सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे ‘धतड तटड धिंगाणा’! ‘पी.एस. आय. अर्जुन’ चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत असून विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील हूक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तरूणाईचा ‘स्टाईल आयकॅान’ असलेल्या अभिनेता अंकुश चौधरीचा या गाण्यातील रूबाबदार लूकही सध्या अनेकांना भावतोय.
Read More
सुपरस्टार अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट 'पी.एस.आय. अर्जुन' सध्या चांगलाच चर्चेत असून पोस्टर, टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे. चित्रपटातील अंकुशच्या पॉवरफुल लूकने राडा घातला असतानाच अंकुश प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज घेऊन आला आहे. 'पी.एस.आय. अर्जुन'मधील जबरदस्त ‘धतड तटड धिंगाणा’ हे प्रमोशनल साँग सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज असून या प्रमोशनल साँगच्या निमित्ताने स्टाईल आयकॉन अंकुशचा हा नवीन स्वॅगस्टर अंदाज प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या गाण्याच्या एनर्जेटीक, कॅची बिट्समुळे हे गाणे सर्
अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांच्या जोडीला सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक आणि संजय नार्वेकर यांच्याही प्रमुख भूमिका यात आहेत. चित्रपटाच्या यशस्वी समारोपानंतर कलाकार आणि निर्मात्यांनी या चित्रपटाविषयीचा आपला उत्साह व्यक्त केला.
मराठी सुपरस्टार अंकुश चौधरी याने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असणाऱ्या ‘छावा’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन केले. या वेळी अंकुश चौधरीसह चित्रपटात ‘अंताजी’ची भूमिका साकारणारे आशिष पाथोडे, ‘धनाजी’ची भूमिका साकारणारे शुभंकर एकबोटे, पटकथा लेखक ओमकार महाजन, उन्मन बाणकर, शिवगर्जना प्रतिष्ठानचे तलवारबाजी प्रशिक्षक भार्गव शेलार, कला दिग्दर्शक बाळकृष्ण पाटील आणि रंगभूषाकार श्रीकांत देसाई उपस्थित होते.
'नो एंट्री पुढे धोका आहे' या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि 'जपून जपून जा रे' या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती. आता लवकरच सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः 'नो एंट्री पुढे धोका आहे २ - कॉमेडी ऑफ टेरर्स' ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे.