्वीकारावे, अशी विनंती भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केली. ते शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या वतीने स्वयंपुनर्विकासासंबंधी आयोजित करण्यात आलेल्या क
खासगी वन जमिनीवर राहत असलेल्या रहिवाशांचे राहत्या जागीच पुनर्वसन करावे, अशी मागणी आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी सभागृहात शासनाकडे केली.
संजय गांधी नॅशनल पार्कमधील बिबट्यांचे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे लहान मुले आणि माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढले असून हे हल्ले थांबविण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात जेणेकरून भविष्यात बिबट्यांचे हल्ले कमी होण्यास मदत होईल, अशी विनंती भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक निवडणुकीकरिता आमदार प्रविण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजय कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली दि.७ जुलै रोजी सहकार पॅनेलने आपले उमेदवार घोषित केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पोलिसांचे मानसिक आरोग्य, निवास आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष लक्ष पोलिसांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, तसेच त्यांच्या निवास सुविधांसाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. ५० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून दोनदा, तर ४० वर्षांवरील पोलिसांना वर्षातून एकदा आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे. यासोबतच पोलिसांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि निवासाच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. २ जुलै रोजी विधानपरिषदेत सांगितले.
भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीसाठी ‘सहकार पॅनल’चे २१ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात डॉ. सी.डी. देशमुख यांचे स्मारक आणि त्यांची दाते गावातील छीन्न-विछीन्न झालेली वास्तू उभारावी, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात शासनाला केली.
मुंबईत सर्रास अनधिकृत हॉटेल्सची बांधकामं सुरु आहेत. या बांधकामांना परवानग्या देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार? असा सवाल आज भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान उपस्थित केला.
खासगी विकासकाच्या भरवश्यावर न राहता स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता यावा यासाठी स्वयंपुनर्विकास कृती समिती, नवी मुंबईतर्फे आज, रविवार दि. २९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता स्वयंपुनर्विकास विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला भाजपा विधान परिषद गटनेते, मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकासाचे शिल्पकार आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
उबाठा गटाचे चांदिवली विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहे. रविवार, २२ जून रोजी मंत्री आशिष शेलार आणि भाजप आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले.
स्वयंपुनर्विकास म्हणजे फार मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकावर अवलंबून न राहता रहिवाशांनी स्वतःची इमारत स्वतः उभी केली पाहिजे. दक्षिण मुंबईतील पागडीच्या इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचा प्रश्न येत्या एक-दीड महिन्यात मार्गी लावू, असा शब्द भाजपा विधानपरिषद गटनेते तथा मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांनी रहिवाशांना दिला. रुपेश फाऊंडेशन आणि मुंबई बँकेच्या संयुक्त विद्यमाने डोंगरी येथे आयोजित केलेल्या ‘स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन’ शिबिरात दरेकर मार्गदर्शन करीत होते.
मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात दि. २८ मे रोजी मुंबई शहर शिक्षक मंडळाचे महायुवा संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमात आमदार प्रवीण दरेकर यांनी युवा शिक्षकांना मार्गदर्शन केले. या महासंमेलनात १६०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. शिक्षकांच्या विविध समस्या, मार्गदर्शनपार सत्रांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. दैनिक मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांच्या मार्गदर्शनातून साकारलेल्या या महायुवा संमेलनाचे आयोजन मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विशाल कडणे यांच्या नेतृत्वात करण्यात
भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या बोरिवली पूर्व येथील नँसी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे शनिवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते उदघाटन पार पडले. यावेळी भर कार्यक्रमात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नँसी आणि सुकरवाडी एसटी डेपोच्या पुढील ३ महिन्यांत निविदा काढणार, अशी घोषणाच केली.
स्वयंपुनर्विकास योजना ही महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्रात 'गेमचेंजर' ठरेल, असा विश्वास स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचे अध्यक्ष आणि भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी शुक्रवार, दि. ३ मे रोजी व्यक्त केला.
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
( pravin darekar on sanjnay raut ) उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात वक्तव्य केले होते. राऊत यांच्या या वक्तव्यावर भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी पलटवार केला आहे. “संजय राऊत यांचे बोलणे कोत्या मनोवृत्तीचे असून रोज उठल्याबरोबर त्यांचा भोंगा वाजलाच पाहिजे. अशा प्रकारचा विषय घेऊन भावना भडकविता येतात का?” असा केविलवाणा प्रयत्न त्यांचा असल्याची टीकाही दरेकरांनी केली आहे.
Devendra Fadnavis भुदयनगर येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्वसन सदनिकेचे चटई क्षेत्र किमान ६२० चौ.फूट प्रमाणे करुन, नव्याने निविदा काढण्यात याव्यात आणि ही निविदा प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी दिले.
( Inauguration development works in Poladpur taluka by MLA Pravin Darekar ) पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांचे उदघाटन आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये खडकवाडी ते चिखली ते खोतवाडी रस्ता, कामथे ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॅाक्रिट रस्त्याच्या कामासह कुलस्वीग बेवर्ज प्रा. लि. सावित्री पॅकेज अँड ड्रिंकीग वॅाटर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी आ. दरेकर यांनी पोलादपूर तालुक्याचा मागासलेपणाचा ठपका दूर करण्याचा प्रयत्न करू, अस
( self-redevelopment Pravin Darekar ) गुढीपाडवा म्हणजे केवळ नववर्ष नव्हे, तर नवीन संकल्प करण्याचा दिवस. या दिवशी अनेकजण संकल्प करतात. भाजप गटनेते आ. प्रविण दरेकर यांनीही “स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना विशेषतः मराठी माणूस जो चाळीत राहतो, त्याला मोठे घर मिळावे,” हा माझा गुढीपाडव्यानिमित्ताने संकल्प असल्याचे प्रतिपादन केले आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेले गाणे आणि उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी युट्यूबच्या माध्यमातून हेच गाणे पुन्हा टीकात्मक आविर्भावात गाऊन दाखवल्यामुळे त्या दोघांवरही बुधवार, २६ मार्च रोजी विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी हा हक्कभंग प्रस्ताव दाखल केला.
( CM Devendra Fadnavis at the inauguration of Pravin Darekar office ) आमदार प्रविण दरेकर यांनी सामाजिक, राजकीय जीवनात आपल्या मेहनतीतून आपली प्रतिमा, नेतृत्व, कर्तव्य या सर्व गोष्टी उभ्या केल्यात. सहकार क्षेत्रात त्यांनी ज्या प्रकारे ठसा उमटवला आहे तो मोलाचा आहे. हेच काम अधिक पुढे नेण्यासाठी 'कर्तव्यपथ' या कार्यालयाचे आज उदघाटन करण्यात आलेय. दरेकरांचे कार्यालय हे सर्वसामान्य माणसाला हक्काचे कार्यालय आहे. या कार्यालयात प्रत्येकाला न्याय मिळेल, सर्वसामान्य माणसाचे कल्याण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र
( government bring a lake plan for fishermen in Konkan pravin darekar ) कोकणात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. पर्यटनसोबत कोकणच्या आर्थिक विकासाला मासेमारीतून मोठा उपयोग होणार आहे. ज्याप्रमाणे सरकार मागेल त्याला शेततळे देते त्याप्रमाणे कोकणात मच्छिमारांसाठी मागेल त्याला तलाव ही योजना आणणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना विचारला.
( Develop the historical footprints of Maa Jijau at Pachad Pravin Darekar ) राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ दर्जेदार पध्दतीने विकसित केले पाहिजे. तेथे दर्जेदार अशा कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत. समाधी स्थळ हे ऐतिहासिक पाऊलखुणा आहे, त्या टिकवून ठेवणे महत्वाचे आहे. यासाठी रायगड प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन शासनाने मूल्यमापन करावे, अशी विनंती भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली.
( Health Department take strict action against bogus doctors and hospitals Manisha Kayande & Pravin Darekar ) विधानपरिषदेत आज आमदार मनिषा कायंदे यांनी नाशिकच्या पंड्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या गैरकारभाराबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ.प्रविण दरेकर यांनी बोगस डॉक्टर, दवाखान्यांवर सार्वजनिक आरोग्य विभाग कठोर कारवाई करणार का, ? असा सवाल उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार प्रविण दरेकर यांना अटक करण्याचा प्लॅन असल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ११ मार्च रोजी केला. मुंबई शहरातील अभ्युदय नगर येथील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ५१ व्या शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
( Pravin Darekar on ST employee get their salaries on time ) एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. त्यांना ठरलेल्या तारखेला व वेळेत पगार मिळावा यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करणार का? आणि एसटी कर्मचाऱ्यांना न्याय देणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला.
विधानपरिषदेत आज जागतिक महिला दिनाचे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे व महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेत सहभाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई बँकेतील खातेधारक महिलांसाठी विनातारण १० हजारापासून २५ हजार रूपये मुंबई बँक अत्यल्प व्याज दरात पैसे देईल आणि १५०० चे १५ हजार कसे होतील ही महिला दिनानिमित्त महिला भगिनींना मानवंदना देणार असल्याचे सांगितले.
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून त्यासाठी निधीही पूर्णतः मंजूर झालेला नाही. शासनाने यात लक्ष घालून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली.
(Devendra Fadnavis) स्वयंपुनर्विकास नाही, हा तर आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण ‘श्वेतांबरा’चे उद्घाटन केले आहे. श्वेतांबरा चे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितले, तेव्हा खर्या अर्थाने स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते, हे माझ्या लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकते. तसेच सगळ्यात महत्त्वाचे जर काही असेल, तर आत्मनिर्भरता आली,” असा विश्वास मु
(Devendra Fadanvis) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक साहाय्याने चारकोप ‘श्वेतांबरा’ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्वयंपुनर्विकसित प्रकल्पाचे उद्घाटन व चावीवाटपाचा कार्यक्रम मंगळवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री खा. पीयूष गोयल, माजी मंत्री आ. योगेश सागर यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर असतील.
Pravin Darekar राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्याचा कट रचल्याचे षडयंत्र आखले गेले होते, असा आरोप भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी केला होता. या प्रकरणी चौकशीसाठी राज्य सरकारकडून कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमणूक करण्यात आली होती. आज या एसआयटी पथकाची भाजपा आ. प्रविण दरेकर यांनी मुंबई पोलीस मुख्यालयात भेट घेतली आणि आपल्या
मुंबईतील मूळ मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचे महत्व आणि राज्य सरकारची यातील भूमिका याविषयी स्वयंपुनर्विकासाचे जनक भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याशी दैनिक 'मुंबई तरुण भारत'ने साधलेला संवाद
मुंबई : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील मौजे केंबूर्ली येथे दोनशे खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ( Mahad's Super Specialty Hospital ) उभारण्यासाठी शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार शासकीय जमीन हॉस्पिटलला देण्यासाठी शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र ज्या जमिनीवर हे रुग्णालय उभारायचे होते त्या जमिनीऐवजी डोंगरावरील जमीन हॉस्पिटलसाठी देण्याचा निर्णय झाला. यावर पोलादपूरचे सुपुत्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आक्षेप घेत हा निर्णय रद्द करून नवीन निर्णय जारी करावा अशी मागणी केली होती. त्यानुसार
मुंबई : संजय राऊत यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी. कुणाचा उदय होतोय हे पाहण्यापेक्षा आपल्या पक्षाचा अस्त होतोय त्याची काळजी करावी. राऊत केवळ बोलघेवडेपणा करू शकतात. कुठलेही रचनात्मक, विकासात्मक भाष्य त्यांच्याकडून होऊ शकत नाही, हे महाराष्ट्र पाहतोय, अशी टीका भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी केली आहे.
मुंबई : मध्य कोकण क्षत्रिय मराठा को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या घाटकोपर (पूर्व) येथील नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा गुरुवार, ९ जानेवारी २०२५ रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांच्या हस्ते पार पडणार आहे.
मुंबई : वैकुंठवासी प. पू. सदगुरु मोरे माऊली महाराजांनी आपल्या समोर अनेक चांगले आदर्श ठेवले आहेत. आता त्यांचाच वारसा तंतोतंत पुढे नेण्याचे काम दादा महाराज मोरे माऊली करताहेत. आपला हा उत्कर्षांचा ठेवा अशाचप्रकारे आपण पुढे नेऊया. समाजासाठी जे काही चांगले देता येईल ते देण्याचा प्रयत्न करूया. हिंदुत्वाचा, साधूसंतांचा विचार पुढे नेण्यासाठी अशा प्रकारच्या अभियानाची, प्रबोधनाची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी केले आहे.
ठाणे : दि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन लि. आणि सहकार विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीने आज ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महा अधिवेशन पार पडले. या महा अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी फोनवरून संवाद साधत ठाण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत ज्या काही अडीअडचणी, जे काही निर्णय घेणार आहात त्याची सोडवणूक करण्यासाठी माझ्या दालनात निश्चितपणे बैठक बोलवीण, असे आश्वासन दिले. तर मुंबईत स्वयंपुनर्विकास ज्याप्रमाणे होतो तशा प्रकारची गृहनिर्माण संस्थांची स्व
मुंबई : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ( Atalbihari Wajpayee ) यांनी जीवनाची वाटचाल ध्येय्याप्रती, मुल्यांप्रती, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वाना सोबत घेऊन आदर्श राजकारण काय असते ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत, पक्षाचे नेतृत्व करताना दाखवून दिलेय. वाजपेयी यांची कार्यसंपदा, साहित्य मोठं होते. राजकारणात त्यांनी घालून दिलेले आदर्श, पाळंमुळं कुणालाही विसरता येणार नाहीत, अशा शब्दांत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.
(Ram Shinde) विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी आज महायुतीतर्फे भाजपचे राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर राम शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन केले.
नागपूर : राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते होते आणि एकनाथ शिंदे तत्कालीन नगरविकास मंत्री होते त्यावेळी त्यांना अडकविण्याचा कट खोटे गुन्हे दाखल करून रचला गेला. पोलीस अधिकाऱ्यांच्या चर्चेही ही ऑडिओ क्लिप भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी आज विधानपरिषदेच्या सभागृहात सादर केली. तसेच या प्रकरणाची तात्काळ एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीही दरेकर यांनी केली.
मुंबई : उद्धव ठाकरे यांचे हिंदूंच्या, हिंदुत्वाविषयीचे प्रेम बेगडी आहे. ज्यावेळी साधू हत्याकांड झाले त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी काय भुमिका निभावली ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेय, अशा परखड शब्दांत भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
Pravin Darekar महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सीमावाद पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने लक्ष घालून समन्वयातून मार्ग काढतील आणि मराठी भाषिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतील, असा विश्वास व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.