उल्हासनगर येथील रिजन्सी अँटिलिया गृहसंकुलात आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी २ किलोमीटर लांबीच्या तिरंगा ध्वजची रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन दिव्यांगांच्या हस्ते करण्यात आले, उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार ऐलानी, उद्योगपती महेश अग्रवाल तसेच शहरातील सर्वपक्षीय नेते यावेळी उपस्थित होते.
Read More
संशयिताला दहिसरमधून अटक
मुंबईचे नवनियुक्त आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयद्वारे ६ तास चौकशी करण्यात आली आहे.माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना तक्रारदाराला प्रभावित करण्याच्या कथित भूमिकेसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची काल सीबीआयने ६ तास चौकशी केली असे एनआयने ट्विट केले आहे.
आपली दुष्कृत्ये लपविण्यासाठी पापांचे गाठोडे करुन कितीही खोल तलावाच्या तळाला फेकले तरी कधी ना कधी ते वर तरंगतेच! सध्या अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण आणि पोलिसांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारच्या पापांचे गाठोडेही असेच तरंगू लागले असून आता त्याच्या वजनाने नेमके कोण बुडते, तेच पाहायचे.
'मनसुख हिरेन' हत्येचे मास्टरमाईंड परमबीर सिंहच ; अनिल देशमुख
अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्राच्या माध्यमातून यापूर्वी अनेक खुलासे झाले आहेत. या आरोपपत्रातून हे समोर आले आहे की, अँटिलियाचा संपूर्ण मामला पूर्वनियोजित होता आणि मुकेश अंबानींकडून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र, नंतर या योजना यशस्वी झाल्या नाहीत आणि हे प्रकरण एनआयएच्या हाती लागल्यानंतर सचिन वाजे यांना निलंबित करण्यात आले.
‘अॅन्टिलिया’ येथील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी अटकेत असलेले प्रदीप शर्मा, संतोष शेलार आणि आनंद जाधव या तिघांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. या तिघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी प्रदीप शर्मा याने त्याला विशेष कारागृहात पाठवण्यात यावे, अशी मागणी न्यायालयात केली. तळोजा कारागृहातील प्रशासनाने शर्माच्या अर्जाची योग्य ती दखल घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सीएसएमटी स्थानकात वाझेच्या लोकल प्रवासाचे रिक्रिएशन
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओतून २० जिलेटीनच्या काड्या आढळल्या होत्या. त्या गाड्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याला दुजोरा दिला आहे. जिलेटीनच्या काड्या नेमक्या कुणी आणल्या त्याबद्दल तपास सुरू आहे. नागपूरच्या एका 'सोलर इंडस्ट्रीज कंपनी'मध्ये या काड्या बनल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओतून २० जिलेटीनच्या काड्या आढळल्या होत्या. त्या गाड्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेनेच खरेदी केल्या होत्या. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) याला दुजोरा दिला आहे. जिलेटीनच्या काड्या नेमक्या कुणी आणल्या त्याबद्दल तपास सुरू आहे. नागपूरच्या एका 'सोलर इंडस्ट्रीज कंपनी'मध्ये या काड्या बनल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटीलिया या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात एनआयएच्या हाती मोठा पुरावा लागला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, सचिन वाझे २५ फेब्रुवारीला स्कॉर्पिओ लावल्यानंतर त्यात धमकीचे पत्र ठेवण्यास विसरला आहे. इनोव्हामध्ये बसून काही अंतरावर गेल्यानंतर वाझेला याची माहिती मिळाली. यानंतर, तो पुन्हा घटनास्थळी पोहोचला आणि स्कॉर्पिओमध्ये ते धमकीचे पत्र ठेवले.एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच ठिकाणी पत्र पुन्हा ठेवण्यासाठी जात असताना वाझे सीसीटीव्ह
अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार्या राष्ट्रीय अन्वेषण पथकाला(एनआयए) सचिन वाझेची एक गुप्त डायरी हाती लागली आहे
देशमुखांच्या विरोधात फोन संभाषणाचे पुरावे: परमवीर यांच्या याचिकेत उल्लेख
आता सचिन वाझे एनआयए कोठडीत आहेतच, पण त्याआधी ते ज्या बेदरकारपणे वागत होते, महाविकास आघाडी सरकारमधील लाभार्थी त्यांची बाजू घेत होते, त्यांचे निलंबन करण्याचीही मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची हिंमत होत नव्हती ते पाहता, स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण केवळ तेवढ्यापुरते मर्यादित नाही, तर त्यात आणखीही काही काळेबेरे दडल्याचे स्पष्ट होते.