(Northeast floods worsen) आसामसह ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आसाममधील पूरस्थितीही दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएसडीएम) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ जिल्ह्यांतील ६.३ लाख नागरिक पुरामुळे बेघर झाले आहेत.
Read More
पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. या मुद्द्यावर भारताने चीनला चोख प्रत्युत्तर देऊन अशा हास्यास्पद प्रयत्नांनी हे वास्तव बदलणार नसल्याचे म्हटले आहे.
( AFSPA Act extended manipur, nagaland, arunachal pradesh ) केंद्र सरकारने ईशान्येकडील राज्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन तीन राज्यांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याची (अफ्स्पा) मुदत वाढवली आहे. ही वाढ पुढील सहा महिन्यांसाठी लागू असेल. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मणिपूर, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमधील काही प्रदेशातील ‘अफ्स्पा’ची मुदत वाढवण्यात आली आहे.
Anti-Conversion Law अरुणाचल प्रदेशात धर्मांतर कायद्याविरोधात आता राज्यात ख्रिश्चन धर्मातील लोकांनी ६ मार्च रोजी ईटानगरमधील बोरम मैदानावर निदर्शने दर्शवली आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य अधिनियम १९७८ ला संबंधित कायदा हा क्रूरपद्धत असल्याने हा तो रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी दावा केला की, ख्रिश्चन समुदायाला टार्गेट करण्यात आले. त्यांनी असा दावा केला की, चीनच्या सीमेला लागून असलेल्या राज्यात हिंसाचाराचे अधिक प्रमाण वाढले आहे.
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशचे ( Arunachal Pradesh ) मुख्यमंत्री पेमा खांडू राज्यात धार्मिक स्वातंत्र्य कायदा लागू करण्याचे संकेत दिले आहेत. हा कायदा १९७८ साली करण्यात आला होता, जो आजतागायत लागू झालेला नाही.
Kashmir - Arunachal Partition देशद्रोही कृत्य करणारा काँग्रेस पक्ष रोज नव्याने काहीना काही कारणाने आपली लाज चव्हाट्यावर आणत आहे. काँग्रेसने एका पोस्टरमध्ये भारताच्या नकाशातून काश्मीर-अरुणाचल प्रदेश ही राज्ये नकाशातून काढून टाकण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे फोटो बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या संमेलनातील आहेत.
हिमालयाच्या पर्वंतरांगांमधून वाहणार्या सुबानसिरी नदीच्या खोर्यामधून सरड्याच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Calotes sinyik). या प्रजातीचे नामकरण कॅलोटस सिनिक (Calotes sinyik), असे करण्यात आले असून ही प्रजात दिनचर आहे. (Calotes sinyik)
महाराष्ट्रातील संशोधकांनी भारतामधून प्रथमच टाचणीच्या 'देवदत्ता' कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावला आहे (new damselfly species). अरुणाचल प्रदेशमध्ये पार पडलेल्या या शोधामुळे भारतामधून 'देवदत्ता' कुळातील टाचणीची पहिल्यांदाच नोंद झाली असून ही टाचणी विज्ञानासाठी नवीन असल्याने तिचे नामकरण 'देवदत्ता आदी', असे करण्यात आले आहे (new damselfly species). यामुळे भारतातील चुतरांच्या यादीत भर तर पडली आहेच, सोबतच नव्या कुळाचा समावेश देखील झाला आहे. (new damselfly species)
अरुणाचल प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप सरकारने मोठा भर दिला आहे. त्यामुळे अनेक दशकांचा अनुशेष भरून निघण्यास प्रारंभ झाला आहे. याचे उदाहरण सांगायचे तर स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये डोनीपोलो विमानतळाचे उद्घाटन झाले. परिणामी, अरुणाचल प्रदेशच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे सिद्ध करण्यात भाजपला यश आले. त्याचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीच्या निकालात उमटले.
गुजरातनंतर अरुणाचल प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. ईशान्येतील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ज्यांना आपल्या विधिमंडळ पक्षाचे नेते बनवले होते ते लोम्बो तयेंग यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसकडे आता राज्यात फक्त एकच आमदार उरला आहे आणि तोही राज्याचे माजी मुख्यमंत्री नबाम तुकी. यापूर्वी आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला आहे.
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसह राज्याचे सचिवही उपस्थित होते.
नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. १९९५ ते २००१ मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस म्हणुन जबाबदारी आचार्य यांनी जबाबदारी साभाळली होती. त्याना पुर्वांचलातील सात भगिनी राज्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी या सर्व राज्यांत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केले होते. आचार्य यांनी २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच नागभूमी, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, आसाम राज्याचे राज्यपाल पद भुषवले.
नागभूमीचे माजी राज्यपाल पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचे दि. १० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे ईशान्य भारताला संपुर्ण देशाशी जोडणारा दुवा निखळला. त्याचबरोबर ईशान्य भारतातील तरुणांना देशातील तरुणाईशी समकक्ष बनविण्यात पद्मनाभ बाळकृष्ण आचार्य यांचा सिंहाचा वाटा होता, असे विधान उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.
शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद असो की, राष्ट्रवादीतील काका-पुतण्याचा. कोर्टातील कोणत्याही सत्तासंघर्षाच्या लढाईत एका प्रकरणाचा वारंवार उल्लेख होतो. ते म्हणजे, नबाम राबिया प्रकरण. त्यामुळेच सर्वांनाच उत्सुकता लागून असते की नेमकं हे नबाम राबिया प्रकरण आहे तरी काय? तेच आपण या लेखातून जाणून घेऊ.
कुत्र्यासाठी मैदाने रिकामे करणाऱ्या आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सरकारने सक्तीची निवृत्ती दिली आहे. गेल्या वर्षी रिंकू यांनी आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी दिल्ली येथील त्यागराज मैदान खाली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करण्यात आला आहे. ही घटना समोर येताच गेल्या वर्षी सरकारने तातडीने कारवाई करत दुग्गा आणि त्यांचे पती आयएएस अधिकारी संजीव खिरयार यांची नवी दिल्लीतून बाहेर बदली केली होती.
हांगझू येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंचा व्हिसा नाकारण्यात आला असून चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाचा भारताने निषेध केला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा आपला दौरा रद्द केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जी-20 परिषद, रशिया युक्रेन युद्ध, भारतातील भ्रष्टाचार, जातिवाद आणि जातीयवाद यावर चर्चा केली. काश्मीर, अरुणाचलमध्ये G-20 बैठकीवर पाकिस्तान आणि चीनचा आक्षेप पंतप्रधान मोदींनी खोडून काढला. ते म्हणाले की, देशाच्या प्रत्येक भागात सभा घेणे स्वाभाविक आहे. दरम्यान G-20 परिषदेपूर्वी त्यांची मुलाखत जगाला संदेश देणारा मानली जात आहे.
चीनने भारताचे अविभाज्य अंग असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनचा भाग आपल्या नकाशात दाखवला आहे. चीनच्या या कृत्याची भारताने तीव्र शब्दात निंदा केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की, "चीनला असे नकाशे जारी करण्याची सवय आहे. असे दावे करून इतरांचा प्रदेश आपला होत नाही. भारताच्या काही भागांसह नकाशा जारी केल्याने काहीही बदलणार नाही."
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातील ७२०.७५ किलोमीटर लांबीचे ९१ रस्ते आणि ३० लांब पल्ल्याच्या पुलांच्या नुतनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे,अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी दिली.पृथ्वी विज्ञान मंत्री रिजिजू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,या प्रकल्पांची एकूण अंदाजे किंमत 757.58 कोटी रुपये आहे.
‘लॅण्ड ऑफ द डॉन-लाईट-माऊंटन्स’ म्हणून प्रसिद्ध असलेले अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात दुर्गम राज्य आहे आणि उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी पहिली भारतीय भूमी आहे. तथापि, १९८७ मध्ये राज्याचा दर्जा मिळूनही, २०१८ पर्यंत नागरी विमानतळे राज्यासाठी एक दूरचे स्वप्न राहिले होते. त्यावेळी अरुणाचल प्रदेश भारताच्या व्यावसायिक विमान वाहतूक नकाशावर आठ ईशान्येकडील राज्यांमध्ये शेवटच्या स्थानावर होते. दि. २१ मे २०१८ रोजी ‘एअर इंडिया’ची उपकंपनी असलेल्या ‘अलायन्स एअर’चे पहिले व्यावसायिक उड्डाण अरुणाचल प्रदेशातील पासीघाट वि
मी दि. १ मेपासून ११ मेपर्यंत अरुणाचल प्रदेशचा आणि अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भारत-चीन सीमेचा दौरा केला. याच सीमेवर मी १९८५-१९८८ आणि १९९२-१९९५ मध्ये तैनात होतो. त्यानंतर अनेक वेळा मी या भागात सैनिकी दौरे केले होते. मात्र, २०१६ नंतरचा हा पहिला दौरा होता. त्यामुळे जमिनीवरती परिस्थिती नेमकी काय आहे, हे मला स्वतःच्या डोळ्याने अनुभवता आले. माझ्या लेखाच्या पुढच्या दोन भागांमध्ये मी अरुणाचल प्रदेशमध्ये झालेली प्रगती आणि यामुळे भारत-चीन सीमा सुरक्षित करण्यामध्ये आपल्याला कसे यश मिळत आहे, याचे विश्लेषण करीन.
ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम सुरू करत आहे. या उपक्रमांतर्गत चीनच्या सीमेवरील 17 गावांची सरकारने निवड केली असून, त्यांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. अहवालानुसार, ही 17 सीमावर्ती गावे 663 गावांचा भाग आहेत, ज्यांचे पहिल्या टप्प्यात नूतनीकरण केले जाईल, तर प्राथमिक लक्ष पर्यटकांसाठी सुविधा आणि उत्तम कनेक्टिव्हिटी यावर असेल.
'मोचा' चक्रिवादळ हे १६० किमी प्रतितास आणि १८० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील अतितीव्र ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारकडे झेपावत आहे. त्याच्या प्रभावाखाली आज पश्चिम बंगाल,ओडीशा, बांग्लादेश, आणि म्यानमारच्या किनाऱ्यावर अतिवृष्टी अपेक्षित आहे. भारतात त्रिपूरा , मिझोराम, नागालँड, अरूणाचल प्रदेश, आसाममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात उष्ण वारे वाहण्याची शक्यता आहे. राज्यात उष्माघाताने ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
जवळपास ५० वर्षे जुन्या आसाम – अरूणाचल प्रदेशदरम्यानच्या सीमावादावर मोदी सरकारच्या काळात तोडगा निघाला असून वादमुक्त ईशान्य भारताच्या प्रवासातील ए कमहत्त्वाचा टप्पा आता पूर्ण झाला आहे.
Amit Shah at Arunachal Pradesh अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती गाव किबिथू येथे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’च्या शुभारंभप्रसंगी उपस्थितांना संबोधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह...
अरुणाचल प्रदेशमधील काही गावांची नावे बदलून चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा उद्दामपणा केला खरा. पण, भारताच्या एक इंच भूभागाकडेही कोणी वाकड्या नजरेने पाहिले, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड दम गृहमंत्री शाहंनी चीनला दिला. कारण, हे पूर्वीचे बोटचेपे काँग्रेस सरकार नाही. उलट ईशान्य भारतातील विकासाच्या गंगोत्रीने आता चीनही धास्तावल्याचेच हे द्योतक!
ईशान्य भारतातील जनतेने १९६२ साली चिनी आक्रमणाच्यावेळी “माय हार्ट गोज आउट टू पीपल ऑफ आसाम,” असे म्हणून आसामसह संपूर्ण ईशान्य भारत चीनच्या घशात घालण्यास तयार असलेले हतबल पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू बघितले आहेत. आणि ईशान्य भारत म्हणजे भारताच्या विकासाची अष्टलक्ष्मी आहे असे ठामपणे सांगून ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही काम ते बघत आहेत. मोदी सरकारच्या काळात लिहील्या जाणार्या ईशान्य भारताच्या विकासगाथेविषयीची पार्थ कपोले यांनी शब्दांकित केलेली तीन भागांची विशेष वृत्तम
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अरूणाचल प्रदेशातील सीमावर्ती किबीथू गावातून 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे, या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने ४८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, यापैकी २५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान खास रस्ते जोडणीसाठी खर्च करण्यात येतील. 'व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम' या केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ
अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे चीनने अरूणाचल प्रदेशातील ११ जागांची नावे जरी बदलली, तरी त्यांना वस्तुस्थिती बदलता येणार नसल्याचे भारताने चीनला सुनावले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्याचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. तसेच एकीकडे पाकिस्तान दिवसेंदिवस अराजकाकडे मार्गक्रमण करीत असताना, भारताने मात्र ‘मेक इन इंडिया’च्या अभियानाला गतिमान केले आहे. तेव्हा, मागील आठवड्यातील ठळक घडामोडींचे थोडक्यात विश्लेषण करणारा हा लेख...
संघ-भाजपला ते अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा आभास निर्माण करणे आणि नागालॅण्ड, मेघालय आणि अरुणाचल या ख्रिस्तीबहुल राज्यात सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपला पाठिंबा देणे, हा विस्मयकारक बदल आपण पाहातच आहोत. आता केरळमध्येही त्याचे वारे वाहू लागले आहेत.
आपण भारतीयांना युरोप खंडाचे तसे नेहमीच आकर्षण. लंडन, पॅरिस, रोम यांसारखी अतिप्रगत शहरे जगभरातील पर्यटकांना खुणावतात. पण, सोबतीला आल्प्स पर्वतराजीत विसावलेली सुंदर सुंदर खेडी, निसर्गरम्य पर्यटनस्थळे, ग्रीसमध्ये आढळणारी प्राचीन शहरे व त्यांचे अवशेष, इटलीचे सुंदर समुद्रकिनारे बहुतांशी वाचनांतून अथवा छायाचित्रांतूनच आपल्या भेटीला येतात. परंतु, आजच्या या लेखातून आपण अशा एका अवलियाचा परिचय करुन देणार आहोत, ज्याने ही कल्पना सत्यात उतरविली आणि यशस्वीही करुन दाखविली...
ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी भाजपसाठी आनंदाचे वातावरण असतानाच, देशाच्या राजकारणातही अनेक संदेश दिले आहेत. २०२३ वर्षातील निवडणुकांची ही सुरुवात होती. कर्नाटक, तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्येही यावर्षी विधानसभा निवडणुका होतील. त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजेल. तेव्हा, लोकसभा निवडणुकीच्या अगोदर होणार्या या विधानसभा निवडणुका आणि त्यांचे निकाल हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण, यातून कोणते राजकीय पक्ष किती पाण्यात आहेत, याची कल्पना येणार आ
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी नुकतीच अरुणाचल प्रदेशास भेट दिली. यावेळी त्यांनी चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थितीचा आढावा घेतला आणि तेथे सज्ज असलेल्या जवानांच्या साहसाचे कौतुक केले.
गुजरात निवडणुका जिंकल्याचा उत्साह सुरु असताना चीनचं सैनिक तवांगमध्ये घुसखोरी करत होतं. याचा अर्थ तुम्ही या देशाच्या सुरक्षेचंहा राजकारण आणि उत्सव केला आहे. राजकारण कोणत्या थराला गेलं आहे हे पहायचं असेल तर तवांगमधील घटना देशाच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे. अशा शब्दात उ. बा. ठा गटाचे खासदार संजय राउत यांनी टीका केली आहे.
चिनी सैन्याने वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) तवांग क्षेत्रात यथास्थिती बदलण्याचा प्रयत्न ९ डिसेंबेर रोजी केला होता. या अतिक्रमणास भारतीय सैन्याने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून चिनी सैनिकांना त्यांच्या हद्दीत पिटाळून लावण्यास यश आले आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये केले आहे.
भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांच्या 'माय होम इंडिया' संस्थेतर्फे दरवर्षी इशान्य भारतासाठी कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान व्यक्तीस 'वन इंडिया अवॉर्ड' (ONE - Our North East) हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा या पुरस्काराचे बारावे वर्ष आहे. गुरुवार, दि. १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वा. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, दादर (प) येथे हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी हा पुरस्कार अरुणाचल प्रदेशातील वनवासींच्या पारंपारिक श्रद्धा आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या कार्यासाठ
येत्या स्वांतत्र्य दिनी, १५ ऑगस्टला अरुणाचल प्रदेशचे पहिले विमानतळ सेवेत कार्यरत होणार आहे. होलोंगी विमानतळ सुरू होत असल्याने अरुणाचल प्रदेशची विमानतळाची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. हॉलोंगी विमानतळ हा एक ग्रीनफील्ड विमानतळ आहे, जो राज्याची राजधानी इटानगरपासून फक्त १५ किमी अंतरावर आहे. ही केवळ राज्यासाठीच नाही तर देशाच्या इतर भागांसाठीही चांगली बातमी आहे. कारण अरुणाचल प्रदेशला जाण्यासाठी अवघड मार्ग पार करून जावे लागत होते.
देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वेगवान पूर्ततेसाठीच्या ‘गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान’अंतर्गत ४०व्या ‘प्रगती बैठकी’स संबोधित केले. यावेळी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासोबतच त्यांनी राज्यांना राज्यस्तरावरही ‘गतिशक्ती मास्टर प्लान’ तयार करण्याचे आवाहन केले.
“ईशान्येच्या राज्यांतील भ्रष्टाचाराची संस्कृती भाजपने संपुष्टात आणली आहे. येथे विकासकामांसाठी दिल्या जाणार्या निधीचा लाभ शेवटच्या व्यक्तीला मिळत आहे, जिथे यापूर्वी काँग्रेसच्या काळात ही रक्कम मध्यस्थांच्या घशात जायची,” असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेश येथे आयोजित एका कार्यक्रमात रविवारी बोलताना केला.
अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील आंतरराज्य सीमावाद पुढील वर्षापर्यंत संपुष्टात येईल. ईशान्य भारत हिंसामुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या आठ वर्षात या भागातील ९ हजार दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी केले.
ईशान्येतील धर्मांतरित लोक अल्पसंख्याक असण्याचा फायदा मिळवू लागतात. जन्माने ते अनुसूचित जमातींतही मोडतात. याचा फायदा घेऊन अल्पसंख्याक व अनुसूचित जमातींसाठी असणारे असे दोन्ही फायदे ते मिळवू लागतात. आपोआपच स्वधर्माचे पालन करणार्या लोकांना अनुसूचित जमातीसाठी असणार्या सुविधा अपुर्या पडू लागतात. कारण, रिक्त स्थानांची संख्या सीमित असते. म्हणूनच अशा प्रकारे दुहेरी दर्जा मिळवण्याच्या विरोधातला आवाज या प्रदेशात जोर धरू लागला आहे. आज जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म स्वीकारणारे लोक
चिनी सैन्याने (पीपल्स लिबरेशन आर्मी – पीएलए) अपहरण केलेल्या अरुणाचल प्रदेशातील मूळचा १७ वर्षीय भारतीय तरुण मिराम तारोन नुकताच घरी परतला आहे. त्याने आता खुलासा केला आहे की, अपहरण केल्यानंतर चिनी सैन्याने आपल्यावर अत्याचार केले. 'पीएलए'ने मला मारहाण केली आणि विजेचे शॉक दिल्याचे तारोन म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ ) जगाच्या नकाशावर जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश पाकिस्तान आणि चीनचा भाग म्हणून दाखवत आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शंतनू सेन यांनी जगाच्या नकाशाचे स्क्रीनशॉट टाकून हा खुलासा केला आहे. त्यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना पत्र लिहून लवकरात लवकर हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
अरुणाचल प्रदेशाच्या सियांग जिल्ह्यातून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने १७ वर्षीय मीराम तारोनचे अपहरण केले होते. ही घटना २० जानेवारी रोजी घडली होती. विशेष म्हणजे, त्या तरुणास चिनी सैन्याने गुरूवारी भारताकडे सुपूर्द केल्याचे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
अरुणाचल प्रदेशाच्या सियांग जिल्ह्यातून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने नुकतेच अपहरण केलेल्या १७ वर्षीय मिरांग तारोनला परत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय सैन्याचे पीएलएमधील त्यांच्या समकक्षांशी बोलणे झाले असून दोन्ही देशांनी प्रोटोकॉल अंतर्गत त्याच्या सुरक्षित सुटकेवर सहमती दर्शविली असल्याचे चार कॉर्प्स मुख्यालयातील संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी अरुणाचल प्रदेशामधून सापसुरळीच्या नव्या प्रजातीचा नवीन आणि कुळाचा शोध लावला आहे. अरुणाचल प्रदेशातील आपाटानी या जमातीच्या नावावरून या नव्या प्रजातीेचे नामकरण प्रोटोब्रेफेरस आपाटानी असे करण्यात आले आहे. राज्यातील तरुण संशोधकांनी अरुणाचल प्रदेशात २०१९ साली केलेल्या मोहिमेव्दारे पाच नव्या सरपटणाऱ्या प्रजातींचा शोध लावला आहे.
फिलिपीन्सच्या समुद्रकिनार्यावर लवकरच तैनात होणारी भारतीय ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्रे चिनी ड्रॅगनच्या वर्चस्ववादाला अंकुश लावतीलच. पण, त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा आयातदार असणार्या भारताची आता शस्त्रास्त्रांचा निर्यातदार म्हणून होणारी ‘आत्मनिर्भर’ घोडदौडही विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल.
चीन तिबेटमध्ये नियोजनबद्ध महामार्गांचे जाळं विस्तारित आहे. जो महामार्ग भारतीय सीमांवरील अरुणाचल प्रदेशला लागून आहे. मागील सात वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम चालू आहे. चीनने आतापर्यंत ३१० मिलियन डॉलर इतका खर्च या प्रकल्पावर केला आहे. भारतीय सीमेलगत असणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीवरील धरणावरून हा मार्ग जात असून यामागे भारतातील अरुणाचल प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा सुप्त हेतू स्पष्ट होतोय.