गेल्या ३५-४० वर्षांपासून वन जमिनीवरील हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोखावणे-कसारा गावात गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल आणि रेल्वे विभागाच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर या जमिनीवरील रहिवाशांना नोटीसा बजाविल्या जात असल्या, तरी त्यांच्याबाबत राज्य सरकारला सहानुभूती असल्याची ग्वाही वन मंत्र्यांनी दिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली.
Read More
(Gurukrupa Heart Foundation) गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनतर्फे, विश्वस्त डॉ. गजानन रत्नपारखी अणि डॉ. स्मृती रत्नपारखी यांच्याकडून रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी दहेजे ( ता. विक्रमगड, जि. पालघर ) ह्या गावामध्ये जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात ३०० आदिवासी गरीब गरजू लोकांना ब्लँकेट अणि चादरचे वाटप करण्यात आले .ह्या भागामध्ये खूप थंडी पडते, त्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
"आदिवासी समाज आजही विकासाच्या दृष्टीने विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मागे आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे. शहरांमध्ये राहणाऱ्या प्रभावशाली लोकांनी यामध्ये पुढे येऊन सहकार्य करावे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
छत्तीसगडमधील रायगड जिल्हात मोठ्या प्रमाणावर घरवापसी झाली आहे. या वेळी 'कोरबा आदिवासी समाजा'तील ५६ कुटुंबातील २०० लोकांनी हिंदू धर्मात घरवापसी केली आहे. त्यांनी धार्मिक विधी पार पाडून सनातन धर्मात घरवापसी केली. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अखिल भारतीय घर वापसी अभियानाचे प्रमुख प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी वैयक्तिकरित्या सर्वांचे पाय धुतले आणि सर्वांना हिंदू धर्मात घरवापसी करुन घेतली.
राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून गुरुवारी विधानपरिषदेत धर्मांतरीत आदिवासींच्या प्रश्नावर चर्चा पार पडली. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुळ आदिवासी संस्कृतीच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही दिली आहे.
वनवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नयेत, या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी, आदिवासी नेते हंसराज खेवरा आदीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने वनवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. भर दुपारी गगनभेदी घोषणा देत साकेत मैदानातुन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच करीत मोर्चेकऱ्यानी मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दि
उद्धव ठाकरे यांना संघाचा विचार आणि भूमिकेची इतकी काळजी का वाटावी? संभाजी ब्रिगेडसारख्या हिंदुत्वाला नाकारणार्या संघटनेचे मांडलिकत्व स्वीकारून दुसरीकडे रा. स्व. संघाच्या विचारांवर बेगडी प्रेम दाखवण्याचे कसब उद्धव ठाकरेच दाखवू शकतात.
एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी पात्र असलेल्या ६० टक्के मतदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे
मागच्या लेखात कबूल केल्याप्रमाणे आजची गोष्ट आसामची. गेली दोन-पावणेदोनशे वर्षे आसाममध्ये राहूनही परक्या समजल्या जाणार्या ‘चायबागान जनजातीची.’ त्यांचा इतिहास, सद्य:परिस्थिती याविषयी थोडे जाणून घेण्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगते.
चर्च आणि डाव्यांच्या कार्यप्रणालीमध्ये एक साम्य आहे; ते म्हणजे ते स्वतःची ओळख लपवून आपली धोरणे समाजामध्ये बेमालूमपणे मिसळून टाकण्यासाठी आघाडीच्या संघटनांचे जाळे विणतात. आपण एक एक धागा शोधत पुढे गेलो तरच ते उघडकीस येते.
वर्षभरात सुमारे ३ हजारांहून अधिक महिलांचे ‘माहेरघर’मुळे सुरक्षित बाळंतपण करण्यात आले. संस्थात्मक बाळंतपणात वाढ होऊन आदिवासी भागातील माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी योजना लाभदायक ठरत असल्याचे समोर आले
माओवादाला नेस्तनाबूत करायचे असेल तर माओवाद्यांचे खंडणीराज्य संपवले पाहिजे. २०१६ मधील आकडेवारीनुसार, माओवादी १५०-२५० कोटी रुपयांची खंडणी वेगवेगळ्या माध्यमातून गोळा करताहेत. सरकारी निविदा, योजना, कारखाने, व्यावसायिक आणि इतर लोकांकडून खंडणी वसूल करतात. यापैकी कोणाकडून किती खंडणी वसूल करायची याचेही दर ठरलेले आहेत.
संजय देवधर यांना नुकताच राज्य शासनाचा ‘आदिवासी सेवक’ पुरस्कार मिळाला. त्यांनी विशिष्ट संकल्पना घेऊन वनवासी बांधवांचीच सेवा नाही, तर भारतीय आदिम संस्कृतीची सेवा केली असेच म्हणावे लागेल.
आप्पा जोशींनी ठाणे परिसरात जल संधारण, कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत, शोषखड्डा असे अनेक प्रयोग राबविले आहेत. यासोबतच त्यांनी साप्ताहिक विवेकची जबादारीही सांभाळली होती.
सूर्याच्या अनुपस्थितीत अंधाराशी सामना कोण करतं? दिव्याची छोटीशी ज्योत. सूर्य म्हणून तिची आरती होणार नाही. पण त्या ज्योतीला त्याचे काही सोयरसुतक नसते. संध्या देवस्थळे-भडसावळे नावाची अशीच एक कर्तव्यमग्न कार्यज्योती...
२००९ ते २०१४ या कालावधीत कर्ज घेतलेल्या नाशिक, जव्हार, नंदुरबार, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी व जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या ११ लाख २५ हजार ९०७ शेतकरी-शेतमजुरांना या निर्णयाचा लाभ होणार
९ ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी माणूस हा परिस्थितीने जरी गरीब असला, तरी तो मनाने श्रीमंत असतो.
मुंबईतील कोळीवाडे, गावठाण आणि आदिवासी पाडे यांच्या सीमा निश्चित करण्याबाबत आणि पुनर्विकासासंबंधी सहा महिन्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.
विविध शासकिय योजनेखाली 9 कोटी 7 लाख 11 हजार 180 रुपये दिल्याचे भासवुन फसवणूक केल्या प्रकरणी गुलाबसींग एन वळवी तत्कालीन प्रकल्प अधिकारी याच्या विरुध्द बुधवारी दुपारी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यातील ९८ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात उपरोक्त साहित्य खरेदीसाठी सुमारे ४७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत
विदूषकांच्या धम्माल विनोदी अदाकारीने उपस्थित लहानग्यांमध्ये हास्याचे रंग भरले. तर अन्य सादर झालेल्या नाटकांनीही लहान मुलांसह मोठ्यांनाही खळखळून हसायला लावल्याने, येथे भरलेल्या नाटक जत्रेत लहानग्यांसह उपस्थित रसिक चांगलेच रंगले होते.
राज्य शासनाने आयोजित केलेली मॅग्नेटिक महाराष्ट्र ही गुंतवणूक परिषद यशस्वी ठरली असून आदिवासी विकास विभागाला या गुंतवणूक परिषदेत उत्तम प्रतिसाद लाभला आहे.