विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकाच छताखाली उपलब्ध राहून, नागरिकांच्या समस्यांचे निरसन करण्याच्या हेतूने थेट प्रशासकीय मदत मिळवून देणारा जनता दरबार आयोजित करून कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या या जनता दरबारात महाराष्ट्रातील सुमारे 500 नागरिकांनी आपले प्रश्न मांडले.
Read More
महाराष्ट्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI स्टार्टअप्सना माहिती क्षेत्रातील जागतिक कंपनी गुगलचे बळ मिळणार असून या स्टार्टअप्सना उद्योगासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात संधी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या व्हेंचर कॅपिटल अँड सेटअप पार्टनरशिप विभागाचे प्रमुख डॉ.अपूर्व चॅमरिया यांनी आज कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मंत्रालयातील दालनात भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
मुंबई महापालिकांच्या शाळेत लवकरात लवकर पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करा तसेच शिक्षक आणि पालकांच्या चर्चेतून शैक्षणिक प्रश्न सोडवा, अशा सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंगळवार, १७ जून रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गुरुवार, दि. ८ मे रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार
राष्ट्रीय शिकावू (अप्रेंटीस) उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल राहिल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिनंदन करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. केंद्रीय मंत्री चौधरी यांनी गुरुवार, दि. १ मे रोजी मंत्रालयात कौशल्य विभागाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यातील कौशल्य विकासाच्या उपक्रमांचा आढावा घेऊन विभागाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.
विलेपार्ले येथील जैन मंदिर तोडक कारवाईची घटना अत्यंत खेदजनक आणि निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंगळवार, २२ एप्रिल रोजी जैन समाजाच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.
Mangalprabhat Lodha भारतीय जनता पक्षाची आजची राजकीय उंची हा शाश्वत विचारधारेवर आधारित प्रदीर्घ वाटचालीचा परिणाम आहे. या प्रवासात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा ‘एकात्म मानव दर्शन’ हा विचार आणि जनसंघाच्या प्रवासाचा अनुभव या दोन्हींचा सखोल प्रभाव आहे.
राज्यभरात येत्या २२ ते २५ एप्रिल दरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय 'एकात्म मानवदर्शन' हिरक महोत्सव राबवण्यात येणार आहे. या महोत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येणार असून शासनाच्या सर्व विभागांनी तसेच जिल्हास्तरावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवावा, असे निर्देश कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवार, १६ एप्रिल रोजी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जागतिक महिला दिनाच्या दिवशी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. अपूर्वा पालकर लिखित 'एआय अनझिप्ड' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
वाकोला पोलिस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी रस्त्यावर उतरले आहेत.
पालघर आयटीआयमध्ये सुरु करण्यात आलेल्या मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून वर्षभरात अधिकाधिक युवकांना रोजगार मिळणार आहे, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी व्यक्त केला.
मुंबई : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून पालघर आयटीआयमध्ये मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या करिअर सेंटरमध्ये तरुणांना सीआयआय (कान्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री) प्रशिक्षण देत आहे. नुकतेच २७ तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आगामी काळात या सेंटरच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार मिळतील, असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) यांनी व्यक्त केला.
नवीन स्टार्ट अप धोरण देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्ट अपसाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवार, १६ जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. या विशेष दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे येत्या १६ जानेवारी रोजी मुंबईत एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील, विशेषत: मुंबई महानगरातील झोपडपट्ट्यांमधील कुपोषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis ) यांनी 'अॅक्शन प्लॅन' आखला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी सूचना त्यांनी शनिवार, दि. ४ जानेवारी रोजी महिला आणि बालविकास विभागाला दिली.
Mangalprabhat Lodha कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी आज एक महत्वाची घोषणा केली. "नवरात्र अर्थात शक्तिरूपिणी दुर्गेचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. ज्याप्रमाणे दुर्गा देवी हे शक्तीचे प्रतीक असून, वाईट प्रवृत्तींचा नाश करते त्याचप्रमाणे समाजातील नराधमांना धडा शिकवणारी दुर्गा प्रत्येक घरात असावी या उद्देशाने आम्ही ‘हर घर दुर्गा’ अभियान सुरू करत आहोत." असे मंत्री लोढा म्हणाले
कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याची घोषणा केली.
Mangalprabhat Lodha महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध नाविन्यपूर्ण कौशल्य विकसीत केले जात आहे आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहेत हे या विद्यापीठाचे यश आहे असे मत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
Har Ghar Durga Mission हर घर दुर्गा अभियानांतर्गत राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. ज्याप्रमाणे विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाची एक खास तासिका असते, त्याप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणसासाठी सुद्धा राखीव तासिका असाव्यात यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रयत्न सुरु केले होते. त्यातूनच हर घर दुर्गा या अभियानाची संकल्पना उदयास आली.
'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना' दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार असून कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले. सह्याद्री अतिथीगृह येथे 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी' खाजगी क्षेत्रातील उद्योजकांनी रोजगाराची मागणी नोंदविण्यासाठी आयोजित केलेल्या 'उद्योजकांशी संवाद'या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी
राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, दि. ८ जुलै रोजी दिले. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यानी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट दिली.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी लाखों भाविक भक्त पंढपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, 'विकासाच्या वाटेवर कौशल्याची दिंडी' असा अनोखा उपक्रम राबवत मंत्री मंगल प्रभात लोढादेखील या वारीत सहभागी झाले आहेत.
युवकांच्या पंखांना अधिक बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, कौशल्ययुक्त महाराष्ट्र घडवण्याच्या आपल्या प्रयत्नांना पाठबळ दिल्याबाबद्दल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले.
जगभरात २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो, त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्रातील ४१९ औद्योगिक शासकीय संस्थांमध्ये योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शासकीय औद्योगिक संस्थांव्यतिरिक्त राज्यातील शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, मुख्य कार्यालय, ६, सहसंचालक, प्रादेशिक कार्यालय, १६३ शासकीय तांत्रिक विद्यालय
बुधवारी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन असून मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षातील सर्व शिवसैनिकांना शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, यावर्षी शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांकडून वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, असे आश्वासन कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले आहे. चार दिवसांपूर्वी गुजरातमधील पावागढ येथे काही समाजकंटकांनी जैन तिर्थंकरांच्या मूर्तींची विटंबना केली. याविरोधात जैन तीर्थांच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या बैठकीत दक्षिण मुंबई जैन संघाच्या सदस्यांसोबत मंत्री लोढांनी सहभाग घेतला.
मुंबई पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार किरण रवींद्र शेलार (Kiran Shelar) यांनी शुक्रवार, दि. ७ जून रोजी कोकण विभागीय आयुक्तालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप नेते आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील राणे, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, सुषम सावंत, राजेश शिरवाडकर, शरद चिंतनकर, संतोष मेढेकर यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर बुधवार, दि. ५ जून रोजी भाजपची बैठक झाली. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे संघटनात्मक काम करण्याची जबाबदारी द्यावी, अशी विनंती त्यांनी वरिष्ठ नेत्यांना केली. मात्र, देवेंद्रजी राजीनामा देऊ नका, सरकारमध्ये राहून मार्गदर्शन करा, अशी मागणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे.
मुंबईमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मतदार हा मोदींच्या पाठीशी उभा राहणार आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्वच जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय होणार असल्याचा विश्वास राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवार, दि. २० मे रोजी व्यक्त केला.मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मलबार हिल येथील मानव मंदिर हायस्कुलमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोढा म्हमाले, देशाच्या विकासात मुंबईचा वाटा अतिशय महत्वाचा आहे, हे येथील मतदार जाणतो. त्यामुळे प्रखर उन्हात स
मालवणीमध्ये आल्यावर स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं, अशा भावना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केल्या आहेत. मालाडमधील वॉर्ड ७ मध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तिथल्या बूथच्या तयारीची पाहणी, नागरिकांच्या सहाय्यासाठी आवश्यक सोयींची पूर्तता आणि नागरिकांशी संपर्क अभियान यासाठी त्यांनी शनिवारी मालाड दौरा केला. यावेळी त्यांनी बूथचे प्रमुख, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, यांच्यासह बैठक घेतली. तसेच मालवणी भागात घरोघरी जाऊन तेथील हिंदू भगिनी, स्थानिक नागरिक, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्
वादळी पाऊस आणि वाऱ्यामुळे घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांची पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजावाडी हॉस्पिटल येथे जाऊन भेट दिली. तसेच अडीज लाखापर्यंत आर्थिक साहय्य जखमींना केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
"असे म्हणतात की, प्रभू श्रीरामांनादेखील रावणाचा वध करावा की, नाही असा संभ्रम होता. कारण रावण ज्ञानी आहे, धार्मिक आहे असे अनेकांनी त्यांना सांगितले होते. विवेक बुद्धीने प्रभू श्रीरामांनी योग्य तो निर्णय घेत आपल्या धनुष्यबाणाने रावणाचा वध केला, म्हणून आज रामराज्य आले. आजच्या युगात तुमच्यासमोर देखील धनुष्यबाणाच्या सहाय्याने दक्षिण मुंबईमध्ये रामराज्य आणायची संधी आहे. त्यामुळे विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन यामिनीताईंना विजयी करूया," असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मागील दोन दिवस येथील नागरिकांशी भेटून संवाद साधत आहेत. जनतेच्या सेवेसाठी काय करायला हवे याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे आणि त्यांच्या काही समस्या असल्यास त्यासाठी उपाययोजना करणे हा उद्देश मंत्री लोढा आपल्या भेटीतून साध्य करत आहेत. तसेच ते या लोकसभा क्षेत्रातील सर्व स्तरातील नागरिकांना महायुतीच्या उमेदवारास मतदान करण्यास प्रोत्साहित करत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हाजीअली चौक वाहतूक बेटावर मुंबईचा डबेवाला कामगार यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. मात्र पालिका वाहतूक बेट सुशोभीकरण करत असतानाच त्याभागातील डबेवाला कामगार पुतळा हटविणार असल्याचा संशय डबेवाला संघटनेने व्यक्त केला होता.
मुंबईत श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती असलेली घटना घडली आहे. मानखुर्द परिसरात एका सुटकेसमध्ये हिंदू तरुणीची डेडबॉडी सापडली असून एका टॅक्सी ड्रायव्हरने तिची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशिंचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही, असा इशारा मंत्री मंगल प्रभात लोढांनी दिला आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात लव्ह जिहादची घटना घडली आहे. याठिकाणी एका सुटकेसमध्ये हिंदू तरुणीचा मृतदेह सापडला आहे.
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी रामनवमीनिमित्त मुंबईतील विविध मंडळांना भेटी दिल्या आणि विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवला. वरळीमधील जिजामाता नगर, वरळी पोलीस ग्राउंड, वरळी पोलीस कंपाउंड येथील विविध मंडळे, परेलमधील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, परळ पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ, भोईवाडामधील श्रीराम स्पोर्ट्स मंडळ, काळाचौकी येथील अजंठा क्रीडा मंडळ, डोंगरीमधील श्रीराम मित्र मंडळ यासह इतर अनेक मंडळांना मंत्री लोढा यांनी भेट दिली.
आपल्या निर्भीड पत्रकारितेने समाजाच्या विकासात योगदान देणारे इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहाचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या जयंतीचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गिरगाव येथील किलाचंद उद्यान येथे उभारलेल्या स्फूर्तीस्थळास भेट देऊन स्वर्गीय गोयंका यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
वेगवेगळ्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉय विरोधात ताडदेव परिसरात असलेल्या तुलसी मार्गावर आर्य नगर, जनता नगर येथील स्थानिक नागरिकांनी आंदोलन पुकारले होते. कॅबिनेट मंत्री आणि येथील स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा यांनी सदर ठिकाणी ३१ मार्च रोजी भेट देत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती आणि १५ टक्के शौचालयांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यावर आधारित माहिती पुस्तिका तथा अहवालाचे प्रकाशन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात २९८७ पैकी १५०४ शौचाल
स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना अभिवादन म्हणून संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमीट योगदानावर आधारित भित्तिशिल्प मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर केम्प्स उड्डाणपुलालगत साकारले आहे. या भित्तिशिल्पाचे अनावरण दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, तसेच मंगेशकर कुटुंबिय व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
रोजगार हा तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी महत्त्वाचा विषय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बुधवारी ठाणे येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. तसेच आज जवळपास ३० हजारापेक्षा जास्त तरुण याठिकाणी येऊन गेले आहेत आणि ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यामधून निवड झाली असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. Namo Maharojgar Melawa
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तरूणांना परदेशातील रोजगारासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कौशल्य विकास प्रबोधिनीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने विद्याविहार येथे प्रथमच सुरु झालेल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढादेखील उपस्थित होते.
मंगल प्रभात म्हणजे एक चांगली सुरुवात! या राज्यामध्ये तरुणांना रोजगार देण्यासाठी सुरुवात केली त्याबद्दल मी मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन करतो. रोजगार हा तरुणांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचा विषय आहे. आज जवळपास ३० हजारापेक्षा जास्त तरुण या ठिकाणी येऊन गेले आहेत आणि ५ ते ६ हजार उमेदवारांची त्यामधून निवड झाली आहे आणि उर्वरित तरुणांना देखील रोजगार मिळेपर्यंत मंगलप्रभातजी, आपण थांबणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ठाणे येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी
सोमवारी पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या हस्ते मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे उद्धाटन पार पडेल. दरवर्षी राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तर्फे ग्रंथ महोत्सव साजरा केला जातो. यावर्षीदेखील ४ आणि ५ मार्च रोजी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
धर्मांतरण केल्यानंतरही वनवासींच्या सवलतींचा दुहेरी लाभ घेणारे २५७ विद्यार्थी रडारवर आले आहेत. या प्रकारांना चाप लावण्यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हिवाळी अधिवेशनात गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून, शुक्रवारी तो विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करण्यात आला.
अहमदनगर येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत या मेळाव्याचे उद्धाटन पार पडले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाने महासंस्कृती महोत्सव -२०२४ अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हा आयेजित बुद्ध महोत्सवाचे आयोजन केले होते. चेंबूर येथे सर्वोदय बुद्धविहाराच्या प्रांगणात दि. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी बुद्ध महोत्सव साजरा झाला. बुद्ध महोत्सवाची संकल्पना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे होते. महोत्सवाचे प्रमुख अतिथी सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले होते. महोत्सवाचे उद्घाटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. या महोत्सवाचे अंतरंग इथे मांडण्याचा प्रयत्न केला
प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारद्वारे राज्यात विविध ठिकाणी 'महासंस्कृती महोत्सव २०२४' अंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्या अनुषंगानेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने २४ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत सर्वोदय महाबुद्ध विहार, टिळक नगर, चेंबूर येथे बौद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. भदंत राहुल बोधी होते. आपल्या भूमीला लाभलेला भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा वारसा दाखवणारा कार्यक्रम मुं