फरार बुकी अनिल जयसिंघानी यांनी मुलगी अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जयसिंघानी यांनी सांगितले की, "माझ्या मुलीला अमृता फडणवीस प्रकरणात अडकवण्यात आलं आहे. मुलगी अनिक्षाला फ्रेम करण्यात आले आहे." असे आरोप त्यांनी केले आहेत. अनिक्षा जयसिंघानी हिला मुंबई सत्र न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
Read More
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फरार बुकी अनिल जयसिंघानी यांच्यासोबतचा फोटो समोर आला. आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान यावरून राऊतांनी "आमच्यावर झालेले आरोप खरे आणि तुमच्यावर झालेले आरोप खोटे काय? तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल असे पुरावे आमच्याकडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. नाही तर महाराष्ट्रात स्फोट होतील." असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
Amruta Fadnavis यांना लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीसांनी तपासचक्र फिरवले आहेत. या अंतर्गत आता मुंबई पोलीसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.