राजधानीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने जुन्या वाहनांवर मोठे पाऊल उचलले आहे. दि. १ जुलै रोजीपासून दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेल कार आणि १५ वर्षांपेक्षा जुन्या पेट्रोल कारना दिल्लीत इंधन मिळणार नाही आणि त्यांना चालवण्याची परवानगीही मिळणार नाही. म्हणजेच, पेट्रोल पंपांवर या वाहनांसाठी पूर्णपणे प्रवेशबंदी असणार आहे. याशिवाय, जर असे वाहन आढळले तर ते ताबडतोब जप्त केले जाणार आहे.
Read More