(Parth Pawar) अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या डिझाईन बॉक्स्डच्या नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढून पोस्ट केल्यानंतर मिटकरींनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. याच संदर्भात अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी त्यांचा पक्ष अमोल मिटकरींच्या या मतांचे समर्थन करत नसल्याच्या आशयाची पोस्ट करत मिटकरींना चांगलीच समज दिली आहे.
Read More
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष-चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात सुरू आहे. अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा सांगण्यात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत कायदेशीर लढाई सुरू झाली. यानंतर निवडणूक आयोगासमोर आतापर्यंत तीन सुनावण्या झाल्या. या तीनही सुनावणीदरम्यान दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान दि. २० नोव्हेंबर रोजी सुनावणीमध्ये निवडणुक आयोगाने शरद पवार गटाच्या वकिलांची कानउघडणी केली आहे.
“ठाकरे सरकारला केवळ आदित्य ठाकरे, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या भविष्याची चिंता आहे. राज्यातील गोर गरिब पोरांची चिंता नाही. भाषणबाजीत केवळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचारांना हरताळ फासायचं. आज अनेक विद्यार्थी परीक्षेच्या, मुलाखतीच्या, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. हे सरकार नेमकं काय करतंय, वसूली करायला सांगण्यात व्यस्त आहे की काय?”, अशी तोफ भाजप आमदार राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर डागली.
सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना आपला नातू पार्थ पवार याच्या बोलण्याला कवडीची किंमत नाहीये. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द अपरिपक्व आहे, असे विधान केले. या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर हा इशारा नेमका कोणाला अजित की पार्थ पवार अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.
देशभरातल्या ५४२ लोकसभा मतदार संघात आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. या निवडणुकीत आठ हजाराहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये मावळ प्रांतात शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार अशी लढत रंगणार आहे.
पार्थ पवारांना मावळमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच मावळ, शिरूर, बीड, नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली आहे. त्याऐवजी त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पवार पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकांत म्हणे, पवार कुटुंबातील (की घराण्यातील?) चार चारजण निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये स्वतः शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे हे तर आहेतच आणि त्यांच्यासोबत अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार हेही असण्याची शक्यता आहे.