देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सामाजिक क्रांती घडवून आणणार्या पंढरपूर मंदिर प्रवेश सत्याग्रहासही ७५ वर्षं पूर्ण होत आहेत. सानेगुरुजींनी आपल्या प्राणांची बाजी लावून दहा दिवस हा सत्याग्रह केला. या सत्याग्रहाचा सविस्तर इतिहास विद्याधर ताठे यांनी 'भेटवा विठ्ठला' पुस्तकात शब्दबद्ध केला असून सा. ‘विवेक’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. ९ मे रोजी पंढरपूर येथे तनपुरे महाराजांच्या मठात सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
Read More