( Meta Services to be provided to the public through WhatsApp for bribery ) “राज्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत. त्यामुळे लाचखोरीला आळा घालण्यासाठी या कार्यालयातील सर्व सेवा डिजिटल आणि ऑनलाईन केल्या जाणार आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सर्व प्रक्रिया तीन महिन्यांत ऑनलाईन केल्या जातील. सुनावणी किंवा इतर कामे यासाठी कुणीही कार्यालयात जाणार नाही. आम्ही ‘मेटा’समवेत करार केला असून या कार्यालयातील सर्व सेवा व्हॉट्सपद्वारे जनतेला पुरवल्या जातील,” अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र
Read More
आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (R G Kar Medical College) बलात्कार प्रकरणी पीडित मृत मुलीच्या आई-वडिलांनी गोप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात बुधवारी सांगितले की, कोलकाता पोलिसांनी डॉक्टरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना लाच देण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या आई-वडिलांनी केला आहे. पैसे घेऊन हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकू असा दावा पीडितेच्या आई- वडिलांनी केला.
मेडिकल दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी तब्बल 70 हजारांची लाच घेताना ठाणे अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफ डी ए) औषध निरीक्षकासह खासगी व्यक्तीला नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. कल्याण पश्चिमेतील डी मार्टसमोर सापळा रचून नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी ही कारवाई केली आहे.
सुपरस्टार शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या कथित ड्रग्स प्रकरणात मुंबई एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शाहरूख खानच्या कुटुंबाकडून आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात २५ करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इनफोर्समेंट डिरेक्टरेट (ईडी) म्हणजेच केंद्रीय संस्था अंमलबजावणी संचनालयाकडून वानखेडेंवर हा ठपका ठेवण्यात आला असून पीएमएलए (प्रिव्हेनशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला असल्याची प्राथमिक माहिती सुत्रा
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुलीला केंद्र सरकारनने मोठा धक्का दिला आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी वीणा विजयन यांच्या कंपनीविरोधात केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. वीणा विजयन यांच्या Xlogic या आयटी कंपनीच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अनियमिततेच्या आरोपावरून केरळ राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि सीएमआरएलच्या विरोधात चौकशी केली जाईल.
अदानी हिंडनबर्ग विषय माध्यमात चर्चेत असतानाच असतानाच अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अदानींवर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे.यावरून राजकारण तापले असतानाच अनेक नेत्यांच्या यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. रविवारी दुबे यांनी आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी आयोग नेमण्याची मागणी केली होती. ओम बिर्ला यांच्याकडे सादर क
गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दिलीप माळवे याच्याविरोधात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात अत्याचाराचे कलम न लावण्यासाठी ३५ हजारांची लाच स्वीकारणार्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंब्रा पोलीस ठाण्यातच रंगेहाथ पकडले होते. तेव्हा, ‘सदक्षणाय खलनिग्रहणाय’ असे ब्रीद मिरवणारी खाकी लाचखोरीमुळे पुरती बदनाम होऊ लागली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे ज्या नगरविकास खात्याची जबाबदारी आहे, त्याअंतर्गत येणार्या ‘एमएमआरडीए’च्या ठाणे कार्यालयात लाचखोरी सुरू असल्याचे समोर आले आहे. ऐन गणेशोत्सव काळात या कार्यालयातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ‘डेप्युटी प्लॅनर’ शिवराज प्रकाश पवार याला लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला लाचलुचपत अधिकार्यांनी पडताळणी केली असता पवार खुलेआम लाच मागत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर कार्यालयातच पंचासमक्ष लाच घेताना त्या
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या पात्र अर्जदारांकडून लाचेची मागणी करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या दोन्ही कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दावडी येथील अवैध इमारत तोडू नये यासाठी अधिका:यांनी पैसे घेतले असल्याचा आरोप बिल्डरने नुकताच केला होता. पण या प्रकरणात पुढे अधिका:यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे बिल्डरने लाच लुचपत प्रतिबंध खात्याकडे धाव घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गुरुवारी दिलेल्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का मानला जात आहे.
भाजीपाला पुरवठादाराचे बिल काढण्यासाठी पाच हजारांची मागणी करणार्या यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास इच्छाराम राणे (56, सिद्धेश्वर नगर, देना नगरजवळ, जामनेर रोड, भुसावळ) यांना लाच घेताना शाळेच्या बाहेर गुरुवारी दुपारी रंगेहाथ अटक करण्यात आली.
सीबीआय भ्रष्टाचारप्रकरणी आज पहाटे दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयावरच छापे मारण्यात आले. आजवरच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे.
मुंबई महापालिका ही देशातील श्रीमंत महापालिका. परंतु, पालिकेच्या कामकाजाच्या जुन्या पद्धतीमुळे कामात दिरंगाई होत होती. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत होता. आता मात्र मुंबई महापालिकेने आधुनिक धोरणाची कास धरली आहे.