ह्युमन वेल्फेअर क्रेडिट अॅंड थ्रिफ्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (एचडब्ल्यूसी) या संस्थेच्या प्रचारासाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अभिनेता श्रेयस तळपदे यांनी काम केले होते. या प्रचार जाहिरातीमध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपप्रकरणी अभिनेता श्रेयस तळपदे यांना सोमवार दि. २१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे.
Read More
ऑनलाइन गेमिंगमुळे युवक आर्थिक संकटात सापडत असून, गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींनी अशा गेमच्या जाहिराती करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केले. यासोबतच केंद्र सरकारने स्वतंत्र कायदा करावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पतंजली आयुर्वेद'ला डाबरच्या चवनप्राश उत्पादनाचा अपमान आणि विरोध करणाऱ्या जाहिराती प्रसारित करण्यापासून गुरुवार ,दि. ३ जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने मनाई केली आहे. न्या. मिनी पुष्कर्ण यांच्या खंडपीठाने पतंजलीच्या जाहिरातींविरोधात डाबर इंडिया लिमिटेडने दाखल केलेल्या अंतरिम अर्जाला मान्यता दिली.
सध्या जाहिरातीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असून यात वाढ करुन हे उत्पन्न १०० कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवार, २ एप्रिल रोजी दिल्या. परिवहन आयुक्तालय येथे पार पडलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसिद्धीकरिता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या जाहीरात प्रसिद्धीकरिता सरकारकडून ३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
(Srilankan airlines) रामकथेच्या माध्यमातून ‘श्रीलंकन एअरलाईन्स’ केवळ पर्यटकांना आकर्षित करणार नाही, तर भारतीयांच्या मनावरही खोल प्रभाव टाकत आहे. अवघ्या पाच मिनिटांत रामायण ही कथा नसून भारतीय आणि श्रीलंकेच्या इतिहासाचा एक अस्सल दस्तऐवज आहे, ज्याने श्रीलंकेच्या मोहक प्रवासाला प्रेरणा दिली, यावर संपूर्ण जगाचा विश्वास बसला आहे.
अभिनेते राजपाल यादव यांच्या सोशल मिडियावरुन काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यात त्यांनी हिंदु समाजाला दिवाळीत फटाके न उडवण्याचा सल्ला दिला होता. यात त्यांनी असं देखील म्हटलं होतं की फटाक्याच्या आवाजामुळे प्राणी घाबरतात;त्यामुळे हिंदुंनी फटाके उडवणं टाळलं पाहिजे. पण त्यांच्या या व्हिडिओनंतर त्याना नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.दरम्यान, आता राजपाल यादव यांनी सर्व हिंदु समाजाची जाहिर माफी मागितली आहे.
मुंबईत ‘म्हाडा’चे घर खरेदीसाठी इच्छुक असणार्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. 2 हजार, 30 घरांच्या सोडतीची जाहिरात गुरुवार, दि. 8 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती ‘म्हाडा’तील वरिष्ठ अधिकार्यांनी दिली आहे. जाहिरात निघाल्यानंतर लगेचच अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या घरांसाठी सप्टेंबर महिन्यात संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दि. २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते आणि कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रे, टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आले आहे.
डिजीटल जाहिरात फलक रात्री ११ नंतर सुरु राहिल्यास संबधित जाहिरात संस्थेच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश पालिकेने दिलेले आहेत. अतिप्रखर प्रकाशमान डिजिटल जाहिरात फलकामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना त्रास होतो. त्यासंदर्भात काही तक्रारी पालिककडे आल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. दरम्यान रात्री ११ नंतर जाहिरात फलक सुरु राहिल्यास जाहिरात संस्थेची लाखोची अनामत रक्कम जप्त केली जाईल, असे ही सांगण्यात आलेले आहे.
घाटकोपरमधील छेडा नगरात जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सुरू असणारे बचाव कार्य आता पूर्ण झाले आहे, तर फलकाचे सुटे भाग व राडारोडा हटवण्याचे कार्यही पूर्णत्वाकडे आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली आहे. या दुर्घटनेत गुरुवार दि.१६ रोजी राडारोडा हटविताना आणखी दोन मृतदेह हाती लागले आहे.
अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) क्वचित पण नेमकं मत कोणत्याही विषयांवर मांडत असतो. सध्या चर्चेत असलेल्या अॅपल कंपनीच्या आयपॅडच्या एका जाहिरातीवर त्याने टीका केली आहे. त्याच्या या विशेष पोस्टने प्रेक्षकांचं (Hrithik Roshan) लक्ष वेधून घेतलं आहे.
आता जाहिरातदारांना जबाबदारीने जाहिराती कराव्या लागणार आहेत केवळ जाहिरातदारांना नाही तर इनफ्लूएंसर, सेलिब्रिटी यांनाही कुठल्याही उत्पादनाची जाहिरात जबाबदारीने करावी लागणार आहे. बाबा रामदेव यांच्या १४ उत्पादनांवर उत्तराखंड नियामक मंडळाने बंदी घातली होती. न्यायालयाने बेजबाबदार जाहिरात म्हणून पतांजली कंपनीला माफी मागावी लागली होती.याच धर्तीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत आगामी काळात अवास्तविक व भ्रामक जाहिरातांना चाप घालण्याचे निर्देश दिले आहेत.
सतराव्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) मधील खेळांच्या दरम्यान जाहिरातींमध्ये ५९ टक्क्यांनी वाढ असल्याचे टीएएम (TAM Report )या नव्या अहवालात म्हटले आहे. एकूण जाहिरातदारांमध्येही ३८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.एकूणच उन्हाळ्यात आयपीएल, लोकसभा निवडणूका यामुळे कंपन्या, ब्रँड ग्राहकांच्या दृष्टीक्षेपात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्या जाहीरातीवरील खर्चात वाढ करताना दिसत आहेत. मागील आयपीएलमध्ये जाहिरातीत ३७ टक्यांने वाढ व जाहिरातदारात ३८ टक्क्यांनी वाढ झाली होती.
एकीकडे पाश्चिमात्त्य देशांमध्ये मुद्रित माध्यमे आणि खासकरुन वृत्तपत्रांच्या खपाचे आकडे वेगाने गडगडत असताना, भारतात मात्र याबाबतचे चित्र प्रचंड आशादायी आहे. भारतात केवळ वृत्तपत्रांचा खपच वाढलेला नसून, वृत्तपत्रीय जाहिरातींचे प्रमाणही वाढल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यानिमित्ताने वृत्तपत्रातील जाहिरात व्यवसायवृद्धीची कारणमीमांसा करणारा हा लेख...
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी आता मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या पदपथ रस्ते दुभाजक, रस्त्यांच्या दुतर्फा डिजिटल बोर्ड बसवण्यास पालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षांला ३० कोटी याप्रमाणे ९ वर्षांत ३३८ कोटी १७ लाख ४८ हजारांचा महसूल जमा होईल, असा विश्वास पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
The Advertising Standards Council of India (ASCI) ने Central Consumer Protection Authority (CCPA) शी हातमिळवणी केल्याचे जाहीर केले आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना चाप बसवण्यासाठी कडक निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. विशेषतः सीसीपीए (CCPA) ने एएससीआय (ASCI) ला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आपल्याकडे पाठवण्याची विनंती केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या जाहिरातींवर कारवाई होऊ शकते.
बेस्ट बसेस आणि बस स्थानकांवर महापालिकेच्यावतीने मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, स्वच्छता संदेश हे दि. २७ डिसेंबर २०२२२ ते दि. २६ जून २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीकरता प्रदर्शित करण्यात आले होते. या स्वच्छता संदेशाच्या जाहिरातीसाठी मुंबई महापालिकेने तब्बल ११८ कोटी रुपयांचा खर्च केला असून, हा खर्च केवळ सहा महिन्यांच्या कालावधीसाठीचा आहे.
ASCI (Advertising Standards Council of India) ही संस्था जाहिरातींवरील तक्रार निवारण करणारी एक महत्त्वपूर्ण संस्था. प्राप्त तक्रारींमध्ये किती तथ्य आहे, याबद्दल बारकाईने अभ्यास करत त्यावरील पुढची कारवाई काय करायची ते ‘एएससीआय’ ठरवते. १९८५ साली स्थापन झालेल्या या संस्थेने गेले तीन दशकांहून अधिक काळ जाहिरात विश्वाचा बारकाईने अभ्यास केला आहे. या संस्थेची पुढील आठवड्यात प्रशिक्षण संस्थाही सुरू होत आहे. त्यानिमित्ताने ‘एएससीआय’ची नेमकी कार्यपद्धती, फसव्या जाहिरातींविरोधात तक्रार निवारण प्रकिया याविषयी ‘एएससीआय’च्
'फूड डिलिव्हरी' कंपनी 'झोमॅटो'ने हृतिक रोशनसोबत केलेल्या एका आक्षेपार्ह्य जाहिरातीवर आलेल्या प्रतिक्रियांनंतर माफी मागितली. उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ‘महाकाल की थाली’ वरील जाहिरात मागे घेण्यात आली आहे. जाहिरातीत हृतिक म्हणतो, “मी थाळी खाणार आहे. जर तुम्ही उज्जैनमध्ये असाल तर तुम्ही ती 'महाकाल'कडे मागा”
‘स्वच्छ सर्वेक्षणा’मध्ये अव्वल स्थानी येण्यासाठी ठाणे मनपाच्यावतीने ‘टीएमटी’ बसेसवर ‘ठाणे आपुले चमकवूया’ या शिर्षकाच्या जाहिराती करून नागरिकांना स्वच्छतेचे उपदेश करण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि. ६ मार्च) मेट्रो आणि इतर विकासकामांच्या उद्घाटनासाठी पुणे दौऱ्यावर होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून यावेळी तीव्र आंदोलनही करण्यात आले. मात्र शिवसेनेकडून यावर कोणतीही प्रखर भूमिका घेण्यात आली नाही. याउलट विशेष म्हणजे शिवसेनेच्या सामना वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यासंदर्भात असलेली भाजपची फूलपेज जाहिरात छापून आली. त्यामुळे पंतप्रधानांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या सामनात पंतप्रधानांची मोठी जाहिरात झळकल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या जाहिरातीवरून भाज
केजरीवाल सरकारने २ वर्षांत जाहिरातीसाठी ८०० कोटींचा खर्च केल्याचा दावा
अलीकडेच ‘फॅब इंडिया’ या कंपनीने दिवाळीनिमित्त ज्या जाहिराती केल्या, त्या ‘जश्न-ए-रिवाज’ या मथळ्याखाली केल्या. दिवाळीच्या सणासाठी आपल्या उत्पादनाच्या जाहिराती करताना ‘फॅब इंडिया’ला अन्य कोणतेच शब्द सुचले नाहीत, याला काय म्हणायचे! ‘फॅब इंडिया’ने हिंदू सणांच्या उत्सवास उर्दू रंग देण्याचा जो प्रयत्न केला, त्यास जो विरोध झाला, त्यामुळे ‘फॅब इंडिया’ने त्या जाहिराती मागे घेतल्या.
जाहिरातींतून प्रबोधन चुकीचे नाहीच; पण ते फक्त हिंदूंसाठीच का? धर्मांध मुस्लीम मोहरमला रक्तबंबाळ होईपर्यंत शरीरावर धारदार शस्त्राने फटके मारत रस्त्याने फिरतात, रस्ते अडवून नमाज पढतात, अजानच्या आरोळ्यांनी अन्य धर्मीयांचे कानाचे पडदे फाडण्याचे प्रकारही होतात. पण, त्यावर पुरोगामी-धर्मनिरपेक्ष जाहिराती, लघुपट, चित्रपट तयार करत नाहीत, कारण जीव जाण्याचा धोका.
देशात दुष्काळ असल्याने घेतला निर्णय
दौऱ्याची हौस कशासाठी?
व्हॉट्सअॅपवरील फेक मॅसेजमुळे अफवा पसरून अनेकांचे जीव गेले आहेत. मॉब लिंचिगच्या अनेक घटना घडल्या आहेत.
कांचन पगारे!’ जाहिरातीत दिसणारा एक प्रसिद्ध चेहरा! पण इतरांच्या चेहऱ्यावर हसू उमटविणाऱ्या या सुप्रसिद्ध चेहऱ्यामागे एक भलामोठा संघर्ष दडला आहे.
'म्हाडा'च्या १,३८४ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून आजपासून घरांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
ब्लॉगिंग म्हणजे नेमके काय? आणि ब्लॉगिंग कसे सुरू करावे? याबाबत आपण गेल्या आठवड्यात माहिती करुन घेतली. आज ब्लॉगिंगच्या माध्यमातून आपण पैसे कसे कमवू शकतो, याबद्दल थोडेसे जाणून घेऊया.