छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी समितीने धनगड जातीतील सहा बोगस दाखले केले रद्द केल्याने धनगर आरक्षणातील अडथळा दूर झाला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच धनगर आरक्षणाच्या लढाईत आपण टप्प्याटप्प्याने विजयाकडे जात असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Read More
धनगर आरक्षणासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन लढा देणार असल्याची माहिती भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात ही बैठक पार पडली.
धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आणि धनगर योद्ध्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीले आहे. धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे.
धनगर आरक्षणाची जालन्यात ठिणगी पडली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी समाजाला शांततेचं आवाहन केलं आहे. जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण लागलं. निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी न आल्याने आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी मोर्चा आक्रमक झाला होता. त्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ओबीसी आरक्षणापाठोपाठ आता धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. आपण योग्य पावलं उचलावीत अन्यथा धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवावी. असा इशाराच पडळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे. धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाने ५० दिवस दिले होते. आज ही मुदत संपली आहे. याकरिता पडळकरांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशाराच दिला आहे.
मराठा पाठोपाठ धनगर आरक्षणाचा मुद्दा ही महाराष्ट्रात पेटलेला असताना. धनगर आरक्षणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिगृहावरती विशेष बैठक केली. मात्र दुसरीकडे दहिवडीत धनगर आरक्षणासाठी चार तरुण हे उपोषणाला बसलेले होते.या चारही तरुणांची समजूत काढण्यात गोपीचंद पडळकर यांना यश आल्यानंतर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई व पडळकर यांच्या उपस्थितीत
''आम्ही सर्व धनगर बांधव आमचे प्रश्न कायदा व संसदीयमार्गाने मार्गी लावण्यास प्रयत्नशील आहोत. परंतु होणारी दिरंगाई व सतत अवहेलना यामुळे आमच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. सरकारने याबाबत काळजी व दक्षता घेऊन धनगर त्वरित बैठक आयोजित करावी. अन्यथा महाराष्ट्रात सुद्धा जाठ आंदोलनासारखे धनगर आंदोलन' उभा राहू शकते,'' असा सूचक इशारा धनगर समाजाचे नेते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आ. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना धनगर समाजाच्या प्रश्नांवर एक पत्र लिहून समाजाच्या अडचणींचा पाढाच वाचला आहे.
येत्या ३१ मे रोजी धनगर समाजाने जागर करावा, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा कायम असतानाच आता आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे.
आज राज्यभरातून धनगर समाज 'ढोल बजाओ' आंदोलन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणासंबंधित मोठी घोषणा केली आहे. अनुसुचित जमातीतील (एसटी) समाजाला लागू असलेल्या २२ योजना धनगर समाजाला लागू होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
धनगर आरक्षणाची सुरुवात मीच केली, यासाठी दिल्ली येथे मी पहिला मोर्चा काढला होता आणि या समाजाला न्यायदेखील मीच देणार
धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली