एवढा मोठा भूकंप कसा झाला? याचा परिणाम काय होऊ शकतो ? भूकंपानंतर त्सुनामी कशी आणि का येते?
Read More
भारत आणि अमेरिकेतील व्यापार तणाव पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादला असून, भारत आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणूनही हिणवले. भारत वेगाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना, ट्रम्प यांच्याकडून सातत्याने होणारी ही टीका म्हणजे भारत सरकारला अमेरिकन शर्थींवर झुकवण्याचाच प्रयत्न. पण, मोदींंच्या नेतृत्वातील नवभारत हा झुकणारा नव्हे, तर झगडणारा भारत आहे, हे ट्रम्प यांनी लक्षात घ्यावे!
महायुद्धाच्या काळापासून ते आजतागायत ‘युद्ध पत्रकारिता’ ही सर्वस्वी आव्हानात्मकच. युद्धाचे स्वरुप बदलले तसे युद्ध पत्रकारितेनेही कूस बदलली. पण, इतिहासात काही युद्ध पत्रकार हे त्यांच्या वार्तांपत्रांमुळे अजरामर झाले. त्यापैकीच एक म्हणजे अमेरिकेचा अर्नी पाईल. उद्या दि. ३ ऑगस्ट रोजी अर्नी पाईलच्या जन्माला १२५ वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने...
ट्रम्प यांच्या निर्णयाचे अध्ययन सुरू असल्याचा पुनरुच्चार विशेष प्रतिनिधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर परस्पर कर लावण्याची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत स्पष्ट केले की, या संपूर्ण घडामोडींचा अभ्यास सुरू असून, राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी सर्व आवश्यक उपाय केले जातील.
खासदार शशी थरूर यांनी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या २५ टक्के अतिरिक्त कर पूर्णपणे चुकीच्या असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे दरम्यान, संसद भवनाबाहेर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने हा कर अश्यावेळी लावला आहे जेव्हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये कारवाई व्यापारसंबधातील चर्चा अजूनही सुरू आहे, अमेरिकेने अचानक लादेलेल्या २५ टक्के कराने दोन्ही देशांमधील व्यापार संवादातील वातावरण बिघडू शकते.
आंतरराष्ट्रीय राजकारणातील मैत्रीला अनेक कंगोरे असतात. ती कधीही स्थायी नसते आणि टिकाऊ तर त्याहूनही नसते. जसे वारे वाहतील, तशी ही मैत्री. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये अमेरिका जो रस दाखवत आहे, त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यातले प्रमुख कारण आहे की, पाकिस्तानमधल्या चीनच्या अस्तित्वाला धक्का द्यायचा. दुसरीकडे भारताला रशियाशी मैत्री करण्यापासून विचलित करायचे. पण, अमेरिका हेसुद्धा जाणून आहे की, आजचा भारत हा स्वयंसिद्ध भारत आहे. जो भारत कुणाला दबत नाही आणि कुणाला दाबतही नाही.
"म्हातारी माणसं युद्ध घोषित करतात. पण, ती युद्ध तरुणांना लढावी लागतात आणि त्यांनाच या युद्धात मृत्यू कवटाळतो,” हे अमेरिकेचे ३१वे राष्ट्राध्यक्ष हर्बट हूवर यांचे युद्धासंबंधीचे विचार आजही कालातीत म्हणावे लागतील. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षही याला अपवाद नाही. म्हणूनच या जागतिक समस्येवर मार्ग काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे इस्रायल-पॅलेस्टाईन द्विराष्ट्र समाधानाच्या मुद्द्यावर दोनदिवसीय जागतिक परिषदेचे न्यूयॉर्क येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी फ्रान्ससह सौदी अरेबियानेही स्वतंत्र पॅलेस्टाईनच्
अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्लाफ या कंपनीने आधुनिक चीपच्या निर्मितीसाठी दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीबरोबर करार केला आहे. यामुळे आता चीपनिर्मिती क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी दोन दिग्गज कंपन्या एकत्र आल्या आहेत.
युरोपीय महासंघ आणि अमेरिकेदरम्यान व्यापारी करार झाला असून, त्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. रविवार दि.२७ जुलै रोजी युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला लेयेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची घोषणा केली. या करारान्वये युरोपीय महासंघाचे सदस्य असणारे देश अमेरिकेकडून ७५० अब्ज डॉलर्सच्या मालाची खरेदी करणार आहेत.
एकेकाळी ज्याच्या डॉलर्सवर अखिल जगाचा विश्वास होता, त्या अमेरिकेने आज त्यांच्या आर्थिक अधःपतनाची कबुली स्वतःच दिली आहे. राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी ‘व्हेनोम’ आणि ‘पेपल’ यांसारख्या मोबाईल पेमेंट सुविधांमार्फत लोकवर्गणी स्वीकारण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. ३६.७ ट्रिलियन डॉलर्सच्या राष्ट्रीय कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने ‘लोकवर्गणीतून कर्जफेड’ या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेमध्ये अमेरिकेच्या सामान्य नागरिकांकडून राष्ट्रीय कर्ज निवारण्यासाठी चक्क निधी मागितला जात आहे. ही मोहीम
रुग्णांचा केवळ दृष्टिदोषच दूर न करता, अनेकांना ‘विवेक दृष्टी’ देऊन मनुष्यनिर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे कार्य करणार्या डॉ. सुरेश शास्त्री यांच्याविषयी...
परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाला, भारतीय जनमानसामध्ये एक वेगळेच महत्त्व मिळते. त्यामुळे, अनेक विद्यार्थी करिअरसाठी परदेशाची वाट धरतात, यामध्ये अमेरिकेचा मान सर्वात मोठा. तिकडे जाण्यासाठी इच्छूकांची गर्दी असते. आजवर अमेरिकाही या विद्यार्थ्यांसाठी रेड कार्पेट घालत होती. मात्र, आता अमेरिकेने त्यांच्या व्हिसा धोरणात बदल करण्यास सुरुवात केल्याने, अमेरिकेत जाणे थोडे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे भारतात जागतिक दर्जाचे शिक्षण आणि कामाची उपलब्धता सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे बदलते व्हिसा धोरण आणि भार
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
नारायण ठोसर अर्थात समर्थ रामदास लहानपणी लपंडाव खेळताना चक्क एका कपाटात जाऊन लपले. मित्रांनी, आईने त्यांना भरपूर शोधले, पण नारायणाचा ठावठिकाणा लागला नाही. शेवटी घरच्याच कपाटात नारायण सापडला आणि आईचा जीव भांड्यात पडला. तेव्हा तंद्री लागलेल्या नारायणाला "इतका वेळ कपाटात तू काय करीत होतास,” असे विचारले असता, नारायणने विलक्षण उत्तर दिले. तो म्हणाला, "चिंता करितो विश्वाची.” तेव्हापासून समाजाला समर्पित, लोककार्य करणार्यांसाठी ‘चिंता करितो विश्वाची’ असे अत्यंत आदराने म्हटले जाते. पण, सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
चीनमधून मेक्सिको, कॅनडामार्गे अमेरिकेत तस्करी होणारा एक घातक अमली पदार्थ म्हणजे ‘फेंटानिल’. या ‘फेंटानिल’च्या नशेत अमेरिकेची तरुण पिढी गुरफटली असून, या ड्रग्जसेवनाने हजारोंनी मृत्यूही ओढवले आहेत. नुकतेच ट्रम्प यांनी चीन अशाप्रकारे ‘फेंटानिल’च्या तस्करांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करेल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ट्रम्म यांच्या आगामी चीन दौर्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ‘फेंटानिल’ तस्करी रोखण्यासंबंधी दोन्ही देशांमध्ये एकमत होते का, ते बघणे महत्त्वाचे...
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाची संघटना द रेसिस्टन्स फ्रंटला (टीआरएफ) अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) व विशेष नामांकित जागतिक दहशतवादी (एसडीजीटी) म्हणून घोषित केले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या या निर्णयाचे स्वागत करत तो भारत-अमेरिका दहशतवादविरोधी सहकार्याचा ठोस पुरावा असल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून जगभरात व्यापारयुद्धाचे वारे वाहू लागले. आयातकर लादण्याच्या अमेरिकेच्या लहान-मोठ्या राष्ट्रांना उघड धमक्या, वारंवार फिरवले जाणारे निर्णय, बदलत्या तारखा या ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीशी सामना करायचा तरी कसा, असाच प्रश्न जगाला भेडसावत आहे. याच प्रश्नाची कारणमीमांसा करणारा हा अभ्यासपूर्ण लेख...
भारताला सोमवारी एलसीए मार्क १ए लढाऊ विमान कार्यक्रमासाठी अमेरिकेकडून दुसरे जीई-४०४ इंजिन मिळाले आहे, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या द्विपक्षीय व्यापार करार चर्चांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानुसार गती मिळत असल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.
(FBI Arrested 8 Khalistani Terrorists in US) भारतातून फरार असलेल्या आणि अमेरिकेत लपून बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ११ जुलै २०२५ रोजी कॅलिफोर्नियातील सॅन जोक्विन काऊंटीमध्ये एका छापेमारीदरम्यान एफबीआयने भारतीय वंशांच्या आठ खलिस्तानी दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्टॉकटन, मँटेका आणि स्टॅनिस्लॉस काउंटी आणि एफबीआयच्या स्पेशल युनिटच्या स्वाट पथकांच्या मदतीने एकत्रितपणे ही कारवाई केली.
भारत आणि अमेरिकेमधील महत्त्वपूर्ण द्विपक्षीय व्यापार करारासाठी चर्चा पुढे नेण्यासाठी भारताच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसी येथे दाखल झाले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या देशाबाहेर आणि देशांतर्गत आव्हानांना तोंड देत आहेत. अमेरिकेमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ट्रम्प सरकारविरोधात हिंसक आंदोलन जोरावर आहे. हे आंदोलन पसरण्याची भीतीमुळे, अमेरिका यादवीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील परिस्थितीचा घेतलेला आढावा...
पिस्को’ या अल्कोहोलिक पेयाच्या भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय (Geographical Indication - GI) टॅगच्या नोंदणीसंदर्भातील वादात दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने ‘जीआय कायदा, १९९९’ आणि ‘ट्रेडमार्क कायदा,१९९९’ मधील मुलभूत फरक स्पष्ट केला आहे. पेरू आणि चिली या दोन दक्षिण अमेरिकन देशांमधील संघटनांदरम्यान सुरू असलेल्या जीआय हक्कांवरील संघर्षावर सुनावणी करताना, जीआय आणि ट्रेडमार्क कायद्याचे स्वरूप आणि हेतू पूर्णत: भिन्न असल्याचे उच्च न्यायालयाने
सार्या जगाला अनाहूत सल्ले आणि सूचना देणार्या अमेरिकेच्या तंत्रज्ञानातील दोषांची चर्चा आजवर जाहीरपणे केली जात नव्हती. यामागे अमेरिकेचा राजकीय दबदबा आणि व्यावसायिक लाभाचे समीकरण होते. पण, आधी ‘लॉकहीड मार्टिन’च्या ‘एफ-३५ बी’ या लढाऊ विमानाने आणि नंतर ‘बोईंग’च्या ‘बी ७८७ ड्रीमलायनर’ या दोन विमानांनी अमेरिकी तंत्रज्ञानातील दोष आणि उणिवा उघड केल्या आहेत. अमेरिकेच्या तांत्रिक प्रभुत्वाला छेद देणार्या या घटना आहेत.
वॉशिंग्टन : (Donald Trump Announced Tariffs) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी ८ जुलैला १४ देशांवरील नव्या आयात शुल्कासंदर्भात (टॅरिफ) घोषणा केली. दक्षिण कोरिया आणि जपानवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थात आयात शुल्क लागू केल्यानंतर या यादीत आणखी १२ देशांची भर ट्रम्प यांनी घातली आहे. त्यामुळे आता एकूण १४ देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने रेसिप्रोकल टॅरिफ लागू केले आहे. अमेरिकेच्या सरकारकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी भारतासोबतच्या व्यापार करारावर स्वाक्षरी करणे आता अंतिम टप्प्यात आले आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. दरम्यान, अमेरिकेने १४ देशांवर नवीन शुल्क जाहिर केले आहे.
अमेरिकेतील राजकारण प्रदीर्घ काळ डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन्स या दोन पक्षांभोवती केंद्रित राहिले. मात्र, सध्या एलॉन मस्कसारख्या दिग्गज उद्योगपतीने नवीन पक्षस्थापनेची शक्यता निर्माण करून अमेरिकेत खळबळ माजवलेली दिसते. त्यानिमित्ताने अमेरिकेतील द्विपक्षीय राजकीय रचनेची मर्यादा, तिसर्या पक्षांची दुर्दशा आणि नव्या शक्तीच्या उदयाची शक्यता यांचे हे आकलन...
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ आणि भारतीय अंतराळ संस्था ‘इस्रो’च्या सहकार्यातून नुकतेच ‘अॅक्सिओम मिशन 4’ साठी यशस्वी उड्डाण झाले. या मोहिमेत शुंभाशू शुक्ला हे भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अमेरिकन अंतराळवीरांसोबत संशोधन करणार आहेत. तेव्हा, यानिमित्ताने भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याच्या या नवीन अध्यायाविषयी...
इराण-इस्रायलमध्ये काल युद्धविरामाची घोषणा झाली असली, तरी मध्य-पूर्वेतील या संघर्षाने जागतिक चिंतेत भर घातली. यानिमित्ताने मुस्लीमजगतातील दोन ध्रुवही प्रकर्षाने समोर आले. एकीकडे मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वात सौदी अरेबियाने कालौघात काही सकारात्मक बदल अंगीकारले, तसे अयातुल्ला खोमेनींच्या कट्टरतावादी इराणला शक्य झाले नाही. या दृष्टिकोनातून इराण-इस्रायल संघर्षाचे मूळ आणि सौदी अरेबिया आणि इराण या इस्लामी जगातील दोन चेहर्यांच्या भिन्न भूमिकांचा ऊहापोह करणारा हा लेख...
रिकेने इराणच्या प्रमुख अणुस्थळांवर हल्ला केल्यानंतर इराणचे प्रत्युत्तर काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेने ३०,००० पौंड वजनाच्या बंकर-बस्टर बॉम्बर्सच्या साहाय्याने इराणच्या फोर्डो अणुस्थळावर हल्ला केला. यानंतर इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांना उद्धवस्त करण्याची धमकी दिली आहे. "आम्हाला स्वतःचे रक्षण करण्याचे अधिकार आहेत", असे इराणने अमेरिकेला ठणकावून सांगितले आहे.
इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेसी नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या बात
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकल्यानंर फिल्डमार्शल झालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर भारतामध्ये साहजिकत अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, यामागे भारताच्या सामरिक वरचष्म्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित होते, हे विसरून चालणार नाही.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पुढे गुडघे टेकणारे पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्डमार्शल जनरल असीम मुनीर यांना ‘मास मर्डरर’ असे संबोधून अमेरिकेतील पाक नागरिकांनी त्यांचे अमेरिकेत स्वागत केले आहे.
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली.
(Elon Musk hints at new political party amid feud with Donald Trump) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनामधून अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क बाहेर पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील एकेकाळचे घनिष्ठ मैत्रीचे संबंध आता उघड शत्रुत्वात बदलल्याचे दिसत आहे. दोघांमधील मतभेदांमुळे त्यांच्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याशी सुरु असलेल्या वादानंतर आता इलॉन मस्क यांनी थेट राजकीय मैदानात उतरण्याचे स
‘आर्थिक महासत्ता’ असे बिरूद मिरवणार्या अमेरिकी नागरिकांपाशी आपत्कालीन खर्चासाठी दोन हजार डॉलर्सही नाहीत, हे वास्तव एका अहवालातून समोर आले. अमेरिकी वर्तमानातून भारतीयांनी भविष्यासाठीचा धडा घेण्याची गरज, यातूनच अधोरेखित झाली आहे.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या सोमवार दि.2 जून रोजी अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहे दि.2 जून ते 11 जून पर्यंत 9 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर ना.रामदास आठवले सोमवारी पहाटे 2 वाजता रवाना होणार आहेत.
जगभरातील विद्यापीठं ही खरं तर ज्ञानार्जनाचा अथांग पसरलेला महासागरच. केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशादिग्दर्शनाचे महत्कार्य या विद्यापीठांच्या माध्यमातून अगदी प्राचीन काळापासून अविरतपणे सुरू आहे. पण, सध्या विशेषकरून अमेरिकेतील विद्यापीठे हे विद्यार्जनापेक्षा विरोध प्रदर्शनाची केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाल्याचे दिसून आले. या विद्यापीठांत वारंवार इस्रायलविरोधी आणि पॅलेस्टाईन-‘हमास’च्या समर्थनार्थ होणारी नारेबाजी, आंदोलने यामुळे परिस्थिती चिघळली. परिणामी, ट्रम्प सरकारनेही गेल्या वर्षी
रशिया-युक्रेन युद्धाला जवळपास एक हजार दिवस उलटून गेले आहेत. आजही दोन्ही बाजू संघर्षरत असल्याचे चित्र आहे. अर्थात हे चित्र बदलण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही प्रयत्न झाले. मात्र, त्यातील प्रामाणिक हेतूंवर शंका कायम राहिली. याच संघर्षमय स्थितीमध्ये दि. 25 मे रोजी रशियाने युक्रेनवर सर्वांत मोठा हवाई हल्ला केला. तब्बल 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करत केलेल्या या आक्रमणात युक्रेनचे मोठे नुकसान झाले. यानंतर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर तीव्र शब्दांत टीका करण्याची परंपरा कायम ठेवली. अमेरिकेने
( good response in America to Wada Chirebandi marathi play ) प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांनी एकमुखाने गौरवलेल्या ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला अमेरिकेतील महाराष्ट्रीयन प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सध्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाचा अमेरिका दौरा सुरू असून या अभिजात कलाकृतीच्या समारोपाचे प्रयोग मे महिन्यात अमेरिकेत होतायेत.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये साहजिकच भारतीयांचाही सहभाग होताच. पण, तरीही भारतीय समुदाय हा अमेरिकेतील आशियाई स्थलांतरितांमधील दुसरा सर्वांत मोठा समुदाय. विशेष म्हणजे, ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अमेरिकेतील भारतीय समुदााची विविध वैशिष्ट्ये, पैलू समोर आले आहेत. त्यावरुन अमेरिकेतील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावसायिक परिघातही भारतीय समुदायाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित व्हा
three countery elections is the influence of Trump on American politics मागील काही दिवसांत अमेरिकेचे तीन मित्रदेश असलेल्या कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. ऑस्ट्रेलिया सोडल्यास कॅनडा आणि जर्मनीमध्ये नवीन चेहर्यांच्या हाती देशाची धुरा नागरिकांनी सोपवली. पण, या तिन्ही निवडणुकांमधील आणखीन एक साम्य म्हणजे ट्रम्प यांच्या अमेरिकन राजकारणाचा प्रभाव.
Elon Musk And Narendra Modi यांनी एका वर्षात भारतात येण्याचा दावा केला आहे. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी नरेंद्र मोदींना भेटणं म्हणजे माझे भाग्यच असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. त्यांनी आपण याआधी नरेंद्र मोदींसोबत टेलीफोनद्वारे संपर्क केला असल्याच्या आठवणीला उजाळा दिला असल्याचे सांगितले आहे.
tariff tax ट्रम्प यांनी जगातील 75 देशांवर वाढीव आयातशुल्क लावून खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेच्या या निर्णयाने जगभरातील अनेक भांडवली बाजार ते उद्योजकांना मोठेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. ट्रम्प यांच्या या लहरी निर्णयाला अमेरिकेतदेखील मोठा विरोधच सहन करावा लागला. त्यातूनच ट्रम्प यांनी चीन वगळता अन्य देशांवर लादलेल्या आयात शुल्कास 90 दिवसांची स्थगिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगावर आणि भारतावर झालेल्या आणि होऊ घातलेल्या परिणामांचा हा आढावा...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी आयात शुल्काच्या किंमतीवर ९० दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा हा भारताला झाला असून यासोबत इतर ७५ देशांना याचा फायदा होणार आहे. नुकतेच चीनला यापासून सूट दिली गेली आहे. चीनवर अमेरिकेने टौरीफद्वारे १०४ % हून अधिक म्हणजेच १२५ % करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका-चीनदरम्यान व्यापार युद्धाचा धोका बळावला गेल्याची भिती आहे.
( Whats strategy behind Americas trade war ) आयातकर वाढीवरुन अमेरिकेने छेडलेले हे व्यापारयुद्ध आणखीन भडकण्याची शक्यता असून, त्याचे पडसादही जागतिक स्तरावर उमटू लागले आहेत. ट्रम्प यांच्या दाव्यानुसार, ही करवाढ अमेरिकेसाठी सर्वांगीण फायद्याची असेल, तर अमेरिकन बाजारपेठेने या निर्णयाचे मुक्तकंठाने स्वागत का केले नाही? त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारयुद्धामागची नेमकी रणनीती तरी काय? त्याचे आणखीन काय भीषण परिणाम होतील? यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह करणारा हा लेख...
( American citizens against Trump-Musk ) गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यामुळे बेकायदेशीर स्थलांतरितांचा मुद्दा, नवीन टॅरिफ धोरण (आयात शुल्क) किंवा अमेरिकेतील कर्मचारी कपातीचा निर्णय यांचा समावेश आहे.
Fee hike अमेरिकेने वाढीव आयात शुल्क लादून जगभरात व्यापारयुद्धाला चालना दिली असली, तरी भारताला नव्या संधीची दारे खुली केली आहेत. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताने यापूर्वीच स्वतःची वैश्विक ओळख प्रस्थापित केली. आता अमेरिकेने चीनवरच सर्वाधिक शुल्क लादत, एकप्रकारे भारतीय कंपन्यांसाठी उपलब्ध करुन दिलेली सुवर्णसंधी लाभदायक अशीच...
America first जगभरातील बाजारपेठा आणि अर्थव्यवस्था आजमितीला एका नव्या तणावाच्या सावटाखाली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिकेत येणार्या सर्व आयातींवर आयात शुल्क लावण्याच्या घोषणेची अंमलबजावणी दि. 2 एप्रिलपासून सुरू केली आहे. त्यानुसार चीन, युरोपियन युनियन, जपान, भारत आणि इतर अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर हे शुल्क आकारले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे अपेक्षेप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसून आले. अनेक देशांच्या भांडवली बाजारातही ट्रम्प यांच्या निर्णयांचे पडसाद उम
India अमेरिकेच्या टेरिफमुळे जगामध्ये व्यापारयुद्धाचे सावट जमा झाले आहे. त्यातच कॅनडाच्या नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याची मनिषा व्यक्त केली आहे. अमेरिकेबरोबरच्या व्यापारी युद्धकाळात जगाच्या पुरवठा साखळीमध्ये, मोलाची भूमिका बजावण्याची नामी संधी भारताकडे आहे. याच पार्श्वभूमीवर एकूण परिस्थितीचा घेतलेला आढावा....