(Waqf Amendment Bill in Rajya Sabha) बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहे. या सुधारित विधेयकावर प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मध्यरात्री उशिरा या विधेयकावर लोकसभेत मतदान पार पडले. विधेयकाच्या बाजूने २८८ तर विरोधात २३२ मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर झाले. आज म्हणजे गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी हे सुधारणा विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे.
Read More
राज्यातील पत्रकार, तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय गुरुवार, दि. १० ऑक्टोबर रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
(Thane) महायुती सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील तीन महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मुख्य मेट्रोला जोडण्यात येणाऱ्या वर्तुळाकार मेट्रोसाठी १२ हजार ५०० कोटी, ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटीचे कर्ज तसेच केमिकल रिसर्च केंद्राला भूखंड देण्यास मान्यता, अशा महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयामुळे ठाण्याचे रूपडे बदलणार असून दिवाळी आधीच ठाण्यात विकासाचे फटाके वाजू लागल्याची चर्चा रंगली आहे
कोटक महिंद्रा बँकेने सोनाटा फायनान्सच्या ५३७ कोटी रुपयांच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. खासगी क्षेत्रातील या बँकेने यावर्षी १० फेब्रुवारी रोजी सोनाटा विकत घेण्याचा इरादा जाहीर केला होता
14 सप्टेंबरला बोर्ड ऑफ डायरेक्टर बैठकीत 22 एकर जागा विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.वरळी येथील जागा तब्बल 5200 कोटींना विकली जाणार आहे.गोईसु रिअल्टीला ही जापनीज कंपनी ही जागा विकत घेणार आहे.सुमिटोमो रिअल्टी कंपनीची गोईसु ही उपकंपनी (Subsidiary) आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने १६ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या १००% निधीसह सुमारे ३२,५०० कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह रेल्वे मंत्रालयाच्या सात प्रकल्पांना मंजुरी दिली. या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांचे प्रस्ताव ऑपरेशन सुलभ करतील आणि गर्दी कमी करतील, ज्यामुळे भारतीय रेल्वेच्या सर्वात व्यस्त विभागांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास शक्य होईल.
येथील नगरपरिषदेच्या सभागृहात बुधवारी स्थायी समितीची बैठक नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत एक कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी खर्च करून शहराच्या विविध प्रभागातील रस्ते कॉंक्रिटीकरणाचा निर्णय घेण्यात आला.