नुकतेच इराण-इस्त्रायलने युद्धबंदी करारावर सहमती दर्शवल्याने त्यांच्यातील संघर्ष संपत नाही तोवर इस्रायलने सीरियावर हल्ले केल्याची बातमी समोर आली. इस्रायलकडून युद्धाचा इशारा मिळताच जीवाच्या भीतीने सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल शरा आणि संरक्षण मंत्री त्यांच्या कुटुंबियांसह दमास्कसमधून पळून गेल्याची माहिती आहे. मात्र, ते असे एकमेव राष्ट्रप्रमुख नाहीत ज्यांच्या जीवाला धोका आहे. जगातील पाच देशांच्या प्रमुखांची हत्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More
ग्रीस, सायप्रस आणि आर्मेनिया या देशांना क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय घेऊन पाकसमर्थक तुर्कस्तानला भारताने अप्रत्यक्ष इशारा दिला. तुर्कस्तानशी ताणलेले संबंध असलेल्या या तिन्ही देशांना थेट क्षेपणास्त्र पुरवठ्याचा निर्णय घेत, तुम्ही आमच्या शत्रूंची साथ द्याल, तर भारतही चोख प्रत्युत्तर देईल, ही मोदी सरकारची कूटनीती तुर्कीच्या चिंतेत भर घालणारी ठरावी.
आर्मेनिया हा देश अशांत प्रदेशातील लहान देश आहे, तर भारत एक उगवती महासत्ता आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध व त्यांचे परस्पर भौगोलिक-सामरिक फायदे लक्षात घेऊन एकमेकांच्या हितसंबंधांना पूरक आणि धोरणात्मक भागीदारी वाढविण्याचा मार्ग भारत-आर्मेनियाच्या सहकार्यातून पुढे येणार आहे.
पाकिस्तानसारख्या दिवाळखोर देशाला त्रास देण्याने भारताचे काम भागणार नाही. त्यामुळे या युद्धातून योग्य ते धडे घेऊन भविष्यात काश्मीर भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ होऊ शकणार्या ड्रोन हल्ल्यांविरोधी रणनीती तयार असायला हवी.
रविवारी मतदानाच्या निकालानंतर मात्र मुस्लीमबहुल किर्गिझस्तानमध्ये लोकं रस्त्यावर उतरली. आधीच आर्मेनिया आणि अझरबैजानच्या संघर्षामुळे पूर्व युरोपातले वातावरण तापले असताना, मध्य आशियातील किर्गिझस्तान मध्ये पेटलेल्या जनआक्रोशाच्या ठिणगीने बघता बघता वणव्याचे स्वरूप धारण केले आणि आता या देशात निवडणुकांचे निकाल रद्द करण्याच्या मागणीने अधिकच जोेर धरलेला दिसतो.
आज जेव्हा आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान युद्धाच्या बातम्या वाचल्यावर अनेक जण या देशांचे आकार आणि भारतापासूनच अंतर पाहून त्याकडे दुर्लक्ष करतात. हे युद्ध छोटेखानी असले तरी भारतासाठी फार महत्त्वाचे आहे.
एकीकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७५व्या सत्रात देशोदेशीचे प्रमुख दहशतवादविरोध, जागतिक शांततेची निकड हेच दरवर्षीचे घासून गुळगुळीत झालेले मुद्दे मांडत असताना, पूर्व युरोप आणि पश्चिम आशियातील ख्रिश्चनबहुल आर्मेनिया आणि मुस्लीमबहुल अझरबैजान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. गेल्या तीन दशकांपासून दोन्ही देशांमधील वादग्रस्त भूभाग असलेल्या नागोर्नो-काराबाखवरून (एनकेआर) सध्या ही वर्चस्वाची लढाई पेटली आहे. अजूनही या भागातील परिस्थिती निवळलेली नसून संयुक्त राष्ट्रसंघ, रशिया, अमेरिका यांनी दोन्ही देशांना चर्चेच
या देशात निर्माण झालेला संवैधानिक पेच, त्यावरून तापलेले राजकारण आणि एका नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहिलेली आर्मेनियन जनता.