डॉ. विजय कोकणे हे सामाजिक कार्यकर्ते असून साहित्यिकही आहेत; त्यांच्यामुळे लाखो लोकांचे आयुष्य उजळले. त्यानिमित्ताने डॉ. कोकणे यांच्या आयुष्याचा मागोवा घेणारा हा लेख...
Read More
साहित्यिक, लेखक आणि कवी हा अनुभुतीतून जाणवलेल्या गोष्टी साहित्यातून मांडत असतो. मात्र यात शब्दांचा वाटा हा केवळ ७ टक्के आहे. उर्वरित ९० टक्क्यांहून अधिक वाटा हा साहित्य घडविणाऱ्या लेखकाला दिसलेल्या दृष्यांचा असतो. त्यामुळे संवाद प्रक्रियेत दृष्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी येथे सांगितले.
‘जग बदल घालुनी घाव...’ असं म्हणणारे सुप्रसिद्ध समाजसुधारक, लेखक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे सर्वार्थाने भाषेच्या, राष्ट्राच्या सीमा ओलांडून अनेकांसाठी दीपस्तंभ ठरले. त्यांच्या ज्वलंत लेखणीमुळे परिवर्तनाचा वेगळा विचार मराठी मातीमध्ये पेरला गेला. काल त्यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त त्यांच्या याच साहित्यविश्वाचा घेतलेला धांडोळा...
आपल्या लेखणीतून ज्वलंत सामाजिक वास्तव मांडणार्या प्रख्यात उर्दू लेखक, कथाकार सआदत हसन मंटोंच्या पदरी पाकिस्तानमध्ये उपेक्षाच आली. मात्र, मृत्यूनंतर ७० वर्षांनंतरही त्यांच्या लेखणीचे गारुड आजही कायम आहे...
मराठी मालिका, नाटक व चित्रपट क्षेत्रातील लेखकांच्या व्यावसायिक व सामाजिक हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘मानाचि’ लेखक संघटनेने राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेऊन लेखकांच्या समस्या व मागण्या मांडल्या. संघटनेचे अध्यक्ष विवेक आपटे, प्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम बेर्डे, राजीव जोशी, आशिष पाथरे, डॉ. अलका नाईक यांनी मंत्रीमहोदयांसमोर सविस्तर निवेदन सादर केले.
चोरून सिनेमा पाहण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सध्या ‘केंद्रीय सेन्सॉर बोर्डा’चे सदस्य झाल्यानंतरही निरंतर सुरू आहे. लेखक-दिग्दर्शक विजय बाळासाहेब पवार यांच्याविषयी...
मराठी चित्रपटसृष्टीसह रंगभूमीच्या आणि साहित्यविश्वाच्या एका शुद्ध आणि सजग वाटचालीला आज विराम मिळाला आहे. श्यामची आई या अजरामर चित्रपटात श्यामची भूमिका साकारून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते, समीक्षक, नाट्यदिग्दर्शक आणि प्राध्यापक माधव वझे यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मराठी सांस्कृतिक विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या कडाक्याच्या उष्णतेचा प्रभाव कमी करता यावा, यासाठी मे महिन्यात सगळ्यांच्या मनाला थंडावा देणारा ‘गुलकंद’ हा चित्रपट दि. १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने अभिनेते आणि विनोदवीर समीर चौघुले यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने केलेली ही दिलखुलास बातचीत...
मराठी साहित्याला संत कवयित्रींचा, लेखिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. आपल्या काव्यप्रतिभेतून या कवयित्रींनी जीवनाच्या विविध पैलूंवर अगदी नेमकेपणाने भाष्य केले. यापैकी काही आशयगर्भ काव्यपंक्तींची गीतांतही गुंफण झाली. अशाच काही निवडक कवयित्रींचा अक्षरप्रवास रसिकांसमोर उलगडून दाखवत आहेत, लेखिका तपस्या वसंत नेवे. नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने आणि आगामी जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ‘शब्दव्रती’ या अनोख्या संकल्पनेबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’ने तपस्या नेवे यांच्याशी साधलेला हा संवाद...
दिल्ली येथे पार पडणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्धाटन देशाचे पंतप्रधान Narendra Modi यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे वेगळेपण नेमके कशात आहे हे जाणून घेऊया आज या व्हिडीओच्या माध्यमातून #मराठीभाषा
मराठी विश्वकोशाच्या पहिल्या महिला अध्यक्षा, चतुरस्र लेखिका व अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या साहित्यिका डॉ. विजया वाड ( Vijaya wad ) यांना १८ जानेवारी रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करुन देणारा हा लेख...
उद्या, दि. १२ जानेवारी. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपला देश हा तर जगातील सर्वाधिक युवा संख्या असलेला देश. युवा ही देशाची खरी संपत्ती मानली जाते. वर्तमान सुधारण्याची आणि भविष्य घडवण्याची ताकद या युवांमध्ये असते. आपल्या देशातील युवांनी ( Young Marathi Generation ) प्रत्येक क्षेत्रात मोलाचे योगदान दिलेलेच आहे. आज साहित्य क्षेत्रही याला अपवाद नाही. आपली अभिजात आणि समृद्ध असलेली मराठी भाषा टिकवून ठेवण्याचे आणि पुढे नेण्याचे काम अनेक युवा साहित्यिक क
पुणे येथील सुप्रसिद्ध लेखक विजय तरवडे यांनी दि. 18 डिसेंबर रोजी वयाची सत्तर वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्यांचे शिक्षक प्रा. श्याम अत्रे यांनी त्यांच्या विद्यार्थीजीवनाचा व साहित्यिक योगदानाचा आढावा घेतलेला हा लेख...
महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील पहिल्या महिला पत्रकार व पुर्णवेळ बातमीदारी करणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार तथा ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक नीला वसंत उपाध्ये यांचे ७ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री १०.२० वाजता मुंबईत चेंबूर येथे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हरहुन्नरी नाट्य दिग्दर्शक, लेखन आणि अभिनेते योगेश सोमण यांनी आजवर आपल्या लिखाण आणि अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. १९८७ पासून त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ आजही कायम आहे. त्याचा हाच कलाप्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न दै. मुंबई तरुण भारतने केला आहे. यावेळी त्यांनी अभिनयाबद्दल त्यांचे स्पष्ट मत देखील मांडले.
ऐतिहासिक मालिकांचे लिखाण करणारे ज्येष्ठ लेखक मेराज जैदी (Meraj Zaidi) यांचे निधन झाले आहे. १ मार्च २०२४ रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मेराज जैदी यांची प्रयागराज येथील दांदूपुर भागातील आपल्या राहत्या प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि तीन मुले असा परिवार आहे.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई आणि मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिन आणि मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच यावेळी ४८ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे.
ज्येष्ठ लेखिका, चरित्रकार, संशोधिका, लघुपट निर्मात्या, दिग्दर्शक अशी कलाक्षेत्रात मुक्तछंद मुशाफिरी करणार्या अंजलीताई कीर्तने यांचे नुकतेच निधन झाले. एक वाचक आणि एक लेखक म्हणूनही स्त्रीजीवनाचा खोलवर विचार करणार्या अंजली कीर्तने यांच्या साहित्यातील स्त्रीत्वाचे पदर उलगडणारा हा लेख...
मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या राजेश देशपांडे, श्रीकांत बोजेवार, श्याम पेठकर, राहुल वैद्य व विवेक आपटे या प्रतिनिधींच्या मंडळाने सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
हॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांकडून चित्रपटाची केवळ संहितालिहिणार्या लेखकांना पुरेसे मानधनच दिले जात नाही, अशी वर्षानुवर्षाची तक्रार कायम आहे. यामुळे हे सर्व जण रस्त्यावर उतरले असून, त्यांचा गेल्या १५० दिवसांहून अधिक अमेरिकेत संप सुरुच आहे. या संपामागे बरीच कारणे असून यानिमित्ताने त्याचा आढावा घेण्याची गरज आहे.
२०२३चा साहित्य क्षेत्रातील ‘नोबेल पुरस्कार’ जॉन फॉसे या नॉर्वेजियन लेखकाला नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्ताने लेखक जॉन फॉसे आणि त्यांच्या साहित्य कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
दरवर्षी अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘स्नेहांजली पुरस्कार’ मराठी साहित्यविश्वातील एका लेखक व लेखिकेस दिला जातो. यंदाचे हे पुरस्काराचे २१वे वर्ष आहे. यावर्षीचा पुरस्कार, सुप्रसिद्ध लेखक सुमेध वडावाला (रिसबुड) यांना देण्यात येणार आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व शुभहस्ते, आज रविवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एस. एम. जोशी सभागृह, पुणे येथे हा सन्मान सोहळा संपन्न होईल. यानिमित्ताने सुप्रसिद्ध कथा व विज्ञान कथालेखक डी. व्ही. कुलकर्णी यां
अभिनेता सलमान खानचा 'रेडी', टायगर श्रॉफचा 'बागी' आणि अजय देवगणचा 'प्यार तो होना ही था' यांसारख्या चित्रपटांचे लेखक इकराम अख्तर यांना अटक करण्यात आली. एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांच्याविरुद्ध दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांची मुरादाबाद तुरुंगात रवानगी करण्यात आली असून २२ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाढत्या तंत्रज्ञानाच्या आवाक्यामुळे डिजिटल क्षेत्रात अनेक नवनवीन संधी तरुणाईला उपलब्ध होत आहेत. त्यातच चित्रपट, वेबसीरीज, यांसारख्या प्रकारांना ओटीटीमुळे नवा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे ओटीटीच्या उपलब्धतेमुळे सबटायटल रायटर्संना प्रचंड मागणी बाजारात निर्माण झाली आहे. दरम्यान. या संधीकरिता आवश्यक स्किल्स अंगी असणं अत्यावश्यक आहे. पोस्ट प्रोडक्शन हाऊसमध्ये सध्या सबटायटल रायटर्सची गरज निर्माण झाली आहे.
मनीषा बाठे या संत वाङ्मय व बहुभाषा अभ्यासक व लेखिका. तब्बल ११ भारतीय भाषा त्यांना अवगत असून, त्यांनी त्या-त्या भाषांच्या काही राज्यांतील पदव्युत्तर व पदविका संपादित केल्या आहेत. आजवर सात संशोधनपर ग्रंथांचे लेखनही बाठे यांनी केले असून त्यांनी संशोधित केलेल्या ग्रंथांना ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा’, ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’ आणि ‘महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार’ हा पुरस्कार उत्कृष्ट संशोधनासाठी प्राप्त आहे. समर्थ रामदासांच्या संप्रदायात अनुग्रहित ‘साहित्य अकादमी’द्वारे ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या ग्रंथ
नैराश्यातून अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न करणारी प्रसिद्ध गायिका कोको ली हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. कोकी ली हिने काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ती कोमात गेली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते, अखेर कोको ली हिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तिची बहिण कॅरोल आणि नॅन्सी ली हिने समाजमाध्यमावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली.
गेले एक तप मनोरंजनाऐवजी तथ्याधारीत लिखाण करणारे तपस्वी लेखक पंकज कालुवाला यांच्याविषयी...
सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार, संगीतकार, पटकथालेखक आणि अभिनेते अशा अनेक कलांमध्ये माहीर असलेले ज्येष्ठ कलावंत पुरुषोत्तम बेर्डे यांचे नवे नाटक रंगभूमीवर दाखल होत आहे. तब्बल नऊ वर्षांनी येणार्या ‘सुमी आणि आम्ही’ या नाटकानिमित्त पुरुषोत्तम बेर्डे यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
चित्रपट आणि मालिकांचे कथा, संवादलेखन, पटकथा लेखन कसे केले जाते? लेखन कसे, केव्हा, कुठे, कधी करायला हवे, या विषयावर ’जागो मोहन प्यारे’, ’एक घर मंतरलेलं’, ’येऊ कशी तशी मी नांदायला’, ’नकुशी’, ‘वैजू नंबर वन’, ’तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकांचे पटकथा लेखक तसंच ’जिंदगी नॉट आऊट’, ’शुभमंगल ऑनलाईन’, ’कन्यादान’, ‘भाग्य दिले तू मला’, ’खाद्यभ्रमंती’ मालिकेचे संवादलेखक त्याचबरोबर ’पुष्पक विमान’ आणि ’खारी बिस्कीट’ चित्रपटाचे कथा, पटकथा आणि संवादलेखक अशा अनेक भूमिका बजावलेले चेतन सैन्दाणे यांच्याशी खास बातचीत...
स्त्रीशक्तीचा महिमा कोणत्या शब्दांत वर्णावा? अनेक कवी, लेखक, वक्ते आणि विचारवंतांनी मोठमोठ्या उपमा देऊन तिची स्तुती गाण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले, तरी वेदांनी प्रतिपादित केलेल्या स्त्रीमहात्म्यापुढे ते सर्व फिकेच ठरतील. कारण, वेदांत ठिकठिकाणी स्त्रियांचे महत्त्व सर्वोच्च स्तरावरून वर्णिले आहे.
दिग्दर्शक, लेखन, अभिनेता प्रवीण तरडे मराठी चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचे नाव आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला आहे.
'संगीत देवबाभळी' या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर नवे विक्रम रचले आहेत. या नाटकाने तर अनेक नाट्य स्पर्धांमध्ये तर बाजी मारलीच आहे, नुकताच या नाटकाला काही दिवसांपूर्वी 'साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.
‘लेखकाच्या आणि ‘संकलकाच्या टेबलवर’ चित्रपट खऱ्या अर्थाने घडतो असं म्हणतात. चित्रपट चांगला होण्यात महत्त्वाचा वाटा संकलकाचाही असतो
'उद्या'चे लेखक नंदा खरे कालवश
गेले काही वर्ष तंत्रज्ञानाबरोबरच नाटकाच्या कथेपासून सादरीकरणापर्यंत अनेक बदल होत आहेत. त्यातीलच 'संगीत देवबाभळी' हे एक नाटक आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर... एक क्रांतिकारक, एक समाजसुधारक, एक भाष्यकार, एक लेखक आणि ज्ञात-अज्ञात गोष्टींचे जनक. ‘अज्ञात गोष्टींचे जनक’ हे अशासाठी की, आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर हे काही ठरावीक विषयांपुरतेच माहिती आहेत. पण, यानिमित्ताने सावरकरांचे आंतरराष्ट्रीय राजकारणाबाबतचे आणि भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे, याबद्दलचे विचार जाणून घेणे हे आजही तितकेच महत्त्वाचे आणि उपयोगी देखील आहे आणि उद्याही राहील.
‘कर्तव्यम् प्रेरणा २०२२’ हा मानाचा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना देण्यात आला. सध्या त्या ‘नॅचरोपॅथी’ आणि योगाची तृतीय वर्षाची परीक्षा देत आहेत. तसेच, एक कादंबरी, एक नाटक आणि एक कवितासंग्रहाचेही लिखाण सुरू आहे. आई-वडिलांचे संस्कार भावंडांचे सहकार्य तसेच, कुटुंबाकडून बळ मिळत गेल्याने यशाची शिखरे पादाक्रांत केली. तसेच असंख्य चाहत्यांच्या शुभेच्छांच्या जीवावर अजून खूप मोठा पल्ला गाठायचा असल्याची आकांक्षा त्यांनी मनी बाळगली आहे, अशा महत्त्वाकांक्षी प्रतिभावंत लेखिकेला भाव
विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच सर्वार्थाने माणूस म्हणून घडविण्यासाठी अविरत प्रयत्नशील असलेल्या लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या, नाट्यकर्मी डॉ. उज्ज्वला करंडे यांच्या जीवनप्रवासावर टाकलेला हा कटाक्ष...
रवींद्रनाथ टागोर यांच्या 161व्या जयंतीनिमित्त ‘पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका शासकीय कार्यक्रमात साहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, आता अकादमीच्या निर्णयाविरोधात अनेक बंगाली साहित्यिकांनी आवाज उठवला आहे.
’‘कोणाच्याही प्रभावात आणि प्रवाहात न येता लेखकाने स्वतंत्रपणे सत्याची कास धरून लिहित राहिले पाहिजे. साहित्यातही राजकारण होताना दिसत आहे त्यामुळे स्वतःच्या तत्त्वांशी आणि आदर्शांशी एकनिष्ठ राहता आले पाहिजे. कारण, आजच्या काळात ते सर्वांत कठीण आहे.
भिजात विनोदी साहित्याच्या प्रवाहात आजचे आघाडीचे लेखक म्हणून डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी ओळखले जातात. ‘गिरकी’, ‘उसंतवाणी’, ‘थट्टा मस्करी’ या त्यांच्या विनोदी साहित्यकृतीनी चिं. वि. जोशी, पु. ल. देशपांडे प्रभृतींची उणीव बर्याच अंशी भरून काढली आहे.
१९५७ साली मॅक्लिनची दुसरी कादंबरी आली-‘गन्स ऑफ नेव्हरोन.’ नेव्हरोन नावाच्या ग्रीक बेटावर जर्मनांनी दोन महाभयंकर तोफा तैनात केलेल्या असतात. काही धाडसी कमांडो जीवाची बाजी लावून त्या तोफा उडवून देतात. ही थरार कादंबरी वाचून लोक इतके वेडे झाले की, पहिल्या सहा महिन्यांत तिच्या चार लाख प्रती संपल्या.
तब्बल ४५हून अधिक वर्षे साहित्यक्षेत्रात मुशाफिरी करणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांची अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली
एक पत्रकार, लेखक, दिग्दर्शक अशा विविध क्षेत्रांमध्ये ओळख असणार्याआणि कोकणच्या मातीत जन्मलेल्या महेश्वर तेटांबेंबद्दल माहिती देणारा आजचा लेख....
लेखिका तस्लिमा नसरीन, ज्यांनी धार्मिक कट्टरतावादावर अनेकदा स्पष्ट भाष्य केले आहे, त्यांनी बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांमध्ये दररोज बलात्कार होत असल्याचा आरोप केला आहे. बांगलादेशातील मशिदी आणि मदरशांच्या दुरवस्थेबाबत तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हे वक्तव्य केले आहे.
समर्थ लेखक, घणाघाती वक्ते, ध्येयवादी ज्वलंत पत्रकार, सत्त्वशील नाटककार, कथासम्राट, कादंबरीकार आणि हिंदू संस्कृतीचे-हिंदुत्वाचे कट्टर पुरस्कर्ते, ललित गद्य, व्यक्तिचित्र चिंतनात्मक लेख, चित्रपटकथाकार, मराठी साहित्यातील अष्टपैलू प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व अशा अनेक नात्यांनी ओळखल्या जाणार्या पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने...
पालघर दातिवरे येथील सुप्रसिद्ध कवी, लेखक गणेश वसईकर (५२) यांचे सोमवार, दि. 24 मे रोजी कोरोनामुळे निधन झाले. नुकतेच त्यांच्या पत्नीचेसुद्धा कोरोनामुळे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. त्यांचे ‘बेधुंद’, ‘विलग’, ‘मधल्या मध्ये’ हे तीन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत.
पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी, पत्रकार, लेखक व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे दि. 3 एप्रिल रोजी कोरोना संकटाशी दोन हात करता करता निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांना भावांजली अर्पण करणारा हा लेख...
शिक्षकी पेशा हा एक ध्यास, साधना, तपस्या म्हणून कार्य करणार्या डॉ. राम कुलकर्णी यांच्याविषयी...
प्रेमकथांतून सामाजिक विषयांवर भाष्य करणारा, दशकभरामध्ये १४ कादंबर्यांतून लाखो वाचकांपर्यंत पोहोचलेला मराठमोळा कादंबरीकार सुदीप नगरकर याच्याविषयी...