राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात पोलिसांनी शोध मोहिम राबवून बीफ मार्केट चालवणाऱ्या सर्व २२ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी ९ आरोपींना दि.२६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. साहुन, हारुण, इब्राहिम, सलीम खान, मनान, खालिद खान, हब्बी, सलीम आणि कय्युम अशी त्यांची नावे आहेत. यापैकी कय्युम हा जुना हिस्ट्री शीटर असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.
Read More
राजस्थानमधील अलवर येथे हनुमंत कथा सांगणारे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री दि. ६ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांच्या निवासस्थानी असलेल्या फूलबाग पॅलेसमध्ये पोहोचले. तेथे त्याने चांदीच्या सिंहासनावर बसून धार्मिक सभा घेतली. यावेळी धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, जितेंद्र सिंह सर्व लोकांना देवासमान मानतात.हिंदू राष्ट्राबाबत बोलताना ते म्हणाले की, हिंदू जागृत झाले नाहीत तर काश्मीरसारखी परिस्थिती निर्माण होईल.
राजस्थानच्या काँग्रेस लोकसभा प्रभारी आणि गुजरात काँग्रेस नेत्यांच्या समोर एका कार्यकर्त्याने आपली व्यथा मांडली आहे. कार्यकर्ता म्हणाला की, राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही पक्षाने कार्यकर्त्यांचे ऐकले नाही. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. बहरोड, अलवर येथे झालेल्या बैठकीत गुजरात काँग्रेसचे नेते हिम्मत सिंह पटेल यांच्या पुढे स्थानिक कार्यकर्ता आपली व्यथा मांडत होता. यावेळी ते म्हणाले, आज आमची अवस्था रस्त्यावरील कुत्र्यासारखी झाली आहे. आमच्या सरकारमध्ये आमचे ऐकले जात नाही, मग आम्ही कोणासाठी काम करा
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका लग्नात लग्नाच्या कार्यक्रमात काही कट्टरपंथीयांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. यावेळी लग्न मंडपातील महिलांसोबत असभ्य वर्तन काही तरुणांनी केले. त्यानंतर त्या कट्टरपंथी तरुणांना रोखण्याचा प्रयत्न करताच त्यांनी कार्यक्रमावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुमारे १२ ते १५ हल्लेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना २४ जून रोजी घडली.
राजस्थानातील अलवर जिल्ह्यात राहणाऱ्या २१ वर्षीय शुभम यादव याचा डंका संपूर्ण देशात वाजत आहे. केंद्रीय विश्वविद्यालय, काश्मीर (सीयुके) येथून इस्लामिक स्टडीज् प्रवेश परिक्षेत तो पहिला आला आहे, असे करणारा शुभम हा पहिला बिगर मुस्लीम आणि बिगर काश्मीरी विद्यार्थी ठरला आहे. राजस्थानचा हा पठ्ठ्या या नव्या विक्रमामुळे चर्चेत आला आहे. अलवर येथील शुभम यादवने नवा इतिहास नोंदवला आहे.
राजस्थानमधील अलवर येथे घडलेल्या सामूहिक बलात्कारकांडावर 'पुरस्कार वापसी गँग' गप्प का आहे?, असा परखड सवाल मोदींनी विचारला.