(National Shooter Sharayu More Accidental Death Baramati) राष्ट्रीय नेमबाज शरयू मोरे हिचे वयाच्या २२व्या वर्षी बारामती येथे अपघाती निधन झाले. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांची ती कन्या होती. सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या तिच्या मूळ गावी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
Read More
प्रख्यात लेखिका नीला बर्वे यांचा ' कोवळं ऊन' हा कथासंग्रह नुकतंच प्रकाशित झाला. ज्ञानवृद्ध एन. एन. श्रीखंडे यांच्याहस्ते हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला तर या समारंभाचे अध्यक्षपद राजीव श्रीखंडे यांनी भूषवले. सदर कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार डॉ. सुकृत खांडेकर, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, "कुटुंब रंगलय काव्यात" फेम प्रा. विसुभाऊ बापट, कवयित्री सोनाली जगताप, लेखिका अलका भुजबळ, संपादक देवेंद्र भुजबळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
बारामतीतील एका सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे होत, पुढे समाजसेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या अॅड. अक्षय गायकडवाड यांच्याविषयी...
यशदा, पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची महाराष्ट्र शासनाने नुकतीच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर नियुक्ती केली. त्यांच्याकडे संस्थेतील विस्तार व सेवा या पदाच्या विभाग प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर आणि हर घर तिरंगा अभियानांतर्गन देशभरात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा आयोजित केल्या जातायत. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे नुकतीच एक भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये १२ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. जम्मू-काश्मीर एलजी कार्यालयाने तिरंगा यात्रेचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. साधारण २ किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेऊन सर्वजण एकत्रितपणे या यात्रेत चालत होते.
उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्स बार आणि वाळू चोरी प्रकरणी गंभीर आरोप केले होते. याच अनुषंगाने मंगळवार, २९ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
(Baramati News) पुणे जिल्ह्यातील बारामती येथे गुरुवारी १७ जुलैच्या रात्री उशिरा एका बँक मॅनेजरने बँकेच्या शाखेतच गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशंकर मित्रा असे या बँक मॅनेजरचे नाव आहे. मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमध्ये मित्रा यांनी म्हटले आहे.
ऑल इंडिया बार परीक्षा (AIBE/एआयबीई) देणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांसाठी शुल्क सवलत योजना राबवण्याबाबत विचार करण्यास बार कौन्सिल ऑफ इंडियाला (बीसीआय) सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे. या परीक्षेसाठी सध्या ३५०० रुपये शुल्क आकारले जाण्याचा प्रस्ताव आहे, जे की अनेक गरिब विद्यार्थ्यासाठी परवडणारे नाही. ही बाब एका याचिकेद्वारे न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि ए. एस. चांदुकर यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने अनुसूचित जातीतील युवक आणि युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाची पाहणी केली. हा प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्वितीय चमत्कार असून, यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे.
नक्षलवादी संघटना यूएलएफए(आय) (United Liberation Front of Assam-Independent) च्या म्यानमारमधील काही शिबीरांवर भारतीय सैन्याने ड्रोन हल्ला केला असल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. या हल्ल्यात संघटनेचा एक वरिष्ठ नेता ठार झाल्याचा आणि १९ जण जखमी झाल्याचा दावा यूएलएफएने केला आहे.
राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जातप्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनातर्फे विविध ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांकरता भरती प्रक्रिया सुरू असून या संबधितची अधिकृत माहिती बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २०२५ आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी जेईई १०० व नीट १०० जागांकरिता प्रशिक्षण राबवण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थी इयत्ता अकरावी(विज्ञान) शाखेत प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्याजवळ महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा व अधिवास दाखला असावा. कुटू
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात मदरशातील विद्यार्थ्यांवर अत्याचार करणाऱ्या हाफिज नबी हसनला अटक करण्यात आली आहे. हाफिज हा 'हैदरी दल २५' चा संस्थापक आहे. तो बराच काळ मदरशाच्या विद्यार्थ्याचे शोषण करत होता. पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधून ३०-४० अश्लील व्हिडिओ आणि फोटो जप्त केले आहेत.
रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या प्रकल्पअंतर्गत संपूर्ण मुंबई महानगरातील विविध रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण नियोजित कालावधीत पूर्ण होत आहे. पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. सोमवार दि. २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून गुरुवार, दि. ५ जूनपर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक हटविले जातील व रस्ते वाहतुकीस खुले होतील, याचे पालन करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.
नवी मुंबईतील वाशी परिसरातील ‘द रेस’ नावाच्या अनधिकृत डान्स बारवर काल रात्री पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.
"भारतीय तरुणांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची 'बीए' आणि 'बॅरिस्टर' ही पदवी ब्रिटिशांनी काढून घेतली. त्यापैकी 'बीए'ची पदवी मुंबई विद्यापीठाने परत केली. मात्र, वीर सावरकरांचा सन्मान असलेली 'बॅरिस्टर' ही पदवी अद्याप परत मिळालेली नाही. ती परत मिळवून सावरकरांना मरणोत्तर 'बॅरिस्टर' हा मान मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू", अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २७ एप्रिल रोजी दिली.
राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बारामती तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त परिसराची पाहणी करत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
पावसाळा जवळ येत असताना मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)ने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील चालू पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक मान्सूनपूर्व तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार केली आहे.
(Joe Biden diagnosed with Prostate Cancer) अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. बायडन यांना प्रोटेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे. हा कॅन्सर त्यांच्या हाडांमध्ये पसरलेला असल्याचं त्यांच्या कार्यालयाने रविवारी १८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात सांगितले.
“२०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी मध्यस्थी एक प्रमुख साधन असेल आणि मध्यस्थी केवळ न्यायदानाला गती देत नाही तर न्यायालयांवरील भार सुध्दा कमी करते., असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. शनिवार, दि. ३ मे रोजी दिल्लीतील राष्ट्रपती भारतीय मध्यस्थता संघटनेच्या शुभारंभ आणि ‘पहिली राष्ट्रीय मध्यस्थता परिषद २०२५’च्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
स्त्री-पुरुष समानतेचे खरे प्रणेते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे संविधानिक चौकटीत शक्य झाले आहे. बाबासाहेबांचे योगदान एका विशिष्ट समाजासाठी नव्हे, तर सर्वसमावेशक दृष्टिकोनातून झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याच्या सामाजिक न्याय, नगरविकास व परिवहनमंत्री ना. माधुरी मिसाळ यांनी केले
( Students of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) achieve impressive success in the UPSC examination ) डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले
Jammu and Kashmir मधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर २ दहशतवादी ढेर, पाकिस्तानातून भारतात करत होते अवैध घुसखोरी
(Maharashtra State Film Awards)महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून सिनेक्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान केला जातो. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी या महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे.
Dr. Kalashri Barve साधारणत: कलाकार हाच कलेची निवड करत असतो, पण कलेनेच ज्यांची निवड केली आहे, अशा डॉ.कलाश्री बर्वे यांच्याविषयी...
मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणे गरजेचे असून बारामती येथे अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे आवाहन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवार, ११ एप्रिल रोजी केले.
Hindu उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राजेश आणि कुलसुम या मुस्लिम युवतीने हिंदू परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुलसुमने आपल्या हिंदू प्रियकर राजेशसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर कुलसुमने विवाह करत तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. कुलसुमने धर्मपरिवर्तन करत ममता झाली आहे. तिने आपल्या कुटुंबाला धोका असल्याची माहिती दिली आहे. कुलसुम म्हणाली होती की. तिच्या वडिलांनी तिला अनेकदा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
Supreme Court दिल्लीतील तीन मंदिरांबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. या तीन मंदिरातील दिल्ली विकास प्राधिकरणाने हतोडा चालवण्याची नोटीस जारी केली आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, संबंधित तीन मंदिरांच्या व्यवस्थाप समित्यांनी दिल्ली सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी. काली बारी मंदिर, अमरनाथ संस्था, श्री बद्रीनाथ संस्था या मंदिर संस्थांवर हतोडा चालवण्याबाबतची नोटीस जारी करण्यात आली.
(Mumbai GBS Outbreak) राज्यात 'गुईलेन बॅरे सिंड्रोम' म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईतही जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. अशातच आता मुंबईमधील एका जीबीएसग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारताला वस्त्रोउद्योगाचा समृध्द इतिहास लाभला आहे. आपला हा संस्कृतिक ठेवा हीच आपली ओळख आहे, म्हणून आजच्या तारखेला भारतीय फॅशन ग्लोबल व्हायला हवी असे प्रतिपादन विख्यात फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे यांनी केले. मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी आणि बँक ऑफ बडोदा यांच्यात करार
औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये ( Pharmaceutical Industry ) निष्ठेने आणि कष्टाने स्वत:चे आणि त्यायोगे देशाचेही नाव उत्तुंग करणार्या, रणजित बार्शिकर यांच्या जीवनकर्तृत्वाचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
मागील दोन दशकांहून अधिक काळ धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून 25 किमी अंतरावर वसलेल्या बारीपाड्याचा चेहरामोहरा बदलणार्या ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या चैत्राम पवार यांना कालच भारत सरकारचा मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि लोकसहभागातून शाश्वत विकास साधत, बारीपाड्याची एक आदर्श आणि स्वावलंबी गाव म्हणून ओळख त्यांनी निर्माण केली. काही वर्षांपूर्वीच चैत्राम पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बारीपाड्याची ही यशोगाथा जवळून अनुभवण
सचित पाटील, मुक्ता बर्वे पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘असंभव’ ह्या त्यांच्या आगामी चित्रपटाताचा मुहूर्त नुकताच नैनीताल येथे पार पडला. हा चित्रपट येत्या १ मे २०२५ ला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असून नितीन प्रकाश वैद्य, सचित पाटील यांची मुंबई-पुणे एंटरटेनमेंट आणि शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई यांची एरिकॉन टेलिफिल्मस ह्या दोन्ही निर्मिती संस्था पहिल्यांदाच ‘असंभव’ या आगामी सिनेमाच्या निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत.
Waqf Board उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा भरवण्याची तारीख निश्चित झाली. त्याआधीच एका आठवड्यापूर्वी एका मैलवीने हा कार्यक्रम वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर आयोजित केल्याचा दावा केला. यामुळे आता वादाला तोंड फुटले आहे. अखिल भारतय मुस्लिम जमातीच्या वतीने मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेवली याने दावा केला की, संबधित जमीन ही हिंदू धार्मिक कार्यक्रमासाठी वापरली जात आहे.
बार्सिलोना हे जगभरातील लाखो पर्यटकांना दरवर्षी आपल्याकडे त्याच्या सुनियोजित रचनेमुळे आकर्षित करणारे स्पेनमधील एक सुंदर शहर. या शहराला अत्यंत प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेला. रोमन साम्राज्याच्या पतनानंतर येथे अनेक आक्रमणे झाली. परंतु, त्या सर्वांनी विद्यमान शहराचा पुनर्वापर केला. प्लॅन सेर्डा हे बार्सिलोनाच्या आजच्या नियोजित शहराचे गमक म्हणावे लागेल.शहर नियोजनाच्या प्लॅन सेर्डाचे महत्त्व आणि ऐक्साम्पलेचा इतिहास समजून घेण्यासाठी बार्सिलोनाच्या ऐतिहासिक संदर्भांचा धांडोळा घेणे क्रमप्राप्त ठरावे.
(Kanpur) कानपूरच्या शिवराजपूरमधील बराजपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर रिकामा गॅस सिलडर आढळल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ डिसेंबरच्या रात्री घडली. रेल्वे पोलीस आणि जीआरपीने गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. बुधवारी जीआरपीच्या एसपीने घटनास्थळी तपासणी केली. रेल्वे पोलीसांनी गॅस सिलेंडर ताब्यात घेऊन तपास सुरू केला.
उत्तर प्रदेशातील बरेली येथे कट्टरपंथींच्या ताब्यात असलेले एक घर मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे मंदिर १५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. ५० वर्षांपूर्वी वाजिद अली नावाचा एक कट्टरपंथी याठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्याने संपूर्ण मंदिर ताब्यात घेत त्याला घर बनवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या मंदिरावर इस्लामी ध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आता प्रशासनाने चौकशी करून मंदिर रिकामे करण्यासाठी नोटीस बजावली आहे. मंदिरावर हिरवा झेंडा लावण्यात आला होता तोही झेंडा काढण्यात आला अ
(Ajit Pawar) महाराष्ट्राचा महाकौल कोणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे. २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा महानिकाल आज जाहीर होणार आहे
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना देशाच्या ऑर्डर ऑफ एक्सेलेन्स हा सर्वेच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. इरफान अली यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. या पुस्काराच्या लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की " हा सन्मान केवळ माझा नसून १४० कोटी भारतीयांचा आहे. इतिहास, संस्कृतिक वारसा आणि विश्वासवर आधारित भारत आणि गयाना यांच्यातील नातं असेच समृद्धी होऊन वाढत राहिल अशी आशा मी व्यक्त करतो. गयानाचा पुरस्कार प्राप्त करणारे जगातील चौथे परदेशी नागरिक ठरले आहेत
(Ajit Pawar) बारामतीमध्ये काटेवाडी येथे बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुप्रिया सुळेंच्या कथित ऑडिओ क्लिपबद्दत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "सदर ऑडिओ क्लिपमध्ये ज्या दोन लोकांचे आवाज ऐकू येत आहेत. त्यांना मी ओळखतो. एक आवाज माझ्या बहिणीचा आहे. तर दुसरा आवाज विधानसभेतील माझ्या एका सहकाऱ्याचा आहे. या सहकाऱ्याने आमच्याबरोबर महाविकास आघाडीत काम केले होते. या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल. त्यान
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) यांच्याकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात पैशांचे वाटप सुरु असल्याचा आरोप भाजपने केला आहे. बारामती अॅग्रोच्या अधिकार्यांकडून कर्जत-जामखेडमध्ये हे पैशांचे वाटप सुरु असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या अधिकार्यांकडे दारूसाठी किती पैसे आणि कुणाला द्यायचे किती याचा तपशील आहे. मतदारांची यादी आणि पैशांचे घबाडही सापडले आहे.
’झी नाट्यगौरव २०२४’मध्ये प्रायोगिक विभागातून साहाय्यक अभिनेता होण्याचा मान मिळवणार्या, बारामतीच्या सोमनाथ लिंबारकर यांच्या नाट्यप्रवासाविषयी...
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन नुकताच संपला. बारामतीच्या सूरज चव्हाणने शब्द दिल्याप्रमाणे ट्रॉफी गावाकडे आणलीच. दरम्यान, या घरात त्याने तयार केलेली नाती आजही कायम आहेत. काही दिवसांपूर्वीच दिवाळीच्या निमित्ताने विजेत्या सूरजच्या मोढवे गावी इरिना, वैभव, धनंजय, जान्हवी किल्लेकर असे सगळे सदस्य त्याला भेटायला गेले होते. यादरम्यान अंकिता वालावलकर आपल्या मानलेल्या भावाची भेट घ्यायला केव्हा जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर ती भेट झाली आहे.
बारामती विधानसेभेचे शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी सभा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अशाच एका सभेत आता कुठेतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.
'दै. मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याशी सुसंवाद साधताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली. पण या भूमिकेसाठी मुंबईहून रोहिणी हट्टंगडी तर स्क्रिन टेस्टसाठी गेल्या होत्याच पण त्यांच्याशिवाय अभिनेत्री स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे देखील त्याच भूमिकेसाठी इंग्लंडला पोहोचल्या होत्या. तो किस्सा काय होता हे रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला.
( Sharad Pawar - NCP ) "हा प्रश्न भावनेचा नसून हा तत्वाचा आहे, गांधी, नेहरू आणि यशवंतराव चव्हाण तसेच शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मी काम करणारा आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतोयं त्याचे कारण म्हणजे महाराष्ट्राची सत्ता मला बदलायची आहे. महाराष्ट्राची सत्ता सामान्य माणसासाठी सत्ता हातात घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा, आपल्याला सामाजिक क्षेत्रात आणखी काम करायचे आहे," असे आवाहन त्यांनी केले आहे. आपल्या ५२ मनिटांच्या भाषणात शरद पवार यांन
Sharad Pawar vs Ajit Pawar बारामती विधानसभा मतदारसंघाकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. काका विरूद्ध पुतण्या अशी टफ फाईट होणार असल्याच्या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाला आहे. बारामतीत दि: २८ ऑक्टोबर रोजी अजित पवार आणि शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत दिसणार आहे.