स्त्रीची आत्मचरित्र, व्यक्तिचित्र किंवा तिच्या कर्तृत्वाविषयीचं लेखन माझ्या नेहमीच आवडीचं. कारण, तिचं व्यक्तिमत्त्व गुंतागुंतीचं असतं. एकाचवेळी अनेक ठिकाणी लक्ष घालून अनेक आघाड्यांवर हुकूमत गाजवण्याची त्यांची हातोटी विलक्षण असते. प्रतिभा रानडे हे असेच एक विलक्षण व्यक्तिमत्त्व. ‘पैस प्रतिभेचा’ हे पुस्तक म्हणजे त्यांची चहू बाजूंनी वेध घेणारी एक प्रदीर्घ मुलाखत आहे. एका प्रतिभावंत आणि अनुभवसंपन्न स्त्रीला दुसर्या एका जिज्ञासू स्त्रीने विचारलेले प्रश्न आणि त्या दोघींव्यतिरिक्त वाचकांचे मनही समृद्ध करणारी त्यां
Read More
स्त्री जाणती झाली, तिला आवाज फुटला की ती बोलू लागते. बहुतेकदा हा आवाज घराच्या चार भिंतींबाहेर ऐकू येत नाही. पण, जागृत झालेले आत्मभान आणि भाषेची जोड याच्या आधारे ती काळाच्याही कराल भिंती लांघून बोलू लागते, ती लिहू लागते, जनमानसापर्यंत पोहोचते. तेव्हा आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त अशाच काही गाजलेल्या आणि भावलेल्या स्त्री आत्मचरित्रांचा घेतलेला हा कानोसा...
सफदर हाश्मींची एक अनुवादित मराठी कविता आहे. ती काव्य रचना अशी आहे. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या.माणसांच्या जगाच्या, वर्तमानाच्या -भूतकाळाच्या ,एकेका क्षणाच्या ! जिंकल्याच्या-हरल्याच्या,प्रेमाच्या-कटुतेच्या !
‘साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’ व ‘महाराष्ट्र तामिळ वेल्फेअर असोसिएशन’च्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात लेखक राम नाईक यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्ष, तामिळनाडूचे अध्यक्ष पी. अण्णामलाई व मुंबई भाजपचे उपाध्यक्ष, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन उपस्थित राहाणार आहेत.
आध्यात्मिकतेपुढे स्वामींना आत्मचरित्राचे महत्त्व क्षुल्लक वाटले असेल. पण, तरीही त्यांचे आत्मानुभव, क्रांतिदर्शित्व, विचार ते आपल्या वाङ्मयातून प्रगट करतात. त्यातून आपल्याला त्यांच्या आत्मचरित्राचा बोध घेता येतो. या पार्श्वभूमीवर समर्थांच्या वाङ्मयातून त्यांच्या आत्मचरित्राचा काही बोध होतो का, हे पाहायचे आहे.
२०२१ मध्ये हार्पर-कॉलिन्स करणार सैफचे सैफचे चरित्र प्रकाशित!
ट्विटरच्या माध्यमातून प्रियंकाने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!
रमेश पतंगे लिखित ‘समरसतेचा वाटसरू’ हे पुस्तक त्याच धाटणीचे वाटल्यास आश्चर्य नाही. पण, त्याला केवळ ‘अनुभवकथन’ म्हणणे लेखकावर अन्याय ठरेल. आज रा. स्व. संघ भारतातील अग्रगण्य व अपरिहार्य संघटन आहे. रमेश पतंगे संघाचे स्वयंसेवक, विचारवंत आहेत. संघ स्वयंसेवकाचे विचार अनेक वर्षे त्यांनी मनमोकळेपणाने शब्दबद्ध केले आहेत.
येत्या शुक्रवारी नारायण राणेंच्या 'झंझावात'या आत्मचरित्राचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत होत असून 'झंझावात' हे नाव राणे यांच्या व्यक्तिमत्त्वाला तसे अगदी साजेसेच म्हणावे लागेल.
देशाला परम वैभवाला नेण्याचे आणि उत्तम व्यक्ती व समाजनिर्मितीचे ध्येय गाठीशी घेऊन १९३६ साली राष्ट्र सेविका समितीची लक्ष्मीबाई केळकर यांनी स्थापना केली आणि आजही समितीचे कार्य देशभरात उत्कृष्टपणे सुरू आहे. सुशीला महाजन यांनी आपल्या ‘डाव मांडियेला’ या आत्मचरित्रपर पुस्तकातून राष्ट्र सेविका समिती, जनसंघ, पती मधुकरराव महाजन आणि एका विचाराला वाहिलेल्या परिवाराचा लेखाजोखा मांडला आहे.
चित्रकलेच्या आवडीपासून ते आज एक ख्यातनाम चित्रकार म्हणून वासुदेव कामत यांच्या जीवनाचा त्यांच्याच शब्दांत रेखाटलेला हा कलाप्रवास...
आधी वाणिज्य शाखेत प्रवेश, त्यानंतर पत्रकारिता आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा... आज लेखक, दिग्दर्शक, कलाकार म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या अभिराम भडकमकर यांच्या जीवनातील हे तीन टप्पे खरं तर खूप काही सांगून जातात