अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर २०२३) खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, 'हा एक कायदेशीर मुद्दा आहे आणि हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं जात आहे. आम्ही तपासाच्या निकालाची वाट पाहत आहोत.' असं त्यांनी म्हटलं आहे.
Read More
अमेरिका जोपर्यंत अस्तित्वात आहे, तोपर्यंत इस्रायलची मदत करतच राहणार,” असे विधान अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अॅन्थोनी ब्लिंकन यांनी आपल्या इस्रायल दौर्यात केले होते. अमेरिका दिलेल्या शब्दाला जागत नाही, असा एक जागतिक राजकारणातील समज. परंतु, इस्रायलच्या बाबतीत अमेरिका जेवढं बोलतो त्यापेक्षा अधिक मदत करतो, हा आजवरचा इतिहास. इस्रायलच्या अस्तित्वावर संकट आल्यास कोणत्याही परिस्थितीत अमेरिका मध्य-पूर्वेतील या छोट्याशा देशाच्या मदतीला धावून आला आहे, हे वेगळे सांगायला नको.
इस्त्रायल-हमास युद्ध सुरु असताना एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणे दि.३० नोव्हेंबरपर्यत स्थगित केली आहेत. एअरलाईनच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. एअर इंडियाची तेल अवीवला आठवड्यातून पाच दिवस फ्लाइट्स असते. पण इस्त्रायल-हमास यांच्यात गेल्या एक महिन्यापासून संघर्ष सुरु आहे. त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन अजय अंतर्गत काही भारतीयांसाठी तेल अवीवला विशेष चार्टर्ड फ्लाइट्सची सोय केली होती.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकी परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्यामधील द्विपक्षीय चर्चेत कॅनडाविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
अमेरिकेने भारताचे महत्त्व ओळखले असून, आशिया खंडात शांतता प्रस्थापित करायचे असेल, तर नव्या भारताला पर्याय नाही, हे तिने मान्य केले आहे म्हणूनच अमेरिकी निर्बंधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भारत रशियाबरोबर व्यापारी संबंध कायम ठेवतो आणि त्याला विरोध केला जात नाही.