कर्नाटक राज्यासह महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, नाशिक, भाईंदर असे ४४ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने मोठी कारवाई केली आहे. सर्वात अधिक छापेमारी ठिकाणे ठाणे ग्रामीण परिसरात असल्याची माहिती एनआयएच्या सुत्रांनी दिली आहे. ही छापेमारी इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीत सापडलेले दहशतवादी हे देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब ब्लास्टचे साहित्यही एनआयएने जप्त केले आहे.
Read More