पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती लाभलेल्या ग्रीसमधील रोड्स बेट सध्या वणव्याच्या धगीत होरपळत आहे. मागील सहा दिवस ग्रीसमधील रोड्स बेटावर वणव्याने अक्षरश: थैमान घातले. हवामान बदलाचा प्रभाव आणि त्यामुळे तीव्र झालेल्या उष्णतेच्या लाटांमुळे ही आग लागली. रविवार, दि. २३ जुलै रोजी सुटलेल्या वादळी वार्यामुळे ती अधिकाअधिक पसरतच चालली आहे. सलग आठवडाभर सुरू असलेल्या या वणव्यामुळे पर्यावरणाचे आणि रोड्स बेटावरील जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होत आहे. देशभरात हा जंगलातील आगीचा धोका अजून कायम असून, येणार्या उष्णतेच्या लाटांमुळे ह
Read More
२०२० साली अंतराळातून एक दृश्य चित्रित करण्यात आले. त्या दृश्यात सुदूर पसरलेल्या सोन्याच्या खाणी दिसल्या. तेजाने तळपणार्या त्या सोन्याच्या खाणी पाहून जग आर्श्चचकित झाले. हे दृश्य होते पेरू देशातील अॅमेझॉनच्या जंगलातले. तसेही पेरू जगातला सोने उत्पादन करणारा जगातला सहावा देश. जसा आपला देश कृषिप्रधान, तसा हा देश खाणप्रधान. सोने शोधण्यासाठी इथे सरकारी आणि बेकायदेशीर अगणित खाणी आहेत. आशा, निराशा, स्वप्न वगैरेच्या पातळीवर ही खाणीची दुनिया अनेक वर्षे सुरू आहे.