भाजप मागाठाणे विधानसभा आणि वीर सावरकर रहिवाशी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी पाटीदार समाज हॉल, वीर सावरकर नगर, बोरिवली पूर्व येथे पहाटे ५ वा. स्वप्नील पंडित प्रस्तुत 'दिवाळी पहाट मेघ मल्हार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Read More
गणेशोत्सव आणि दहीहंडी पाठोपाठ मुंबईत नवरात्रोत्सवही दणक्यात साजरा करण्यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. गतवर्षीच्या प्रमाणे यंदाही काळाचौकीच्या शहिद भगतसिंग मैदानावर मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले असून भव्यदिव्य आयोजनाची पुनरावृत्ती भाजपकडून करण्यात आली आहे. यासह भाजपकडून एकूण तीनशे ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्रिशतकीय दांडिया महोत्सवातून गुजरातीसह मराठी मतांना खेचण्याची रणनिती आखण्यात आली आहे.
मुंबई : जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही ते एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमा
गेल्या काही दिवसांत बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटांचाही बोलबाला दिसून आला. वेगवेगळ्या जॉनरचे मराठी चित्रपट आपल्या भेटीस आलेले आपण पाहिले. प्रेक्षकांनी या सगळ्या चित्रपटांना चांगला प्रतिसादही दिला. आता मराठीतील अनेक उत्कृष्ट कलाकारांची टीम घेऊन रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच घेऊन येतायत हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्त
मराठी पॉप गाण्यांचा सूर सातासमुद्रापार वाजणार आहे. ‘सुरेल क्रिएशन’ व ‘३एएमबीझ’ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेत ‘अवधूत गुप्ते- स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉनसर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. येथील मराठी जणांना अस्सल मराठी मातीतल्या गाण्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.