केंद्र सरकार एका महिन्याच्या आत डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायद्याअंतर्गत मसुदा नियम जारी करू शकते, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. सरकारने याआधी कायद्याच्या डिजिटल अंमलबजावणीवर काम केले आहे आणि त्यानुसार नियम बनवले आहेत, असेही ते म्हणाले.
Read More
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राहुल गांधींच्या लोको-पायलट भेटीवर मोठा आक्षेप घेतला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चुकीची माहिती प्रसारित करून रेल्वे कुटुंबीयांचे मनोधैर्य खचण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रेल्वेमंत्र्यांनी केला आहे. राहुल गांधी आणि लोको-पायलट यांच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे मानले जात आहे.