कोकणातून नामशेष होण्याची भिती असणाऱ्या महाधनेश (Great Hornbill) या पक्ष्याच्या संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत महाधनेशाचे (Great Hornbill) घरटेच दत्तक घेता येणार आहे. याव्दारे पक्ष्याबरोबरच त्यांच्या अधिवासाचे देखील संवर्धन करण्याचे उदिष्ट्य आयोजक 'सह्याद्री संकल्प सोसायटी'चे आहे. (Great Hornbill)
Read More
“राज्यभरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या पाहावयास मिळत आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठोस धोरण ठरवून ’श्वान दत्तक योजना’ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात यावी,” अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कुटुंबापासून सुरू झालेला प्रवास ‘वसुधैव कुटुम्बकम्’पर्यंत नेणार्या नाशिकच्या कौस्तुभ मेहता यांच्याविषयी...
मी एकटा काही करू शकत नाही, पण म्हणून मी करूच नये असे काही आहे का? मी सुरूवात तर करेन. माझ्यापरीने सत्कार्याची ज्योत प्रज्वलित करेन. एक ज्योत लाखो ज्योती निर्माण करून अंधकाराला पराभूत करू शकते, असा विचार करून चंद्रकांत सावंत या शिक्षकाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात सेवाकार्य करण्यास सुरूवात केली. सेवाकार्याचे बिज रोवताना या माणसाने कोणत्याच प्रसिद्धीचा, लाभाचा विचार केला नाही. हे सेवाकार्य जणू त्यांच्या जीवनाचे लक्ष्य होते आणि आहे. या लेखामध्ये त्यांच्या सेवाकार्याचा घेतलेला हा मागोवा...