Ajit Doval

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात

Read More

वेव्ह्ज समिट २०२५’ मध्ये झळकले बॉलिवूडचे तारे; शाहरुख, आलिया-रणबीर, रजनीकांत, आमिर, चिरंजीवी यांची उपस्थिती!

Bollywood actorts at Waves Summit 2025

Read More

दरवर्षी २१ एप्रिल दरम्यान रंगणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव; सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा!

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या 'राजा हरिश्चंद्र' या चित्रपटाचे पहिले प्रदर्शन २१ एप्रिल १९१३ रोजी गिरगाव येथील ऑलिम्पिया थिएटर येथे झाले होते. त्या घटनेला ११२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेत दरवर्षी याच काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'चित्रपताका' या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. तसेच, तंत्रज्ञानावरील आव्हानांवर मात करण्यासाठी मराठी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ देण्यात येणार असल्

Read More

आयुष्याला नव्याने सामोरे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या 'आता थांबायचं नाय' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!

झी स्टुडिओज् नेहमीच प्रेक्षकांना, मनोरंजक, दर्जेदार आशय असलेले चित्रपट देत आले आहेत. झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ मिळून आपल्यासाठी असाच एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा चित्रपट आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत . सहकुटुंब हसत खेळत प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारा 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट येत्या महाराष्ट्र दिना दिवशी म्हणजेच १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या प्रेरणादायी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. संधी ही कशी आणि केव्हा चालून येईल हे स

Read More

टिंगल करणारा कलाकार विनोदी कलाकार असुच शकत नाही... कुणाल कामराच्या विरोधात अशोक सराफ आणि वंदना गुप्तेंनी मांडली भूमिका!

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं, त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं आहे. मात्र, अद्याप त्याने हजेरी लावलेली नाही. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी स्टँडअप कॉमेडी आणि या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Read More

मराठी चित्रपटसृष्टिला धर्मा प्रॉडक्शनचं पाठबळ; ये रे ये रे पैसा ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित!

ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर, हिट मराठी कॉमेडी फ्रँचायझी तिसऱ्या भागासह परतली आहे.ये रे ये रे पैसा ३ अखेर येत आहे. यावेळी, निर्माते आणखी गोंधळ आणि मनोरंजनाचे आश्वासन देत आहेत. संजय जाधव हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर त्यांनी आणि अरविंद जगताप यांनी एकत्रितपणे पटकथा लिहिली आहे. तेजस्विनी पंडित, संजय नार्वेकर, आनंद इंगळे, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, वनिता खरात, नागेश भोंसले आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स या चि

Read More

तामिळ अभिनेता विजय थलपतीच्या इफ्तार कार्यक्रमावार वाद, मुस्लिम संघटनेची तीव्र प्रतिक्रिया!

तामिळनाडू सुन्नत जमातने अभिनेता थलपती विजयच्या विरोधात चेन्नई पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. इफ्तार कार्यक्रमात ‘मुस्लिमांचा अपमान’ झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तक्रारीबाबत बोलताना तामिळनाडू सुन्नत जमातचे खजिनदार सय्यद कौस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, "विजय ने आयोजित केलेल्या इफ्तार कार्यक्रमात मुस्लिमांचा अपमान करण्यात आला. या कार्यक्रमात काही मद्यपी आणि गुंड सामील झाले होते, ज्यांचा उपवास किंवा इफ्तारशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम मुस्लिमांसाठी अपमानास्पद ठरल

Read More

अभिनेता शशांक केतकर पुन्हा रंगभूमीवर, ‘११ वपुर्झा’साठी सज्ज; चाहत्यांना आनंदाची बातमी देत म्हणाला,"व.पु. काळेंच्या कथा आजही तितक्याच..."

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर लवकरच रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमांमध्ये आपली छाप उमटवल्यानंतर आता तो पुन्हा एकदा नाटकासाठी सज्ज झाला आहे. शशांक शेवटचा गोष्ट तशी गमतीची या नाटकात दिसला होता. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकात त्याने लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र, या नाटकानंतर तो फारसा रंगभूमीवर दिसला नव्हता. आता तो ‘११ वपुर्झा’ या विशेष नाट्यप्रयोगात झळकणार आहे.

Read More

महेश मांजरेकर यांच्या फिल्टर कॉफी नाटकातून 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री येणार पहिल्यांदा रंगभूमीवर!

कॉफीची नजाकत काही वेगळीच! मग ती कोल्ड असो वा हॉट! कॉफीच्या शौकिनांची संख्या कमी नाही. कॉफीचा खरपूस दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांनी ही 'फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. रितीशा प्रोडक्शन्स निर्मित महेश मांजरेकर लिखित दिग्दर्शित ‘फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत.

Read More

१०० व्या नाट्य संमेलनानिमित्त विशेष नाट्यमहोत्सवाचे आयोजन : भारतीय भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी

नाट्यपरिषद ही आपल्या मराठी नाट्य सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाट्यपरिषद सातत्याने राबवत असते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला नाट्यपरिषदेचे अध्यक्ष श्री. प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) श्री. भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह श्री. अजित भुर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121