मतदार ओळखपत्राला आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी कायदे मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानंतर आता मतदार ओळखपत्राला आधारशी जोडणे अत्यावश्यक झाले आहे.
Read More
केंद्र सरकारतर्फे अर्थसंकल्पात आयकर भरताना पॅनकार्ड नसल्यास आधार क्रमांक लागू करण्याबद्दलची घोषणा करण्यात आली होती. मात्र, पॅनकार्ड नसेल आणि चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दहा हजारांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. केंद्र सरकार या संबंधित प्रस्ताव लागू करण्याच्या विचारात आहे.
भारतीय आयुर्विमा मंडळ (एलआयसी) १ मार्च, २०१९ पासून डिजिटल युगात पाऊल ठेवणार आहे. याद्वारे ग्राहकांना प्रिमियम भरणा करण्याच्या तारखा चुकल्यास आठवण करून देणारा लघुसंदेश पाठवण्यात येणार आहे. याशिवाय पॉलीसी बंद पडण्याची आणि बोनस जमा झाल्याचीही माहीती मिळणार आहे.
नवीन बॅंक खाते सुरू करण्यासाठी आता आधार क्रमांक सक्तीचा राहणार नाही, नवे मोबाईल सिमकार्ड घेताना ग्राहकाची ओळख पटवण्यासाठीही आधार क्रमांक आवश्यक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेलिग्राफ कायद्यात ही दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यातही यावेळी सुधारणा करण्यात आली