व्हॉट्सअप, टेलिग्राम आदी ‘ॲप’द्वारे जुगार खेळला जातो तेव्हा ‘ॲप’मध्ये शिरून कारवाईस मर्यादा येते. याविषयीच्या तक्रारी केंद्रशासनाकडेही प्राप्त झाल्या आहेत. सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा’ उपलब्ध झाल्यास अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणता येईल. त्यामुळे सामाजिक प्रसारमाध्यमांचा ‘डेटा शेअरींग’साठी केंद्रशासन कायदा करण्याच्या विचारात आहे. लवकरच याविषयीचा कायदा येईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
Read More
बड्या उद्योग समूहांनी आपले प्रकल्प परराज्यात हलवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
तुम्हीसुद्धा व्हॉट्सअपने जाहीर केलेली नवीन टर्म्स अँड प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारलीये का? आणि त्यानंतर पसरलेल्या अनेक बातम्यांमुळे तुम्हालासुद्धा धक्का बसलाय का? मग हा व्हीडीओ बघाच...
व्हॉट्सअप' हे सोशल मीडिया मेसेंजर अॅप ८ फेब्रुवारीपूर्वी तुम्हाला त्यांच्या अटी शर्थी मान्य करण्यास भाग पाडणार आहे. त्याद्वारे तुम्ही करत असलेल्या संभाषणावरही वॉच ठेवला जाणार आहे. मात्र, आता यावरून वादनिर्माण होण्याची शक्यता आहे. मध्यातच टेलिग्रामने आता व्हॉट्सअपच्या या नव्या धोरणांची खिल्ली उडवत कॉफिन डान्सचा व्हीडिओ शेअर केला आहे.... अनेकजण या नव्या पॉलिसीमुळे व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करतील, तसेच सुरक्षितरित्या इतर पर्याय स्वीकारतील, असा टेलिग्राम मेसेंजरचा रोख आहे.
आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात माहिती प्रकाशवेगाने उपभोक्त्यांपर्यंत अगदी सहज पोहोचते. घटना घडल्या घडल्या त्याचे क्षणोक्षणीचे अपडेट्स मोबाईलवर आता सचित्र उपलब्ध होतात. शिवाय, प्रत्यक्ष घटनास्थळाची परिस्थितीही अवघ्या काही मिनिटांत लोकांनीच छायाचित्रित केलेल्या, शेअर केलेल्या व्हिडिओच्या, फोटोच्या माध्यमातून अवघ्या जगासमोर येते. त्यामुळे मुख्य प्रवाहातील माध्यमांची आवश्यकता, त्यांच्यावरील निर्भरता दिवसेंदिवस कमी होताना दिसते. परंतु, या 'रिअल टाईम' अपडेट्समुळे सामाजिक शांतता, सलोखाही धोक्यात आल्याच्या घटन
आयटी कायद्यातील कलम ६९A नुसार केंद्र शासनाकडे समाज माध्यमांवर निर्बंध आणण्याचा अधिकार
व्हॉट्सअॅपचा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'टेलिग्राम' या मेसेंजर अॅपवर रशियन न्यायालयाने बंदी घातली आहे.