राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दि.२२ मार्च रोजी अटारी सीमेजवळील ड्रग्ज जप्तीची मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यात एकूण १०२ किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. हे हिरॉईन एप्रिल २०२२ मध्ये लिकोरिस रूट्स (मुलेठी) च्या मालामध्ये लपवून देशात तस्करी करण्यात आले होते, परंतु सीमेवर रोखण्यात आले होते.
Read More
ह़ॉलिवूडसह जगभरातील इतप भाषिक चित्रपटरसिक प्रेक्षकांना आपल्या अनोख्या दिग्दर्शकीय शैलीने मंत्रमुग्ध करणारे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनी अवतार चित्रपट घेऊन येत विचारांच्या सर्व सीमाच पार केल्या. 'अवतार' आणि 'अवतार : द वे ऑफ वॉटर' या चित्रपटांनी जगभरात बक्कळ कमाई केली. या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता प्रेक्षक अवतार ३ च्या प्रतिक्षेत आहेत. आणि आनंदाची बाब म्हणजे अवतार ३ लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सुतोवाच दिग्दर्शकांनीच केले आहे.
भारतातील सामाजिक रचना गुंतागुंतीची आहे बहुआयामी कंगोरे असलेली आहे. परंतु नोकरदार वर्गात व कार्यालयीन स्थळी महिलांप्रती विषमता कमी होत चालल्याचे मान्यच करावे लागेल. समाज प्रबोधनातून या गोष्टी साध्य होतील. पण यालाही पूर्वनियोजित सुरक्षित कामाची चौकट दिल्याशिवाय आता गत्यंतर राहिले नाही. नोकरी व्यवसायात धर्म, पंथ, लिंग असत नाही असं म्हटल तरी वंचित असलेले सर्व घटक, महिला, दिव्यांग, LGBTQ, विशेष पात्रता असलेले सगळ्यांना ' सर्वसमावेशक ' वातावरण निर्माण करण्याची उद्योग विश्वात मागणी आहे. एकत्रित प्रयत्न केल्यास समा
ब्रिटनमध्ये राहणारा खलिस्तान लिबरेशन फोर्सचा प्रमुख अवतार सिंह खांडा यांचा मृत्यू झालेला आहे. यापूर्वी त्याला विषबाधा झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. आता ब्रिटनच्या मेडिकल रेकॉर्डमध्ये अवतारला ब्लड कॅन्सर असल्याची पुष्टी झाली आहे. भारतीय गुप्तचर सूत्रांनी अवतार सिंह यांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. अवतार सिंह यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर हल्ला केला होता. त्याला ब्रिटनमधील बर्मिंघम शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पंजाबमध्ये अमृतपाल सिंग याच्यावर कारवाईचा निषेध म्हणून लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर तिरंग्याचा अवमान करणारा खलिस्तानी समर्थक अवतार सिंग खांडा याला अटक करण्यात आली आहे. खांडा हा प्रतिबंधित गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. तसेच पंजाबमध्ये सुरू असलेल्या तपासात खांडा हा अमृतपालचा हस्तक असल्याचेही निष्पन्न झाले आहे. लंडनमध्ये पकडलेला खांडा हा खलिस्तान लिबरेशन फोर्सशी संबंधित असलेला कुवंत सिंग खुराणा याचा मुलगा आहे.